ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶️ २५ जानेवारी इ.स.१६५८
मुहम्मद आदिलशहाच्या गंभीर आजारपणामुळे कल्याणचा सुभेदार मुल्ला अहमद १६४६ पासून विजापूरातच होता. त्यास मुहम्मद आदिलशहाने बोलावून घेतले होते. आदिलशहा ४ नोव्हेंबर १६५६ रोजी मरण पावला. त्याचे तक्तावर वारस न बसविता आपल्या हातात सत्ता राखण्यासाठी बेगम साहेबिणीने अली नावाच्या विजापूरच्या १८ वर्षांच्या मुलास गादीवर बसविले. हा शाही घराण्यातील अस्सल राजपुत्र नाही अशा सबबीवर औरंगजेबाने विजापूरला वेढा घातला. आणि दोन्ही पक्षांनी छत्रपती शिवाजी राजांकडे मदत मागितली. शिवाजी महाराजांना या प्रसंगात विजापूरचा पक्ष घेऊन आपले राज्य अधिक वाढवावे हे फायदेशीर आहे असे जाणवले. पण सप्टेंबर १६५७ मध्ये विजापूर सरकारने औरंगजेबाशी शांतता करार केला. छत्रपती शिवाजी राजांनी मोंगलाशी सलोखा प्रस्थापित करण्याचा निर्णय घेतला. २५ जानेवारी १६५८ रोजी शिवाजीराजांनी आपला प्रतिनिधी म्हणून सोनाजी विश्वनाथ यांस औरंगजेबाच्या भेटीसाठी बेदरला धाडले. जुनी निजामशाही आणि आदिलशाही यांच्या ताब्यांतील कोकणपट्टी आपल्याला मिळावी अशी शिवाजीराजे यांनी आपल्या वकीलाकरवी औरंगजेबास विनंती केली. धूर्त औरंगजेबाने राजांचा डाव ओळखला व वकीलास सांगितले की, “हा मामला महत्त्वाचा असल्यामुळे खुद्द शिवाजीराजे यांनीच मला भेटावे हे बरे” राजे ओरंगजेबास भेटण्याच्या फंदात पडले नाहीत. त्यांनी औरंगजेबाच्या रागाची पर्वा न करता मोगलांच्या ताब्यांतील जुन्नर व अहमदनगर ही शहरे जिंकून घेतली. इतक्यात औरंगजेबास शहाजहान बादशहा आजारी असल्याचे समजले तेव्हा दिल्ली तक्त बळकावण्यासाठी त्याने घाईने उत्तरेची वाट धरली. वाटेत असता आपल्या सेना अधिकाऱ्यांस पत्रे लिहून शिवाजीराजांच्या पारिपत्यासाठी हालचाली करण्याचा आदेश दिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ २५ जानेवारी इ.स.१६६४
सुरतेच्या या लुटीमुळे छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल प्रचंड दरारा निर्माण झाला. सुरतेच्या लुटीचे खरे फलित हेच आहे. लूट किती मिळाली, याचे आकडे भिन्न आहेत; परंतु राजांचा दरारा काय होता त्याचे चित्र इंग्रजी पत्रव्यवहारात मिळते. 'Surat trembles at the name obsevagee.' हे वाक्य बर्याच वेळा त्या पत्रव्यवहारात वाचावयास मिळते. 'छत्रपती शिवाजीराजांचे नाव काढताच सुरत भीतीने थरथरावयास लागते.' 'त्या' दरार्याचे अचूक वर्णन आहे. २५ जानेवारी १६६४ रोजी सुरतेच्या इंग्रजी वखारीतील एक फॅक्टर हेन्री गॅरी याने अर्ल ऑफ मार्लबरोला लिहिलेले एक पत्र फार बोलके आहे. त्यात गॅरी लिहितो, ''.. Savagee the grand rebell to the king of Deccan came here the 6th of this instant with a considerable army, entering the town before the governor scarce had any notice of his aproche. He made a great destruction of houses by fire, upwards of 3000, and carried a vast treasure away with him. It is credibly reported near unto ten million of ruppees.''
मुघलांनी सुरतेच्या या लुटीची हाय खाल्ली. ही बातमी ऐकून अनेक जण दिड्मूढ झाले. औरंगजेब सुन्न झाला. पोर्तुगीज, इंग्रज, फ्रेंच, डच यांनी मोठमोठी बातमीपत्रे आपापल्या राजांकडे पाठवून दिली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ २५ जानेवारी इ.स.१६६५
छत्रपती शिवाजी महाराजांचे राजनैतिक सल्लागार व विश्वासू सेवक सोनोपंत तथा सोनोजी विश्वनाथ डबीर यांचे निधन.सोनोपंत डबीर म्हणजे शिवरायांच्या अष्टप्रधान मंडळीतील एक मौल्यवान रत्न. मराठा साम्राज्याचे पेशवे (पंतप्रधान) श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात छत्रपती शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली होती. सोनोपंत डबीर यांचे छत्रपति शिवाजी महाराज यांना सुनावलेले खड़े बोल -जेव्हा शहाजी राजे आदिलशाहकड़े बंदी होते त्यांच्या सुटकेसाठी आदिलशाहने सिंहगड किल्ला परत मागितला होता तेव्हा छत्रपति शिवाजी राजे आपल्या पित्यावर रुष्ट झाले होते अणि तेव्हा सोनोपंत डबीर यांनी त्यांचा रुसवा काढताना ""पराक्रमी राजलाच पृथ्वी वश होते , राजे एक सिंहगड गेला म्हणुन तुम्ही पित्यावर रागावता, त्यापेक्षा एक गडाच्या बदल्यात आदिलशाहने शाहजी राजंसारख्या सिंहाला मुक्त केले आहे राजे... आता तुम्ही पृथ्वीवर राज्य करा.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ २५ जानेवारी इ.स.१६७३
छत्रपती शिवरायांनी कैदेतील इंग्रज कैद्यांची सुटका केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ २५ जानेवारी इ.स.१६८४
छत्रपती संभाजी महाराजांची पोर्तुगीजांनी एवढी दहशत घेतली होती की त्यांनी गोव्याची राजधानी मुरगाव बंदरात नेण्याचे ठरवले होते. २५ जानेवारी १६८४ रोजी विजरई गोव्याच्या दयनीय अवस्थेचे वर्णन करताना पोर्तुगालच्या राजाला लिहतो ….
"आमच्या राज्याची अवस्था शोचनीय आहे. मोग्लांमुळे आमचे रक्षण झाले परंतु त्यांनी हे राज्य घेण्याचे ठरवले तर आमची अवस्था अतिशय वाईट होईल, मोगल निघून गेले तरी देखील छत्रपती संभाजी महाराजांच्या स्वारीचा धोका पुन्हा आहेच. आमच्या आरमारात माणसे नाहीत. विश्वासू अधिकारी नाहीत, किल्ले निरुपयोगी झालेत, गोलंदाजाची आणि दारूगोल्याची कमतरता आहे. द्रव्याची टंचाई आहेच, हे राज्य आमच्या हातून निसटण्याची भीती आहे …. "
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
..
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment