ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष





⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

▶️ ८ जानेवारी इ.स.१०२६
गझनिच्या मेहमुदाचे सोमनाथ मंदिरावर आक्रमण.
महमूद गझनिच्या हिंदुस्तानवरील १७ हल्ल्यांपैकी १६ वा आणि सर्वात भयानक असा हल्ला म्हणजे सोमनाथ मंदिरवरील हल्ला होय. सोमनाथ मंदिर त्यावेळी त्याच्या संपत्तीसाठी प्रसिद्ध होते..सोमनाथाचे शिवलिंग अनेक पाचू,हीरे,माणके यानी सजवले होते.त्यामुले ते शिव लिंग अक्षरशः लखलखत होते.डिसें.१०२५ च्या दरम्यान महमूद गझनी सोमनाथ मंदिराजवळ पोचला.३ दिवसानी हिंदूंचा प्रतिकार मोडून काढण्यात मुस्लिम यशस्वी ठरले आणि त्यानी मंदिरात प्रवेश केला आणि काय???? मंदिरात होते ते फ़क्त सोमनाथाच्या नावाने घंटानाद करणारे,कोणताही प्रतिकार करू न शकणारे असे हजारो निःशस्त्र हिन्दू....!!!
मग काय?? मेहमुदाने त्या सर्वांची थंड डोक्याने कत्तल केली.यावेळी सुमारे ५०००० हिंदूंची कत्तल करण्यात आली होती.तसेच त्याने शिवलिंग उपटून काढले.वैभव संपन्न असे सोमनाथ मंदिर पूर्णपणे लुटले गेले.तसेच त्यावेळी केलेल्या लुटित जवळपास ६.५ टन सोन्याचा समावेश होता एवढे ते मंदिर वैभव संपन्न होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

▶️ ८ जानेवारी इ.स.१६५८
शिवाजी महाराजांनी माहुली गड काबीज केली. नंतर राजमाची, लोहगड हे डोंगरी किल्ले जिंकले. ह्या यशामुळे शिवाजी महाराज पुणे ते ठाणे येथील प्रदेशांचे निर्विवाद स्वामी बनले. शिवाजी महाराजांचे सामर्थ्य दिवसेंदिवस वाढत गेले आणि त्या प्रदेशातील सर्व किल्ले त्यांनी सर केले. त्यामुळे उत्तर कोकणात त्यांचा पाया भक्कम झाला. उत्तरेकडील भाग जिंकल्यामुळे शिवाजी महाराजांना पुष्कळ संपत्ती आणि व्यापारी मालाचा लाभ झाला. सध्याच्या रायगड जिल्ह्यावर त्यांचा विजय तर अधिक सुकर झाला. कारण त्या तेथील बहुतेक स्थानिक प्रमुख आदिलशाही सत्तेचे अन्यायी सत्ता झुगारून मुक्त होऊ इच्छित होते. त्यांनी शिवाजी महाराजांना लगेच सहकार्य केले. शिवाजी महाराजांनी सुरगड, तळा, घोसाळगड, भुरच, कांगोरी हे किल्ले ताब्यात घेतले. आजच्या ठाणे आणि रायगड जिल्ह्याचा पुष्कळसा भूभाग शिवाजी महाराजांच्या अंमलाखाली आला. ह्या भरघोस विजयामुळे विजापूर दरबारचा मांडलिक असणाऱ्या जंजिऱ्याच्या सिद्याचे बरेच नुकसान झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

▶️ ८ जानेवारी इ.स.१६६४
सुरतेवरील स्वारी - लूटीचा तिसरा दिवस
इनायतखानाने दग्याचा प्रयोग केल्यामूळे मराठे सरसहा चवताळून उठले. हजारो मशाली पेटल्या व सुरतेच्या रस्त्यावरून हे मशालजी आगी लावीत धावत सुटले. मराठे ढोल बडवीत मशाली घेऊन धावत होते. शहारांत आता आगीचे राज्य होते. जिथे आग नव्हती, त्या घरात मराठ्यांचे राज्य होते. मराठे घराबाहेर पडतांच घरात आग घुसत होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

▶️ ८ जानेवारी इ.स.१६८९
नाशिकच्या आग्नेयीस २० मैलांवर त्रिंबकगड आहे. त्रिंबकगडचा अधिकारी किल्लेदार केशव त्रिमल हे मुघलांनी रामशेज किल्ल्यास वेढा घातला त्यावेळी रामशेजला दारूगोळा व युद्धसाहित्य पुरवीत असे. इ. स. १६८२ च्या फेब्रुवारीत मुघल सरदार बाहारामत खान याने त्रिंबकगडच्या तीन वाड्या जाळल्या. जाळलेल्या तीन वाड्या मराठ्यांनी पुन्हा बसविल्या. तरी १६८४ च्या नोव्हेंबरात मुघल अधिकारी अकरमत खान आणि मरहमत खान यांनी पुन्हा त्या वाड्या जाळून ते मराठ्यांवर चालून गेले व त्यांनी मराठ्यांचा पराभव केला तरीही त्रिंबकगड मुघलांस शरण आला नाही तेव्हा तो गड घेण्यासाठी मुघल सरदार मातबरखान याने १६८८ च्या ऑगस्ट महिन्यात वेढा घातला. किल्ल्याभोवती चौक्या बसवून मातबरखानाने दाणागोटा बंद केला. किल्ल्यातील लोक हवालदिल झाले. दिनांक ८ जानेवारी १६८९ रोजी त्रिंबक किल्ल्याचे मराठे अधिकारी तैलंगराव श्यामराव हे किल्ल्यावरून खाली उतरले आणि त्यांनी किल्ल्याच्या चाव्या मोगल सरदारांच्या स्वाधीन केल्या. मातबरखानाने त्रिंबकचा किल्ला जिंकून घेतला म्हणून औरंगजेब बादशहाने त्यास रुपये तीस हजार बक्षीस दिले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

▶️ ८ जानेवारी इ.स.१६९५
गाजीउद्दीन बहादूर याने चौंद ( जावंद, चावंड)चा किल्ला जिंकून घेतला होता. त्याच्या सोन्याच्या किल्ल्या औरंगजेबाच्या नजरेखालून गेल्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

▶️ ८ जानेवारी इ.स.१६९७
छत्रपती राजाराम महाराजांनी इंदोरी हा गाव सरदार खंडाराव दाभाडेंना इनाम दिला. पुढे खंडाराव दाभाडे यांना छत्रपती शाहू महाराज यांनी सरसेनापतीपद दिलं. इंदोरीचं वतन त्यांना राजाराम महाराजांकडून आधीच देण्यात आलं होतं. पुन्हा शाहू महाराजांकडूनही इंदोरी गाव दाभाडे‌ घराण्यास वतनात मिळालं. त्यानंतर इंदोरी गावात नऊ बुरूजांचा भुईकोट प्रकारातला गड खंडेराव दाभाडे यांनी नदीकाठी बांधून घेतला. इंदोरी किल्ल्याचं मुख्य प्रवेशद्वार पूर्व दिशेला असून, पश्चिम तटबंदी इंद्रायणी नदीला समांतर रेषेत बांधलेली आहे. त्यामुळे हा गड चौकोनी किंवा एकसलग काटकोनात दिसणाऱ्या शनिवारवाडा किंवा अहमदनगरच्या भुईकोट किल्ल्यासारखा न दिसता थोड्या प्रमाणात त्रिकोणी आकारात दिसतो.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

▶️ ८ जानेवारी इ.स.१८८४
शके १८०५ च्या पौष शु. ११ रोजी उत्कृष्ट वक्ते, श्रेष्ठ कार्यकर्ते आणि विख्यात लोकसेवक केशवचंद्र सेन यांचे निधन झाले.

यांचे घराणे कट्टे बंगाली वैष्णव होतें; यांच्या आजाचे नांव रामकमल असून प्यारीमोहन व शारदासुंदरी हीं यांच्या मातापितरांची नांवें होतीं, शाळेत असतांना बायबलाच्या वाचनाचा परिणाम यांच्या मनावर विशेष झाला आणि सन १८५७ मध्ये कुलामध्यें रूढ असणाच्या वेष्णव सांप्रदायाची दीक्षा न घेतां ब्राह्मसमाजाची त्यांनीं दीक्षा घेतली आणि या कार्यासाठी स्वतःला वाहून घेतले व 'इंडियन मिरर' नांवाचें इंग्रजी साप्ताहिक सुरू केलें. सन १८६४ मध्ये त्यांनी प्रचारासाठी मुंबई-मद्रासकडे जो दौरा काढला तो त्यांच्या प्रभावी इंग्रजी वक्तृत्वाने फार यशस्वी झाला; परंतु शेवटी मतभेद झाल्यामुळे त्यांनी स्वतंत्रपूणे ' भारतवर्षीय ब्राह्मसमाज' नांवाची संस्था सन १८६६ मध्ये काढली. त्यानंतर ते इंग्लंडमध्ये गेले. तेथे त्यांचा समाजसुधारक म्हणून अत्यंत गौरव झाला. तेथून परत मायदेशी आल्यावर समाज सुधारण्यासाठी त्यांनी अनेक संस्था काढल्या. 'सुलभ समाचार' यासाररवी नियतकालिके त्यांनी काढली. शेवटी कांहीं खाजगी गोष्टींवरून यांचे सहकारी फुटून दूर निवाले. त्यांनी केशवचंद्रावर टीकेचा गहजब केला.

या सर्वांचा परिणाम त्यांच्यावर झाला; आणि त्रस्त झालेल्या मनास विश्रांति मिळावी म्हणून यांनी ध्यानधारणेसाठी ' साधनकानन नांवाची बाग तयार केली, परंतु येथेंहि त्यांना म्हणावी अशी शांति लाभली नाही. यांच्या परि- वारांतील लोकांनी स्वतंत्रपणे ' साधारण ब्राह्मसमाज' काढला. त्यामुळे यांच्या मनावर चमत्कारिक परिणाम झाला. तेव्हां यांनी ' नवविधान' नांवाच्या पंथाची स्थापना केली. * यांच्याइतका प्रचंड व्याप करणारा, रोज नव्या कल्पना काढणारा, नव्या संस्था काढून त्यांच्याकडून कामे करून घेणारा समाजसुधारक अलीकडच्या काळांत क्कचितच सांपडेल." जीवनवेद (आत्भचरित्र) व ब्राह्मधर्मा - धिष्ठान हे यांचे दोन महत्त्वाचे ग्रंथ होत.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments