ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶️ ९ जानेवारी इ.स.१६३३
शके १५५४ मधील माघ शु. १० ला गुरुवारी पहांटे भंडाऱ्याच्या होंगरावर प्रसिद्ध सत्पुरुष तुकारामबोवा यांना स्वप्नांत गुरुपदेश झाला.
हा गुरुपदेश होण्यापूर्वी तुकारामाची मानसिक व्यथा पाहण्यासारखी आहे. शके १५२० मध्ये एकनाथमहाराज समाधिस्थ झाल्यावर दहाच वर्षांनी तुकोबांचा जन्म देहू येथे झाला. त्यांच्या घरामध्ये भगवद्भक्ति पहिल्यापासूनच असून वडील बोल्होबा यांची पंढरीची वारी अखंडपणे चालू होती. घरी थोडी शेती, व्यापारधंदा व सावकारी होती. या कुटुंबांत वयाची तेरा वर्षे तुकोबांनी आनंदांत घालवली. त्यानंतर त्यांचे लग्न झाले. पहिली बायको दमेकरी निघाली म्हणून दुसरे लग्न केले. बोल्होबांनी सर्व संप्तार तुकोबांच्या गळ्यांत टाकला. तुकाराम- बोवांनीहि आरंभाच्या काळांत चोखपणे संसार केला. पण त्यानंतर एका- मागून एक दुःखाचे डोंगर कोसळले. वयाच्या सतराव्या वर्षी वडील निवर्तले. भावजय मरून गेली. थोरला भाऊ सावजी विरक्त होऊन तीर्थयात्रेस निधून गेला. तुकोबा थोडे दिवस खिन्न झाले. त्यांचे प्रपंचांत मन लागेना. त्यांच्या उदासीन - तेचा फायदा लोकांनी घेतला. देणेकऱ्यांनी पैसे बुडविले, घेणेकऱ्यांनी तगादे लावले, तुकोबांना कर्ज झाले, वडिलार्जित मालमत्ता नाहीशी होऊन दुकानाचे दिवाळे निघाले, दुष्काळ पडून घरची गुरेढोरे मरून गेली, व्यापारांत अतोनात नुकसान झाले, लोकांनी फजितवाडा आरंभला, वडील बायको अन्नान्न करून मरून गेली ! तुकोबांच्या मनाला लज्जा वाटली. शेवटी ' विठो तुझे माझे राज्य । नाहीं दुसऱ्याचे काज -' असा निश्चय करून गावांतील विठ्ठलाची पूजाअर्चा ते करूं लागले, नव्या साधनभार्गात असतांना माघ शु. १० रोजी-
" सत्य गुरुराये कृपा मज केली। परि नाही घडली सेवा काही।
राघव चैतन्य केशव चैतन्य । सांगितली खूण मालिकेची ।।
बाबाजी आपुले सांगितले नाम। मंत्र दिला रामकृष्ण हरी।
माहो शुद्ध दशमी पाहूनि गुरुवार । केला अंगिकार तुका म्हणे ॥ "
यानंतर तुकोबांना ' नित्य नवा दीस जागृतीचा ' दिसूं लागला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
▶️ ९ जानेवारी इ.स.१६३६
शाहजहान त्याच्या दुसऱ्या दख्खन मोहिमेसाठी निघाला. निजामशाही संपवायची ह्या ध्येयाने तो निघाला होता. त्याने हांडियाजवळ जानेवारी १६३६ ला नर्मदा ओलांडली. इथूनच ९ जानेवारीला आदिलशाहला पत्राने तंबी दिली की निजामशाहीमधल्या शाहजी राजा बरोबर असलेल्या सरदारांना पाठिंबा मिळता कामा नये. वर हे सुद्धा लिहीले की त्याने देय असलेली वार्षिक खंडणी १० मार्च १६३६ पर्यंत दौलताबादला पाठवावी. ह्यासाठी शाहजहानने सोलापूर, त्याच्या आसपासचा परिसर व वांगीचा भाग निजामशाहिकडील भाग आदिलशाहला देऊ केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
▶️ ৎ जानेवारी इ.स.१६५८
(पौष पोर्णिमा शके १५७९ संवत्सर हेमलंबी वार शनिवार)
माहुली स्वराज्यात दाखल!
याच ठिकाणी पुर्वी राजे शहाजीराजे यांचे स्वराज्य संस्थापनेचे स्वप्न उधळले गेले होते. महाराज याच वेळी कल्याण-भिवंडीकडे लक्ष ठेऊन होते. अदिलशहाने मोगलांशी तह करून, एका दगडात दोन पक्षी मारले होते. एक तर मोगली आक्रमणापासून आपली सुटका करून घेतली व दुसरीकडे मोगली संकट महाराजांवर ढकलून दिले! पण महाराजही कच्च्या गुरूचे चेले नव्हते. त्यांनी अतिशय खंबीरपणे ही परिस्थिती हाताळली. त्यांनी आपला मोर्चा कोकणाकडे वळवला. कल्याण बंदरात जवळ दुर्गाडी किल्ल्याचे काम सुरू करून, चौल बंदराचा ताबा घेतला आणि मोक्याचा माहुली किल्ला महाराजांनी जिंकून स्वराज्यात जोडला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
▶️ ৎ जानेवारी इ.स.१६६४
(पौष वद्य सप्तमी शके १५८५ संवत्सर शोभन वार शनिवार)
महाराज परतीच्या प्रवासास सिद्ध!
शुक्रवारची रात्र देखील आगीमुळे हलकल्लोळात बुडून गेली होती. सुरत धुमसत होती. डचांच्याही वखारीला आग लागली होती. मात्र वार्याच्या दिशा बदलल्यामुळे जास्त हानी टळली होती. सकाळी ११ वाजण्याच्या सुमारास भडोचहून मोगली कुमक येत असल्याच्या बातम्या हेरांनी आणल्या. इथे सुरतेत गेले ४ दिवस करत असलेली लुटालूट महाराजांच्या समोर मोजली जात होती. मात्र परमुलखात लढाई टाळण्यासाठी महाराजांनी सुरतेची लुट थांबविण्याचे आदेश दिले. व रात्रीत बांधाबांध करून महाराज किल्ले राजगडी परतीच्या प्रवासास सिद्ध झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
▶️ ९ जानेवारी इ.स.१६८०
सिद्दीने उंदेरी बेटाचा ताबा घेऊन किल्ला बांधण्यास सुरुवात केली. अर्थातच मराठ्यांनी सिद्दीचा हा बेत तडीस जाऊ नये म्हणून उंदेरीवर अनेक हल्ले केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
▶️ ৎ जानेवारी इ.स.१६८१
फ्रेंच अधिकारी मार्टिन यांच्या दैनंदिनीची नोंद!
इ.स.१६८१, रोजीच्या सुरुवातीस परिस्थिती वेगळी झाली. राज्यपाल (गव्हर्नर जनरल) रघुनाथपंत यांनी मला त्यांचा कान दुखत असल्याचे सांगितले व भारतीय डच व इंग्लिश सर्जन यांचा सल्ला विचारण्यास सांगितले. तथापि त्या डॉक्टरांकडून इलाज झाला नाही. मी डॉ. मान्सपेटीबोयस यांस पाठविले. तो १२ तारखेस परत आला. मी जिंजीच्या बाहेर १० तारखेपासून ताटकळत होतो. कारण नगराचे दरवाजे पूर्णपणे बंद होते. काहीतरी गडबड झाली होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
▶️ ९ जानेवारी इ.स.१७२२
पोर्तुगीजांनी मराठ्यांशी तह केला
सन १७२१ च्या अखेरीस गोवेकर पोर्तुगीज यांच्याकडे बाजीरावची नजर वळली. या मोहिमेसाठी बाजीरावांनी सरखेल कान्होजी आंग्रे यांची आरमारी मदत मागीतली. पोर्तुगीजांसमोर नवेच गंभीर संकट उभे ठाकले. निजाम, दाऊदखान पन्नी यांना धुळ चारणारा पेशवा आणि समुद्राचे अनभिषिक्त सम्राट सरखेल कान्होजी आंग्रे यांच्या समोर आपला अजिबात टिकाव लागणार नाही हे ओळखून पोर्तुगीजांनी वरसोली (अलिबाग तालुक्यातील एक गाव) येथे युद्ध न करताच दिनांक ९ जानेवारी सन १७२२ रोजी तह केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
▶️ ९ जानेवारी इ.स.१७३९
चिमाजी आप्पांच्या नेतृत्वाखाली पिलाजी जाधव, शंकराजीपंत व आठ हजार घोडेस्वार, सहा हजार हशम व १२ तोफांच्या मदतीने माहिमला वेढा घातला. किल्ल्याच्या तटांवर तोफांचा प्रखर मारा करुन त्याला जिकडे तिकडे भगदाडे पाडली. शेवटी २० जानेवारी १७३९ रोजी किल्ला मराठ्यांच्या ताब्यात आला. इ.स १८१८ रोजी इंग्रजांनी तो जिंकून घेतला १८६२ पर्यंत येथे ठाण्याच्या जिल्हाधिकार्याचा बंगला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
▶️ ९ जानेवारी इ.स.१७६०
बरारीघाट येथे अफगाण्यांनी मराठ्यांचा पराभव केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
▶️ ९ जानेवारी इ.स.१७७९
पावसाळा संपल्या नंतर इंगजांनी मुंबई हून साधारण ४००० फोज घेत खंडाळ्याकडे प्रयाण केले. रघुनाथ रावांचे सैन्य त्यांच्या सोबत होते. इंगजांच्या सैन्यात ६०० युरोपियन तर उरलेले भारतीय सैनिक होते. रघुनाथ रावांना व इंगजांना वाटत होते की शिंदे, होळकर हे पुण्याच्या आसपास त्यांनाच येऊन मिळतील. इंग्रजांचा पणवेल मार्गे , कर्जत - खंडाळा - पुणे असा मार्ग होता. मराठा सैन्याचे नेतृत्व महादजी शिंदे यांनी केले, होळकर ही मराठा सैन्यासोबतच राहिले. त्यामुळे रघुनाथ रावांचे बेत फसले. यावेळी मराठ्यांच्या सैन्य हालचाली वाखाणण्या सारख्या होत्या. कार्ले, खंडाळा, या भागात इंग्रज पोहोचे पर्यंत त्यांना गनिमी काव्याने सतावण्याचे काम केले. इंग्रज फौजेवर सतत चे गनिमी हल्ले करत त्यांची रसद मिळण्याचे मार्ग कापले. इंग्रज फौज जसजशी पुढे सरकत होती, मराठ्यांनी वाटेतली सर्व गावे ओस केली, शेते पिक कापुन जाळून टाकली, शिवाय पाणवठे विष टाकून पाण्यायोग्य ठेवले नाहीत, अशावेळी अन्नासाठी इंग्रज फौजेला आशा ठेवत पुढे पुढे चालत राहावे लागले. रात्रीवेळी सुद्धा छोटे हल्ले करत त्रास देणे सुरु ठेवले, तरीही चिकाटीने इंग्रज फौज खंडाळ्याला आली. जानेवारीला त्या कार्ल्यात आल्या. इंग्रजांनी नंतर रंगवलेला तथाकथित शुर जेम्स स्टुअर्ट मुख्य लढाईच्या १० दिवस आधीच कार्ल्यात महादजी शिंदेंच्या फौजे कडुन मारला गेला. मराठयांनी रसदेचे मार्ग कापल्यामुळे इंग्रज फौज अन्न मिळवण्यासाठी तळेगावाकडे वळली ९ जानेवारी १७७९, पण मराठयांनी तळेगाव सुद्धा रिकामे करुन जाळले होते, आणि पानवठे सुद्धा विषारी होते. अखेर इंग्रजांनी न लढताच माघार घेतली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
▶️ ९ जानेवारी इ.स.१८८०
क्रांतिकारक वासुदेव बळवंत फडके यांना देशद्रोहाच्या आरोपावरुन जन्मठेपेची शिक्षा
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
..
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

Comments
Post a Comment