ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶️ ३० जानेवारी इ.स.१६४२
शहाजी राजे कर्नाटकास जातात
माहुलीच्या पराभवानंतर शाहजी राजे रणदुल्लाखान सोबत विजापुरास गेले. त्यांना आदिलशाहकरिता काम करायला मिळणार होते पण कडक जाचाखाली. लगेच त्यांना रणदुल्लाखान बरोबर कर्नाटकात पाठवले गेले. शाहजी राजाच्या कर्नाटकातील कार्याची अजून फारशी माहिती उपलब्ध नाही. त्यांना कर्नाटकात पाठवल्यानंतरचे पहिले पत्र ३० जानेवारी १६४२ सालचे आहे व ते आदिलशाहने शाहजी राजांना लिहीले आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ ३० जानेवारी इ.स.१६८०
इंग्रज सैन्याने छत्रपती शिवरायांपुढे शरणागती पत्करली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ ३० जानेवारी इ.स.१६८१
छत्रपती शंभूराजांनी "बुऱ्हाणपूर" शहराच्या तटबंदीबाहेरील बहादूरपुरा व इतर १७ पुरे अलोट संपत्ती मिळवली. यावेळी बुऱ्हाणपूरचा सुभेदार खानजमान याने मराठ्यांना प्रतिकार न करताच बुऱ्हाणपूराचे दरवाजे बंद करून घेतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ ३० जानेवारी इ.स.१६८२
छत्रपती संभाजी महाराजांनी कोंडाजी फर्जंद यांना जंजिरा मोहिमेसाठी धाडले. जंजिऱ्यावरील दारूखाना इत्यादींना आग लावून देण्याचा त्यांचा विचार होता. कोंडाजी फर्जदंचा हा डाव सिद्दीस कळला तेव्हा सिद्दीने त्यांचे डोके मारले. त्यांच्या सोबत असणाऱ्या काही लोकांना बुडविले. दगलबाजीने जंजिरा सर करण्याचा प्रयत्न अयशस्वी होताच संभाजी महाराजांनी दादाजी रघुनाथ देशपांडे या सेनापतीस दंडाराजपुरीस वेढा घालण्याकरता पाठवले. नंतर, छत्रपती संभाजी महाराज, राजपुत्र अकबर हे वीस हजार सैनिकांसह रायगडाहून निघाले आणि वेढा घालून राहिलेल्या सैनिकांस येऊन मिळाले. जंजिऱ्यावर तोफा डागल्या. तोफांच्या भडिमारामुळे किल्ल्याची भिंत कोसळून पडण्याची वेळ आली.दिनांक ३ जानेवारीपासून दिनांक ३ फेब्रुवारी १६८२ ह्या काळात संभाजी महाराजांनी सिद्दीवर अतिशय दबाव आणला होता, सिद्दीला अडचणीत टाकले होते आणि त्यावेळी मराठे जंजिरा जिंकून घेण्याच्या बेतात होते. त्याकरिता त्यांनी किल्ल्याभोवती खंदक भरून काढण्याकरता ५० हजार माणसे कामास लावली. परंतु, औरंगजेबाचे दोन हजार घोडदळ आणि पंधरा हजार पायदळासह नबाब हसन अलिखान याचे मोगल सैन्य ४ फेब्रुवारी १६८२ रोजी कोकणात येऊन थडकले. दिनांक ३० जानेवारी १६८२ रोजी मोगलांनी कल्याण जिंकून घेतले. त्यामुळे संभाजी महाराजांना सिद्दीवरील मोहीम महाडच्या दादाजी प्रभू देशपांडे यांच्यावर सोपवून मोगल सेनेशी मुकाबला करण्यासाठी रायगडावर परत यावे लागले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ ३० जानेवारी इ.स.१७१५
कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह
सातारकर छत्रपतींची कोकणची जहागीर मोगलांपासून सुरक्षित राखण्याची जबाबदारी छत्रपती पहिले राजाराम यांनी सिधोजी घोरपडे यांचेवर सोपविली होती, परंतु हे जोखमीचे काम घोरपडे पार पाडू शकले नाही आणि पुढे ही जवाबदारी कान्होजींवर आली. मोगलांच्या जुलमापासून मुक्त केलेल्या कोकणातील जहागिरीला राजमुद्रेची संमती मिळाली, म्हणून कान्होजी आंग्रे यांचे समाधान झाले; तर आपले हितसंबंध राखण्यासाठी आपला एक कर्तबगार प्रतिनिधी आपण कोकणासाठी मिळविला, असे समाधान शाहू छत्रपतींना झाले. १७१३ मध्ये कान्होजींना जो प्रदेश दिला गेला त्यात सिद्दीचा काही प्रदेश दिला गेला होता यामुळे कान्होजी आणि जंजिरेकर सिद्दी यांचे युद्ध झाले. सिद्दीचे परिपत्य करण्यासाठी कान्होजींना इ. स. १७१३ ते १७१५ पर्यंत खूप परिश्रम करावे लागले. अखेर ३० जानेवारी १७१५ मध्ये कान्होजी आणि सिद्दी यांमध्ये तह झाला त्यात
१. मामलत तळे व गोरेगाव, गोवेळ व निजामपूर या महलांवर आंग्रे यांना एक हजार रुपये कर मिळाला. तळेपैकी ८००, गोरेगाव ६००, गोवळ १०००, तर्फ निजामपूर १७५ मिळून रुपये २५७५ पैकी १००० रूपये कान्होजींना मिळाले.
२. तर्फ नागोठणे, अष्टमी पाली, आश्रेधार पेटा व अंतोणे यांतील निम्मा वसूल कान्होजींनी घेण्याचे ठरले. या तहाने आपली सत्ता कमी झाली हे शल्य जंजीरेकराचे मनात सलत राहिले आणि त्याने कान्होजींचा पराभव करण्यासाठी मुंबईकर इंग्रजांची मदत घेण्याचा उपक्रम केला, इंग्रजांनी मदत केली देखील परंतु कान्होजी पुढे त्या दोघांचे काही चालले नाही.
सुरतपासून दक्षिणेकडे गोव्यापर्यंत त्यांचे अनिर्बंध वर्चस्व होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ ३० जानेवारी इ.स.१९११
जॅक्सन खुन प्रकरणी सन १९११ मध्ये विनायक दामोदर सावरकरांवर दोन खटले चालून त्यांना दोन "जन्मठेप काळे पाणी"च्या शिक्षा ठोठावण्यात आल्या. याचाच अर्थ अंदमानात ५० वर्षें सक्तमजूरी! उभ्या आयुष्याची राख-रांगोळी! दुसरा कोणी असता तर त्याने हायच खाल्ली असती. पण वीर सावरकर म्हणजे मूर्तिमंत धैर्याचे महामेरू; त्यांनी ही शिक्षा स्तिथप्रज्ञ वृत्तीने स्वीकारली. सावरकरांची शिक्षा २४-२-१९११ ला सुरू झाली व ६-१-१९२४ रोजी त्यांना काही अटींवर मुक्त करण्यात आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ ३० जानेवारी इ.स.१९४८
महात्मा गांधी पुण्यतिथी
दिल्लीच्या बिर्ला भवनच्या बागेतून लोकांबरोबर फिरत असतांना गांधीजींची गोळी मारून हत्या करण्यात आली. नथुराम गोडसे याने महात्मा गांधी यांची हत्या करण्यासाठी बरेटा मॉडेलचे पिस्तूल वापरले होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
..
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment