ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶️ १४ जानेवारी इ.स.१६४१
शहाजीराजांचे कोंडदेवांना पत्र
शहाजीराजांना सूनमुख पाहण्याची उत्सुकता वाटली असणे स्वाभाविक आहे. पत्नीची व शिवबाराजांची भेट होऊनहि एक वर्ष झाले होते. शिवाय शिवबाराजे, जिजाऊसाहेब यांचा व शंभूराजांचीहि भेट बरेच दिवसात झालेली नव्हती, कर्नाटकचा नवा मुलुखहि त्यांनी पाहिलेला नव्हता. त्यामुळे शहाजीराजांनी दादोजींना पत्र पाठवुन त्यांना बंगरुळास बोलावुन घेतले. बंगरुळास जाण्यापूर्वी दादोजींचा इकडिल उल्लेख असलेला शेवटचा महजर १४ जानेवारी १६४१ या तारखेचा आहे. व यापुढील एकदम ३० मे १६४२ चा आहे. बंगरुळास ही मंडळि निघाली ’ते समयास राजियास वर्षे बारा होती’ असे सभासद म्हणतो. हा उल्लेख अचूक आहे कारण फेब्रुवारी १६४१ मध्ये महाराजांना १२ वे वर्ष लागते. म्हणाजे फेब्रुवारी मध्ये महाराजांसह दादोजी कर्नाटकात रवाना झाले. दादोजिंच्या अनुपस्थितीत पुणे प्रांत सिद्दि अंबर याकुतखानाकडे होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ १४ जानेवारी इ.स.१६४८
कोकण मोहिम आटोपून शिवाजी राजे राजगडावर आले. हाच तो दिवस ज्या दिवशी शिवाजी राजांनी आपल्या नव्या राजधानीवरील वास्तूत गृहप्रवेश केला. याच दिवशी शिवाजी राजे राजगडावर प्रथम राहावयास आले. काय वाटले असेल राजगडाला ? कृतज्ञता ! गहीवर !! जन्माला आल्याचे सार्थक !!! राष्ट्रपुरूषाची पायधूळ लागून राजगड तीर्थक्षेत्रात पालटून गेला, तो हा दिवस. यापूर्वी शिवरायांची राजधानी होती - किल्ले पुरंदर.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ १४ जानेवारी इ.स.१६५८
स्वराज्याचे रोपटे पळापळाने वाढत होते.पुरंदरावर महाराजांनी फत्तेखानाचा दारुण पराभव केला होता.स्वराज्याची राजधानी म्हणुन रायगडाची निवड केली होती.रायगडाच्या पायथ्याशी पाल गावाजवळ महाराजांच्या कुटुंबासाठी व फौजेच्या तळासाठी शिवपट्टण गावाची उभारणी चालु होती.
कोकण मोहिम आटोपून शिवराय राजगडावर आले. हाच तो दिवस ज्या दिवशी शिवरायांनी आपल्या नव्या राजधानीवरील वास्तूत गृहप्रवेश केला. याच दिवशी शिवराय राजगडावर प्रथम राहावयास आले.
काय वाटले असेल राजगडाला ? कृतज्ञता ! गहीवर !! जन्माला आल्याचे सार्थक !!! राष्ट्रपुरूषाची पायधूळ लागून राजगड तीर्थक्षेत्रात पालटून गेला, तो हा दिवस. यापूर्वी शिवरायांची राजधानी होती – किल्ले पुरंदर.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ १४ जानेवारी इ.स.१७०६
बादशहा बहादूरगड मुक्कामी असताना औरंगजेबाचा एक अधिकारी सियादत्त खान हा शिकारीसाठी म्हणून छावणीच्या बाहेर गेला होता. मराठे त्याच्यावर तुटून पडले. प्रहरभर लढाई होऊन सियादत खान हा मराठ्यांच्या कैदेत सापडला. खंडणी भरून त्यास आपली सुटका करून घ्यावी लागली. लढाईत जखमी होऊन तो कायमचा आंधळा बनला. बहादूर गडाहून बादशहाने अंबिकानगरास जाण्यास दिनांक १४ जानेवारी १७०६ रोजी प्रयाण केले व तो २० जानेवारीस अंबिका नगरास पोहचला. या ६ दिवसाच्या प्रवासात मराठ्यांनी बादशही सैन्यावर धाडशी हल्ले केले व अनेक मोगलांना मारले आणि अनेकांना धरून नेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ १४ जानेवारी इ.स.१७५६
सुवर्णदुर्ग हाती आल्यामुळे समशेरबहाद्दर आणि दिनकर महादेव यांनी रत्नागिरीच्या किल्ल्याला वेढा घातला. रामाजीपंतांनी या वेढ्यासाठीही विल्यमला विनवले. रामाजीपंतांच्या पूर्वीच्या' अनुभवावरून विल्यम मदत करणार नाही, हे त्यांनी ताडलेच होते आणि तसेच झाले. हीच गत अंजनवेल आणि गोवळकोटच्या किल्लांच्या बाबतीतही झाली. अखेरीस हरी दामोदर आणि महिपतराव कवडे यांनी दि. १४ जानेवारी १७५६ रोजी आंग्र्यांचा किल्लेदार मोत्याजी विचारे यांच्याकडून अंजनवेल जिंकून घेतला. गोवळकोटही या सुमारास काबीज झाला. यापाठोपाठ समशेरबहाद्दरांनी १८ फेब्रुवारी रोजी रत्नदुर्गावरही निशाण लावले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ १४ जानेवारी इ.स.१७६१
#मराठा_शौर्यदिन - #पानिपतची_तिसरी_लढाई
हाच तो काळा दिवस ज्या दिवशी पानिपतावर मराठ्यांची एक सबंध पिढी शहीद झाली होती. सदाशिवराव पेशेव, विश्वासराव, जनकोजी शिंदे, यशवंतराव पवार, तुकाजी शिंदे, समशेर बहाद्दर, इब्राहिमखान यांच्यासारखे असंख्य शूरवीर योद्धे शहीद झाले.१४ जानेवारी १७६१ हे भारताच्या इतिहासातील एक स्मरणीय आणि असामान्य वळण आहे. मराठा आणि अफगाणी सैन्यादरम्यान पानिपतच्या तिसऱ्या लढतीत त्या दिवशी झालेला रक्तपात एवढा होता, की जगात कुठेही इतकी मनुष्यहानी एका दिवसांत झाली नसावी.
पानिपत ही एक भारतासाठी दिशादर्शक घटना होती. जर मराठे जिंकले असते तर ना इंग्रज बळावले असते किंवा ना हैदरअलीचा उदय झाला असता. कदाचित दिल्लीवर त्याचवेळी मराठ्यांचा भगवा झेंडा फडकला असता.पण असे घडले नाही .पानिपतची लढाईमुळे मराठी मानसात न्यूनगंड निर्माण न होता, तो मराठी अस्मितेचा उच्चांक ठरला पाहिजे. तो मराठी जनतेसाठी ऊर्जेचा, स्फूर्तीचा, निस्वार्थी देशभक्तीचा एक स्रोत व्हायला हवा. प्रत्यक्ष रणांगणात ठार झालेल्या अफगाणी शिपायांची संख्या कामी आलेल्या मराठय़ांच्या दीडपट होती, हा एकमेव घटक मराठा शूरत्वाची आणि ‘मोडेन पण वाकणार नाही’, या बाण्याची ग्वाही देतो.
पानिपत युद्ध मराठ्यांच्या पराभवाचे नसून शौर्याचे प्रतिक आहे, मराठ्यांनी दिलेल्या शब्दासाठी आणि राष्ट्ररक्षणासाठी एकाकी लढताना कशी झुंज दिली त्याचे ते उदाहरण आहे ,"बचेंगे तो और लढेंगे " असे म्हणणारे दत्ताजी शिंदे पानिपत युद्धाच्या आधी शहीद झाले पण त्या वाक्यातून छत्रपतींचे स्वराज्य राखण्या वेळीचे सूत्र मात्र दिसून येते
"पानिपत १७६१" मध्ये श्री.त्रं.शं. शेजवलकर लिहितात," पानिपतच्या युध्दामुळे सिध्द झालेली महत्वाच गोष्ट ही की, मराठे हिंदुस्तानचे राज्यकर्ते म्हणुन वागत होते, केवळ लुटारु म्हणुन दुसर्या लुटारुंशी लढले नाहीत.हिंदुस्तानात सत्ताधिश कोणी व्हावयाचे या बद्दल वाद असो,पण हे राज्य हिंदी रहिवाश्यांचेच असले पाहीजे व तेच येथिल राज्यकर्ते राहिले पाहीजेत ,या तत्वासाठी मराठे पानीपतास लढले."
गोविंदाग्रज पानिपत संग्रामाचे वर्णन करताना म्हणतात
कौरव - पांडव संगरतांडव द्वापारकाली होय अती !
तसे मराठे गिलचे साचे कलित लढले पानपती !!
पानिपत युद्धात "लाख बांगडी फुटली , दोन मोती गळाले , २७ मोहरा हरवल्या आणि चिल्लरखुर्दा किती गेला याची गणना नाही ...!!" तरी पानिपत चे युद्ध मराठे राष्ट्र रक्षणासाठी लढले हे महत्वाचे आहे,मराठ्यांनी अब्दालीला असा तडाखा दिला कि परत त्याने दिल्लीकडे पाहण्याचे धाडस केले नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ १४ जानेवारी इ.स.१८११
या दिवशी सवाई माधवरावांच्या पत्नी यशोदाबाई या आजारपणात रायगडावर मृत्यू पावल्या. त्यांची क्रिया वेदमूर्ति चिंतामण दीक्षित कर्वे उपाध्ये यांनी पुण्यास केली. दहन रायगडावर झाले. अस्थि काढून पुण्यास नेल्या. अस्थि नेण्यास भास्कर दीक्षित कर्वे उपाध्ये व बाळाजी मल्हार बापट यांस पाठविले होते. दोन ब्राह्मणांनी अस्थि वाहून पुण्यास आणल्या.पुण्याला ओंकारेश्वराच्या मंदिराजवळ त्यांच्या अस्थी पुरण्यात आल्या. सातवे दिवशी अस्थींस मंत्राग्नि पुणे येथे झाला व त्या दिवसापासून पुण्यास क्रिया सुरू झाली. सबंध वर्षाचा याबाबतचा खर्च ३३०५३ रु. झाला अखेरच्या वैभवशाली पेशव्याची दुर्दैवी भार्या अशा त-हेने मराठ्यांच्या प्रसिद्ध राजधानींत नजरकैदेत मृत्यू पावली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
..
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment