ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶️६ जानेवारी इ.स.१६६४
सुरतेवरील स्वारी
सुरत लुटीचा पहिला दिवस. सकाळी आकरा वाजता लूटीला सुरूवात झाली. अहोरात्र लूट चालली होती. आख्खी जकात लूटली गेली. सुरतचा खुबसूरत सुभेदार इनायद खान "बहाद्दर" शेपूट घालून किल्ल्यात लपून बसला. रक्षणासाठी त्याने काहीही केले नाही. उलट भरपूर लाच खाऊन सुरतच्या नामांकित व्यापार्यांना सहकुटूंब किल्ल्यात घेतले. आक्रमणातही इनायतखानाने लाच खायची संधी सोडली नाही. पूर्ण सुरतेची पळता भूई थोडी झाली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
▶️६ जानेवारी इ.स.१६६५
सुवर्णतुला....
श्री क्षेत्र महाबळेश्वर येथील शंकर मंदिरात शिवाजी महाराजांनी राजमाता जिजाऊ साहेब व सोनोपंत डबीर यांची सुवर्णतुला केली.
या दिवशी सूर्यग्रहण होते.
या मंदिरापासून समर्थ स्थापीत मारूती व मठ जवळच आहे. या दिवशी महाबळेश्वराचे मंदिर गजबजून गेले होते. ग्रहणकाल लागला.
स्नानादि विधी झाले आणि एका पारड्यात आईसाहेबांना बसविण्यात आले. दुसर्या पारड्यात सोन्याच्या मोहरा-पुतळ्या टाकण्यास सुरूवात झाली.
शास्त्री पंडीत तुलादानविधीचे मंत्र म्हणत होते. आईसाहेबांना या सोहळ्यापेक्षा शिवबाचेच कौतुक वाटत होते. माझा मुलगा !
केवढा रम्य आणि संस्मरणीय प्रसंग हा ! उंचच उंच सह्याद्रीचे ते वृक्षाच्छादित शिखर. तेथे ते प्राचीन शिवमंदिर. जवळच पंचगंगांच्या उगमधारा खळखळताहेत. ब्राह्मण वेदमंत्र म्हणताहेत. एका पारड्यात आई बसलेली आहे आणि एक मुलगा दुसर्या पारड्यांत ओंजळीओंजळीने सोने ओतीत आहे. मातृदेवो भव ! पितृदेवो भव ! आचार्य देवो भव ! राष्ट्राय देवो भव !
जगाच्या इतिहासात इतक उदात्त उदाहरण दूसरीकडे नाही.
ही आमची संस्कृती आहे. "मदर्स डे" ही आमची संस्कृती नाही. वर्षातील केवळ एक दिवस आईसाठी नसतो. आमचे आवघे आयुष्य आई-वडिलांना समर्पित आहे. अभाग्या हिंदूंनी आजच्या दिवशी किमान आपल्या आईला नमस्कार तरी करावा ! सोनोपंतांचे नाव आज खर्या अर्थाने सार्थ झाले. दोनिही तूळा पार पडल्या.
सोनोपंत यावेळी खूप थकले होते.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
▶️६ जानेवारी इ.स.१७५१
ईश्वरसिंगराजे यांचा प्राण गेला. जयपुरात ही बातमी कळल्यावर सर्वत्र हाहाःकार झाला. मराठ्यास हे वृत्त समजल्यावर त्यांनी ईश्वरसिंगास अग्नी देण्याची व्यवस्था केली आणि त्याचा धाकटा भाऊ माधोसिंग ह्यास जयपुरात आणून तक्तावर तारीख २९ नोव्हेंबर १७५० रोजी बसविले. जयाप्पा शिंदे तारीख ६ जानेवारी १७५१ रोजी जयपुरास येऊन होळकरास मिळाले. माधोसिंगानी मराठ्यांस जयपुरच्या राज्याचा तिसरा हिस्सा निदान चौथा हिस्सा तरी द्यावा हे अगोदर ठरले होते. त्याप्रमाणे मराठ्यांनी माधोसिंगापाशी मागणी केली. मराठ्यांच्या ह्या मागणीस राजा माधोसिंगानी विरोध करावा म्हणून रजपूत मांडलिक व शेखावत रजपूत वीर माधोसिंगाभोवती जमा झाले. माधोसिंगास ह्यामुळे मराठ्यांचा नक्षा उतरविण्यास नवीनच जोम चढला. त्यास कपट आठवले. मराठ्यास सोमलखार मिश्रीत पक्वान्ने करून पिण्याच्या पाण्यात विष घालून जेवणास बोलावून मारावे असा बेत केला. परंतु जयाप्पानी जेवणास जाण्याचे नाकारिले. त्यामुळे मराठे सरदार वाचले. पुढे तारीख १० जानेवारी १७५१ रोजी सुमारे पाच हजार मराठे जयपूर शहर पहाण्यास बोलाविल्यावरून गेले. त्यात शिंद्यांकडील मातबर सरदार बरेच होते. शहरांत मराठे आल्यावर माधोसिंगाच्या हुकूमाने शहरचे दरवाजे बंद करण्यात आले. आणि मराठ्यांच्या कत्तलीस सुरवात झाली. दोन प्रहरपासून प्रहर रात्रीपर्यंत तीन हजार मराठे लोक कापून काढिले. एक हजार मराठे जखमी झाले. जयाप्पा शिंदे यांजकडील मातबर सरदार वगैरे फार मारले गेले. जे मराठे गांव कुसावरून उड्या घालून आले त्यांचे पाय व कमर मोडली असे वर्तमान झाले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
▶️६ जानेवारी इ.स. १७७२
शाहजादा जवानबख्ताने सुभेदार म्हणून विसाजी कृष्ण याची नेमणूक केली. त्यामुळे दिल्लीच्या आजूबाजूच्या आणि उत्तरेकडील मुलखातून महसूल गोळा करण्याचे हक्क विसाजींना मिळाले. हा महसूल पूर्वी नजीबखान खात होता. जवानबख्ताच्या सल्लागार मंडळात आता महादजी शिंदे आणि विसाजी कृष्ण आले. त्यांनी एकूण कारभारच ताब्यात घेतला. मराठ्यांचा हा बहुमान होता. मराठ्यांना आता निकड होती पैशाची. बादशाहाला दिल्लीत आणून स्थानापन्न करण्यासाठी त्यांना बादशाहाकडून पंचवीस लाख रुपये मिळणार होते. इतरही बरेच हक्क मराठ्यांना मिळणार होते. मराठ्यांकडून निरोप येताच बादशाह शाहआलाम हा अलाहाबाद सोडण्याच्या तयारीला लागला. तो दिल्लीकडे निघाला असताना वाटेत फर्रुखाबादेला त्याने बंगशाच्या वारशाबाबत पैशाची मागणी केली. अहमदखान बंगश नुकताच मृत्यू पावला होता आणि त्याचा मुलगा कारभार पाहात होता. बंगशाचा कारभारी फकरुद्दौला याने बादशाहाची पौशाची मागणी अमान्य केली आणि अफगाण सैनिक जमवले. बादशाहाने महादजी शिंदे यांच्याकडे मदत मागितली मोठा तोफखाना घेऊन स्वतः महादजी शिंदे निघाले. मराठी सेनेच्या या आक्रमणाची नुसती बातमी ऐकताच फकरूद्दौला दाती तृण धरून शरण आला. त्याने परस्पर बादशाहाशी समझोता केला. फर्रुखाबादेच्या लढाईत मोठे घबाड हाती लागेल या आशेने निघालेल्या महादजी शिंदे यांच्या हाती मात्र काहीच लागले नाही. महादजी नबीगंज येथे बादशाह शाहआलम याची वाट पाहात थांबला. बादशाह फर्रुखाबादेहून निघाला. बादशाहा नबीगंजला येताच स्वतःच्या सैन्याच्या रक्षणाखाली त्याला घेऊन महादजींनी दिल्लीची वाटचाल चालू केली. ६ जानेवारी १७७२ रोजी शाहआलमने मराठी संरक्षणाखाली मोठ्या दिमाखाने दिल्लीत प्रवेश केला. दिल्लीच्या जनतेने बादशाहाचा मान ठेवत त्याला मुजरे घातले. शाही हत्ती दिल्लीत हिंडू लागला. मराठी वीर दिल्लीत फिरू लागले. परत एकदा दिल्ली मराठी वीरांनी आपल्या छत्राखाली आणली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
▶️६ जानेवारी इ.स.१६७३
अनाजीपंत व कोंडाजी फर्जंद यांनी पन्हाळगडच्या मनसुब्यासाठी रायगड सोडला. शिवाजी महाराजांनी मोहिमेच्या आधीच कोंडाजी फर्जंदांच्या हातात सोन्याचे कडे चढवून सर्फराजी केली. आता गड मारण्याशिवाय पर्यायच नव्हता. विजयाच्या आधीच बक्षीस मिळाले होते.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
▶️६ जानेवारी इ.स.१७९१
जपुतांचा कायमचा निकाल लावण्यासाठी महादजींची स्वारी दिनांक २८ ऑगस्ट १७९० रोजी डेरेदाखल झाली. जयपूर व मारवाड या दोन संस्थानावर जाण्याच्या रोखे निघाली. तारीख ११ सप्टेंबर १७९० रोजी राठोडांशी मातबर लढाई झाली. लढाईचे समयी मराठे फौज राठोडवर चालून गेली. राठोडानी फार प्रतिकार केला. पण मराठ्यांच्या चढाईपुढे त्यांचा टिकाव न लागता राठोडाचे फौजेचा बीमोड होऊन राठोड पळून गेले. मराठ्यास यश प्राप्ती झाली. त्यानंतर अजमीरपावेतो जाण्याचा विचार करून महादजींची स्वारी मारवाडात दाखल झाली. इतक्यात जोधपूरचा राणा बिजेसिंग याने आपला वकील महादजीकडे सलुखाचे बोलणे करण्यास पाठविला. तेव्हा सलुखाचे बोलणे होऊन दिनांक ६ जानेवारी १७९१ रोजी तह कायम झाला. ह्या तहान्वये जोधपूरचा राणा बिजेसिंग याने मराठ्यास ६० लक्ष रुपये द्यावे असे ठरले. त्याशिवाय सांबर निम्मा अंमल, दोन लक्षाचे दोन महाल व अजमीर किल्ला द्यावा असा ठराव झाला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
..
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

Comments
Post a Comment