ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶️ २६ जानेवारी इ.स.१६४५
आजपासून ३७५ वर्षापूर्वी एक अशी घटना घडली कि पुन्हा कोणाचीही हिम्मत झाली नाही कुठल्याही आई-बहिणीकडे नजर वाकडी करून पाहण्याची ....... पण आज आमच्याकडे आज कुठलीही आई, बहिण, मुलगी, पत्नी हि सुरक्षित नाही. खूप विचार करण्यासारखी गोष्ट आहे. म्हणूनच छत्रपती शिवाजी महाराज डोक्यावर घेऊन नाचू नका, पण त्यांचे विचार डोक्यात घेऊन कार्य करण्याचा प्रयत्न करा.
!! २६ जाने १६४५ !!
!! रांझ्याच्या पाटलाची गोष्ट ही सर्वश्रुत आहे. रांझे गावचा पाटील बाबाजी गुजर याने गावकीतल्याच एका गरीब शेतकऱ्याच्या तरूण मुलीला दिवसाढवळय़ा सर्वासमक्ष पळवून तिच्यावर बलात्कार केला, अब्रुच्या भीतीने तीने जीव दिला! सारा गांव हळहळता पण मुकाच राहिला!.. पण छत्रपती शिवरायांच्या कानी ही गोष्ट आली. ते सालं होतं १६४५ आणि शिवरायाचं वय होत केवळ पंधरा वर्षे परंतु या वयातही छत्रपती शिवरायांनी मुजोर बाबाजी गुजरला पकडून आणले. खटला चालवून बाबाजी गुजर या पाटलांचा चौरंगा केला. चौरंगा करणे एक हात पाय कलम करणे, विचार करा ही शिक्षा जर आजच्या काळात अमंलात आणली तर काय होईल! परंतु याच शिक्षेमुळे साऱ्याच मावळ खोऱ्यावर एक प्रकारची दहशत बसली. रयत लहानग्या छत्रपती शिवरायांवर अक्षरश: खुश झाली. स्त्रियांच्या अब्रु रक्षणाबाबत जर छत्रपती शिवराय असे धोरण अवलंबत असेल तर त्यांच शिवबांसाठी रयत काहीही करायला तयार झाली. छत्रपती शिवरायांचे वय १५ वर्षांचे पण त्यांच्या याच न्याय स्वभावामुळे अनेक मराठे त्यांच्या फौजेत नुसते सामीलच झाले नाही तर मरायला सिद्ध झाले. कारण ज्यांच्या पाठबळावर राजांनी राज्य करायचं त्या वतनदार, पाटील, देशमुख आदी मंडळीची सुद्धा गय न करता त्यांना शिक्षा करायची धमक शिवरायांच्या ठायी होती.
याच दिवशी रांझ्याच्या पाटलाला शिक्षा दिली गेली आणि इथूनच एका क्रांतीची सुरूवात झाली.. !!
!! चला तर मग छत्रपती शिवरायांना मानाचा त्रिवार मुजरा करत आपणा सर्वांना ७६ व्या भारतीय प्रजासत्ताक दिनाच्या हार्दिक शुभेच्छा !!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ २६ जानेवारी इ.स.१६६२
शाहीस्तेखान सोबत आलेल्या मुघल फौजेने पवन मावळातील लोहगड, विसापूर, तिकोना या किल्ल्यांच्या भागात चढाया केल्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ २६ जानेवारी इ.स.१६७१
छत्रपती शिवाजी महाराजांनी इ. स. १६७० पासून संभाजीराजांस राज्यकारभारांत गुंतविले. ह्या वेळपर्यंत छत्रपती शिवाजी महाराजांच्या गैरहजेरीत राजधानी रायगडावर मुखत्यारीने राज्यकारभार पाहणाऱ्या राजमाता जिजाबाई वृद्ध झाल्याने राज्याचा कारभार २६ जानेवारी १६७१ रोजी महाराजांनी युवराज संभाजीराजांस सांगितला. संभाजीराजांस कारभार मिळण्यापूर्वी ते महाराजांच्या दरबारांत बसत व शिष्टाचार घेत असत. त्यांच्यावर आपल्या गैरहजेरीत राज्यकारभार सोपविल्यावर
महादजी यमाजी नावाच्या कारकुनांची नेमणूक सालींना १०० होनावर करून त्यांस संभाजी महाराजांकडे लावून दिले. युवराज संभाजीराजांवर आपल्या अनुपस्थितीत राज्याचा कारभार सोपविल्यानंतर युवराज संभाजीराजे रायगडी बसून महाराजांच्या अनुपस्थितीत राज्यकारभार पाहू लागले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ २६ जानेवारी इ.स.१६७४
"शहजादा अकबर" आजच्या दिवशी आसदखानसोबत काबुलच्या स्वारीवर गेला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ २६ जानेवारी इ.स.१६८०
१६७६ मध्ये जंजिऱ्यात आणखी एक क्रांती झाली सिद्दी संबूळ आणि सिद्दी कासिम यांच्यामध्ये संघर्ष होऊन सिद्दी कासिमने आरमाराची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली. तेव्हा सिद्दी संबूळने छत्रपती शिवाजी महाराजांकडे मदतीची याचना केली. जंजिऱ्यावर अधिपत्य निर्माण करण्याची ही एक सुवर्णसंधी चालून आली होती. परंतु सिद्दी कासिम याला मुघल आणि इंग्रज यांच्याकडून सतत कुमक मिळत असल्यामुळे त्यांनी सिद्दी संबूळला दाद दिली नाही. अशाप्रकारे सिद्दी आणि मराठे यांच्यात संघर्ष चालू असताना खांदेरी-उंदेरी प्रकरण उद्भवले. १६७९ मध्ये खांदेरी बेटावर तटबंदी बांधण्याचे काम शिवाजी महाराजांनी सुरू केले. तेव्हा सिद्दी कासीमने जानेवारी १६८० मध्ये खांदेरीजवळ असलेले उंदेरी बेट ताब्यात घेऊन शिवाजी महाराजांना विरोध सुरू केला. मराठ्यांचा आरमार प्रमुख दौलतखान यांनी २६ जानेवारी १६८० रोजी २००० फौजेनिशी उंदेरीवर हल्ला केला. परंतु सिद्दी कासीमने एवढा जबरदस्त प्रतिकार केला की दौलतखान यांना माघार घ्यावी लागली. उंदेरी सिद्दींच्याच ताब्यात राहिल्यामुळे खांदेरीवर नियंत्रण ठेवणे त्यांना सोपे झाले. अशा प्रकारे सिद्दी विरुद्ध संग्रामात मराठ्यांना माघार घ्यावी लागली. सिद्दींना यश येण्याचे प्रमुख कारण म्हणजे मुघल आणि इंग्रज यांच्याकडून मिळणारी मदत हेच होय. विशेष म्हणजे सिद्दींनी आरमारी सामर्थ्याप्रमाणे तोफखान्याचे सामर्थ्यही मोठे वाढविले होते. आधुनिक पद्धतीच्या लांब पल्ल्याच्या तोफा सिद्दीकडे होत्या त्यामुळे मराठ्यांना वारंवार माघार घ्यावी लागली सिद्दी मराठा संघर्ष पुढेही चालूच राहिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ २६ जानेवारी इ.स.१७४०
दि. २६ जानेवारी १७४० या दिवशी नानासाहेबांनी मस्तानीला पर्वतीच्या बागेत कैद केले. नानासाहेबांनी लगेच चिमाजीआप्पांना घडलेले सारे पत्राद्वारे कळवले आहे. नाना लिहितात, "मस्तानीस बागास बोलावून कैद
केली. कोणी हत्यार धरिले नाही. रात्री घरास घेऊन जाऊ. मग घरी ठेवावेसे जाले तर स्वामींचे (आप्पांचे) लिहिल्याप्रमाणे बंद करून ठेवू अथवा चोरून दहा माणसे बरोबर देऊन कोथळागड (घनगड) येथे भलते जागा पाठवू. स्वामींनी राऊंचा जीव जतन करावा..." यानंतर मात्र नानासाहेबांनी मस्तानीला शनिवारवाड्यातल्या तिच्याच महालात नेऊन भवताली चौक्या बसविल्या. नंतर चिमाजीआप्पा पैठण येथे बाजीरावांपाशी गेले. यावेळेस
बाजीराव आणि चिमाजीआप्पा यांच्यात मस्तानीबद्दल अनेक वाद झाले असावेत, असे वाटते. आप्पांनी राऊंना समजावण्याचा आटोकाट प्रयत्न केला. पण बाजीरावांना ते काही पटले नाही. शेवटी नाईलाजाने बाजीरावांची तब्येत जपण्यासाठी चिमाजीआप्पांनी मस्तानीला कैदेतून सोडून बाजीरावांकडे रवानगी करण्याचे ठरवले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ २६ जानेवारी इ.स.१८३१
क्रांतिवीर संगोळी रायन्ना या स्वातंत्र्य योद्ध्याचा जन्मदिवस १५ ऑगस्ट पुढे जाऊन भारताचा स्वातंत्र्यदिवस ठरावा आणि प्रजेच्या स्वातंत्र्यासाठी लढणाऱ्या या वीराला ज्या दिवशी फाशी देण्यात आली तो दिवस २६ जानेवारी पुढे जाऊन भारताचा प्रजासत्ताक दिन ठरावा यासारखा एकमेव्द्वितीय योगायोग म्हणजे जणू भारत-भारतीने आपल्या वीरपुत्रास देलेली हि आदरांजलीच म्हणावी लागेल...
क्रांतिवीर संगोळी रायन्ना कित्तूर साम्राज्याचे सरसेनापती ब्रिटीशांविरोधात सलग-सतत सहा वर्षे लढून, त्यांना 'सळो की पळो' करून सोडणारे आणि वेळोवेळी संकटात आणणारे एक महान क्रांतिकारक तलवारीच्या टोकावर इंग्रजांना आव्हान देणारा योद्धा स्वातंत्र्यासाठी प्राणाची आहुती देऊन, फासावर जाणारे स्वातंत्र्यवीर मरण समोर असताना देखील पुन्हा जन्म घेऊन इंग्रजांना भारतातून बाहेर काढण्याची इच्छा व्यक्त करणारे भारतमातेचे सच्चे वीरपुत्र याच व्यक्तिमत्वा बद्दल घेतलेला हा आढावा..
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
..
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment