ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

▶️ ७ जानेवारी इ.स.क१६६४
(पौष वद्य पंचमी शके १५८५ संवत्सर शोभन वार गुरूवार)

महाराजांवर हल्ल्याचा प्रयत्न!
महाराजांनी डच वकील निकोलास कॅलोस्टोमार्फत निरोप पाठवला. इनायत खानाने महाराज सुरतेची करत असलेली लुट पाहून, बोलणी करण्याच्या बहाण्याने एक वकील पाठमीला मात्र बायकांसारखा किल्ल्यात दडुन बसलेला इनायत खान प्रजेला वाऱ्यावर सोडून छत्रपती शिवाजी महाराजांना च जाचक अटी घालू लागला. ते पाहून महाराज संतापले आणि म्हणाले की "अशा अटी मान्य करायला तुझा मालक आम्हाला स्त्री समजतो की काय? त्याच वेळी त्या वकिलाच्या रुपात बोलणी करायला आलेल्या तरुणाने अकस्मात खंजीर काढून महाराजांच्या छातीत खुपसायचा प्रयत्न केला. मात्र महाराजांचे सावध अंगरक्षक महादेव व सोमाजी नाईक यांनी त्या वकिलाचे हावभाव ओळखूनच त्याचा हल्ला कारीगर होण्याआधीच त्याचे दोन तुकडे केले. आपल्या सामंजस्सेच्या भूमिकेला प्रतिसाद देण्याचे सोडाच परंतु खुनी हल्ला करण्याच्या प्रयत्नामुळे महाराज आणि सैन्य संतापले. आणि त्यानंतर मात्र सुरतेची बदसुरत करण्याचे फर्मान सुटले! (सूरतेवरील प्रथम स्वारी) सुरतेच्या लुटीचा दूसरा दिवस. सकाळी १०, दहा वाजता सुरतेच्या सुभेदार इनायतखानाने वकिलामार्फत छत्रपती शिवाजी महाराजांवर शस्त्रप्रयोग केला. त्यात तो वकील मराठ्यांकडून ठार झाला. ही घटना पाहणार्या स्मीथ नावाच्या इंग्रजाने वखारीत गेल्यावर वृत्तांत सांगितला. इस्कालिअट या व्यक्तिने हा वृत्तांत लंडनला कळवला. त्या वृत्तांताचा हिंदवी तर्जुमा जसाच्या तसा... "गुरूवारी सकाळी सुभेदाराकडून तडजोडीचे बोलणे करण्यास आलेल्या तरूण मुसलमानाला महाराज बोलले की, "या अटी मान्य करायला आम्ही काय बायका आहोत असे सुभेदाराला वाटते की काय?" त्यावर, "आम्ही पण बायका नाही; हे घे" असे उलट बोलून तो तरूण महाराजांच्या अंगावर खंजीर घेऊन धावला. त्याच्या खंजीराचा हात वरच्यावर दुसर्याने छाटला असताहि तो त्या भरात महाराजांच्या अंगावर रक्तामुळे महाराज मेले अशी एकच हाकाटी होऊन सर्व कैद्यांची डोकी मारावी अशी हूल उठून काही थोडे कैदी प्राणाला मुकलेच. आदळून दोघेही कोलमडून पडले व महाराजांच्या अंगावर दिसणार्या त्या खुनी मुघलांच्या रक्तामुळे महाराज मेले अशी एकच हाकाटी होऊन सर्व कैद्यांची डोकी मारावी अशी हूल उठून काही थोडे कैदी प्राणाला मुकलेच. पण तितक्यात महाराजांनी आपल्यास सोडवून घेतले व दूसर्याने त्या खून्याचे डोकेही फोडले. तेव्हा महाराजांनी तत्काळ कत्तल थांबवण्याचा हुकूम दिला व कैद्यांना समोर आणून उभे केले आणी मर्जीप्रमाणे हात, पाय, डोके तोडण्यास हुकूम देण्याचा सपाटा चालवला. जेव्हा स्मिथची पाळी आली व त्याचा उजवा हात कापण्याची तयारीही झाली तेव्हा तो हिंदीत मोठ्याने ओरडला, " त्यापेक्षा माझे II डोकेच उडवा !" महाराजांने ते मान्य करून त्याची टोपिही डोक्यावरून काढून ठेवली गेली. पण महाराजांना काय वाटले कोणास ठाऊक त्याने एकाएकी कत्तल थांबवली. व स्मिथ वाचला. तोपर्यंत ४ डोकी व २४ हात कापले गेले होते. त्यापुढे वर लिहिल्याप्रमाणे स्मिथ वखारीत पाठवण्यात आला." कसा भयंकर प्रसंग आहे हा ! गुन्हेगाराला लगेच शासन केले गेले. महाराजांच्या अनुयायांनी महाराजांच्या "परवानगीची" वाट न पाहता. त्या मुसलमानाचा शिरच्छेद करून टाकला. समिती नेमणे, पुरावे गोळा करणे, सज्जड दम देणे वगैरे भूरटे प्रकार शिवशाहीला मंजूरच नव्हते. दहशतवादाचे आव्हान अशाच प्रकारे संपूष्टात आणावे लागते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

▶️ ७ जानेवारी इ.स.१६७९
दर्यासारंग (आरमाराचा पहिला सुभेदार) आणि इब्राहीम खान (आरमारातील अधिकारी) यांनी बसनूर लढाईत पराक्रम गाजवला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

▶️ ७ जानेवारी इ.स.१६८०
थळ किल्ल्यावरून मराठ्यांनी आणि उंदेरी वरून सिद्दीने एकमेकांवर तोफांचा मारा केला. उंदेरीवर सिद्दीच्या ताब्यामुळे मराठे अत्यंत नाराज होते. त्यांनी सिद्दीला उन्देरीवरून हुस्कुन लावण्याचे अनेक असफल प्रयत्न केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

▶️ ७ जानेवारी इ.स.१६८४
(माघ शुद्ध एकादशी शके १६०५ संवत्सर रुधिरोद्रारी वार सोमवार)

मराठे आणि पोर्तुगीज यांचा तह!
   छत्रपती संभाजी महाराजांकडून कवी कलश, व शहजादा अकबराच्या मदतीने भिमगड परिसरात पोर्तुगीज व मराठ्यांच्या मध्ये तह घडवून आणला. फोंडा येथे हा तह पोर्तुगिजांनी घडवून आणून मराठ्यांच्या आक्रमणापासून तह करून सुटकेचा निःश्वास टाकला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

▶️ ७ जानेवारी इ.स.१७३८
निजाम-बाजीराव पेशवे यांच्यात सराई-दुराईचा तह.
भोपाळची लढाई ही बाजीराव व निजाम यांच्या लष्करी सामर्थ्याची कसोटी ठरणारी दुसरी महत्त्वाची लढाई होय. याही सुमारास बाजीरावाने मोठी फौज घेऊन डिसेंबर १७३७ मध्ये नर्मदा ओलांडली आणि शत्रूच्या हालचालींवर लक्ष ठेवण्यासाठी आपले गुप्तहेर धाडले. निजाम उत्तरेकडून भोपाळजवळ आला. मराठी सैन्याने तोफखान्यापासून अलिप्त राहून मोगलांच्या सैन्यास गनिमी युद्धतंत्राने बेजार केले. त्यावेळी निजामाने मराठी फौजांपासून संरक्षण मिळावे, म्हणून भोपाळच्या तटबंदीयुक्त किल्ल्यात आश्रय घेतला आणि संरक्षणाच्या दृष्टीने खबरदारी घेतली. तीच गोष्ट बाजीरावाला हवी होती. त्याने भोपाळला वेढा दिला आणि सर्व बाजूंनी रसद तोडली. निजामाच्या तोफखान्यामुळे मराठ्यांचे सैन्य दूरवर राहिले; पण भोपाळ सोडून निजामाला फार दूरवर जाता येईना व मराठ्यांनी घातलेल्या वेढ्याची फळी फोडता येईना. शिवाय त्याचा मुलगा बऱहाणपूरपर्यंतही पोहोचला नव्हता. तेव्हा नाईलाजाने निजामाने तहाची बोलणी सुरू केली. शेवटी दोराहसराई या ठिकाणी तह होऊन निजामाने बाजीरावाच्या सर्व अटी मान्य केल्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

▶️ ७ जानेवारी इ.स.१७३९
चिमाजीअप्पांनी वसईच्या किल्याला वेढा घातला. चिवट पोर्तुगीजांनी तब्बल चार महिने मराठ्यांच्या वेढ्याला दाद दिली नाही. मे महिन्याच्या सुरवातीला चिमाजीअप्पा प्रचंड संतापले आणि मराठ्यांच्या फौजेसमोर जाऊन म्हणाले की "कोट जिंकता येत नसेल तर ठीक आहे. मला तोफेच्या तोंडी बांधून माझे मस्तक तरी कोटात जाऊन पडेल असे करा. मला त्यानेच समाधान वाटेल."
चिमाजीअप्पांच्या या विधानाने मराठी फौजांत आवेश संचारला. मसलती झाल्यावर किल्याच्या तटबंदी खाली सुरूंग पेरण्यात आले. सुरूंगास बत्ती दिली क्षणार्धात एक प्रचंड मोठा बुरूज आसमंतात उडाला. बुरूजाबरोबर साठएक पोर्तुगीज सैनिकही उडाले. ह्या अचानक भयंकर हल्याची पोर्तुगीजांना कल्पनाच नव्हती. बुरूज उडालेला पाहून मराठ्यांना प्रचंड स्फुरण चढले. बेभान मराठे स्फोटाने पडलेल्या खिंडाराकडे धावले.. आणि अचानक मराठ्यांनीच पेरलेल्या दुसर्‍या सुरंगाचा स्फोट झाला. अनेक मराठे या स्फोटात मारले गेले. पण मराठ्यांचे धैर्य अजिबातच खचले नाही. उलट आणखी त्वेषाने मराठ्यांनी किल्यात घुसण्यास जोर लावला. हर हर महादेव च्या घोषणांनी बेभान झालेले मराठे पोर्तुगीजांवर अक्षरशः तुटून पडले. जलचर चिवट पोर्तुगीजांच्या सैन्यानेही लढण्याची शर्थ केली. पण मराठ्यांच्या या तांडवा पुढे त्याचा टिकाव लागला नाही.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments