ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

▶️📜 २० जानेवारी इ.स.१६६३
औरंगजेबचा वकील शेख मुहम्मद गोव्यात दाखल झाला. मुघलांच्या स्वराज्यावरील संभाव्य आक्रमणात पोर्तुगीजांनी सामील व्हावे आणि जाणाऱ्या रसदेला उपद्रव देऊ नये या अटी फिरांग्यांपुढे मांडल्या. एकीकडे बलाढ्य औरंगजेब आणि दुसरीकडे पराक्रमी छत्रपती शंभूराजे अशा कात्रीत सापडलेल्या पोर्तुगीज व्हाइसरॉयने बादशहाच्या अटी मान्य केल्या. आणि वरकरणी मात्र राजांशी मैत्रीचे नाटक सुरु ठेवले.

🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻

▶️ २० जानेवारी इ.स.१६७४
दीलेरखानाने कोकणात उतरण्याचा प्रयत्न केला पण मराठ्यांनी तो उधळून लावला.
हा प्रकार नेमका कुठल्या घाटात घडला याची माहिती उपलब्ध नाही. यात दीलेरखानाचे १००० सैनिक मारले गेले तर सुमारे ४०० ते ५०० मराठेही या लढाईत धारातिर्थी पडले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ २० जानेवारी इ.स.१६७५
(माघ शुद्ध ४, चतुर्थी, शके १५९६, संवत्सर आनंद, वार बुधवार)

महाराजांनी डुमगावची वखार लुटली!
महाराजांनी डुमगावची वखार पुर्णपणे लुटली. महाराजांबरोबर तह करून वखार वाचवून घ्यावी, असा सल्ला जवळच्या माणसांनी सुचवूनही इंग्रज सेनापतीने तो धुडकावून लावला आणि नंतर त्याचा परिणाम काय झाला हे कंपनी सरकारलाही कळले. मात्र महाराजांनी डुमगावच्या वखारीला लुटून इंग्रजांच्या वाढत्या हस्तक्षेपाला चाप लावला हे निश्चित!

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ २० जानेवारी इ.स.१६७७
सुरतकर इंग्रजांनी मुंबईकर इंग्रजांना लिहीलेले पत्र!
"विजापुरकर आपल्याशी सहानुभूतीने वागतात, ते काडीचाही त्रास देत नाहीत, मात्र छत्रपती शिवाजी महाराजांच्या फर्मानाची आम्हास खात्री वाटत नाही, परंतु त्यांची भरभराट होत असून त्यांचे राज्य वाढत आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ २० जानेवारी इ.स.१६८३
(पौष शुद्ध ५, पंचमी, शके १६०४, संवत्सर दुदुंभी, वार रविवार)

औरंगजेबाचा वकील गोव्यात!
      औरंगजेबाचा वकील शेख मोहम्मद औरंगजेबाचे पत्र घेऊन गोव्यात आला. या पत्रात औरंगजेबाने अनेक मागण्या केल्या असून अप्रत्यक्षपणे गोव्याच्या विजरईस छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध युद्ध पुकारण्यासाठी दबाव टाकला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ २० जानेवारी इ.स.१६८५
छत्रपती संभाजी महाराजांचे रंगाजी लक्ष्मीधर व सिधोजी फर्जंद हे वकील गोव्यास डिसेंबर इ.स.१६८४ मध्ये गेले. रंगाजी लक्ष्मीधर यांस पोर्तुगीज भाषा येत होती. सिधोजीस पोर्तुगीज भाषा येत नव्हती. छत्रपती संभाजी महाराजांच्या वरील वकीलांची उतरण्याची सोय गोवे शहरात "मोती'च्या पायाजवळ केली होती. २९ डिसेंबर इ.स.१६८४ तेथून त्यांनी विजरईला पत्रे लिहिली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ २० जानेवारी इ.स.१६९६
संताजी नावाचे वादळ
हा काळ होता १६९६ मोगल सरदार हिंमतखान बहादूर हा खरोखरच नावाप्रमाणे धाडसी आणि पराक्रमी होता. त्याच्याजवळ सैन्य थोडे असल्याने आतापर्यंत त्याने संताजींवर आक्रमण केले नव्हते. पण आता खुद्द संताजीच त्याच्यावर चालून गेले. मोठ्या धैर्याने त्याने संताजींशी लढायचे ठरविले. आपले सैन्य घेऊन तो बसावापट्टणच्या गढीतून बाहेर पडला आणि त्याने संताजींवर चाल केली.
संताजींनी आपल्या सैन्याच्या दोन तुकड्या केल्या होत्या. एक तुकडी त्याने बसावापट्टणजवळच्या जंगली प्रदेशात लपवून ठेवली होती आणि दुसऱ्या तुकडीचे स्वतः संताजी नेतृत्व करून लढत होते. लढाई घनघोर सुरु झाली. खान शौर्याने लढत होता. उभय पक्षी अनेक सैनिक रणांगणी पडले. एवढ्यात संताजींनी माघार घेतली. रण टाकून संताजी पाठमोरे पळायला लागले.
हिंमतखानला काही सुचेना त्याला त्याचाच डोळ्यावर विश्वास बसत नव्हता हाच तो संताजी ज्याने बादशहाच्या शामियान्यावरील सोन्याचे कळस मारिले. हाच तो संताजी ज्याने दस्तूरखुद्द संभाजी राजेंना कैद करणाऱ्या त्या मुक्करबखानास जायबंदी केलं. हाच तो संताजी ज्याचा भीम पराक्रमाने महाराष्ट्रच काय तर अवघे तामिळनाडू ढवळून निघाले, हाच तो संताजी ज्याचा मर्दुमकीमुळे मोगलांची दोड्डेरीकडे लांच्छनास्पद माघार घ्यावी लागली तो संताजी आज रणांगण सोडून पळतोय
हिंमतखानाने तडक संताजींचा पाठलाग सुरु केला. मोठ्या जोमाने तो संताजींचा पाठलाग करू लागला कारण वाघाला मैदान सोडून पळताना पाहिलंचं होतं कुणी तेव्हा? पाठलाग करत संताजी आले त्या जंगलात जिथे त्यांची पहिली तुकडी दबा धरून बसली होती. खान व त्यांचे सैन्य आपल्या कह्यात आल्याबरोबर. संताजी एकाएकी थांबला व पलटी खाऊन त्यांनी लढाईस सुरवात केली. त्याच वेळी जंगलात दबा धरून बसलेले मराठी सैन्य अचानक पुढे येऊन त्याने खानास त्याच्या सैन्यासह, घेरले. संताजींचे अनेक बंदूकधारी जंगलातील झाडावर दबा धरून बसलेले. आणि नेमबाजीमध्ये ते चांगलेच तरबेज होते. कचाट्यात सापडलेल्या हिंमतखानच्या सैन्याची चांगलीच लांडगेतोड मराठ्यांनी केली.
सर्व बाजूंनी वेढला जाऊनही खान पराक्रमाने लढला. ऐन लढाईत त्याच्या कपाळाला मोठी गोळी लागली. व तो जबर जखमी होऊन हौद्यात कोसळला. आता मोगल सेनेचे नीतिधैर्य पूर्ण नष्ट होऊन तिचा पुरा पाडव झाला. या लढाईत मोगलांचे एकूण ५०० सैनिक ठार झाले. काही मोगल सैनिकांनी जखमी हिंमतखान बहादुरास आपल्या ठाण्यात नेले. तेथे तो त्याचं दिवशी मरण पावला खुद्द संताजींना ह्या लढाईत बाणाच्या दोन जखमा झाल्याचा उल्लेख आहे.
ही लढाई झाली २० जानेवारी १६९६
शिवाजी महाराजांनी शिकवलेला गनिमी कावा संताजींनी पुरेपुर लक्षात ठेवाला. त्याचा वापर केला. आणि राज्याभिषेकानंतर अभिषेकासाठी झालेला खर्च वसूल करण्यासाठी बहादूर खानच्या पेडगावच्या छावणीवर हल्ला करून जसा कावा साधला होता अगदी तसाच डाव इथे संताजींनी साधला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ २० जानेवारी इ.स.१७३९
माहिम किल्ला मराठ्यांनी जिंकला
चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली पिलाजी जाधव, शंकराजीपंत व आठ हजार घोडेस्वार, सहा हजार हशम व १२ तोफांच्या मदतीने माहिमला वेढा घातला. किल्ल्याच्या तटांवर तोफांचा प्रखर मारा करुन त्याला जिकडे तिकडे भगदाडे पाडली. शेवटी २० जानेवारी १७३९ रोजी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments