ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶️ १ फेब्रुवारी इ.स.१६७६
छत्रपती शिवरायांनी पाली गावचा तंटा मिटवला.
कान्होजी खराडे आणि काळभर यांच्या वादातील न्यायाची बाजू कोणती हे शिवाजी महाराजांना माहीत होते. या वादाचा निकाल १ फेब्रुवारी १६७६ रोजी पाली येथे शिवाजी महाराजांच्या उपस्थिीतच महजर झाला. त्यामध्ये खराडे यांनी रवादिव्य केले. त्यात ते खोटे ठरले आणि पाटीलकी काळभरांचीच आहे, असे सिद्ध झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ १ फेब्रुवारी इ.स१६८९
माँसाहेबांचा छत्रपती शंभू बाळ, सह्याद्रिचा छावा कैद झाला...
मराठ्यांच्या इतिहासातील एक सर्वात काळा दिवस.
१ फेब्रुवारी...१६८९ साली आजच्याच दिवशी वाडा संगमेश्वर येथे मोगली लांडग्यांनी (मुकाबर खान आणि इखलाख खान) छत्रपती संभाजीराजांना अटक केली. आणि इथूनच सुरू झाला , काळादेखील भयचकित करणारा ४० दिवसांचा तो रक्तरंजीत प्रवास .
देश धरम पर मिटने वाला। शेर शिवा का छावा था।। महापराक्रमी परम प्रतापी। एक ही शंभू राजा था।। तेज:पुंज तेजस्वी आँखें। निकल गयीं पर झुका नहीं।। दृष्टि गयी पण राष्ट्रोन्नति का। दिव्य स्वप्न तो मिटा नहीं।। दोनो पैर कटे शंभू के। ध्येय मार्ग से हटा नहीं।। हाथ कटे तो क्या हुआ?। सत्कर्म कभी छुटा नहीं।। जिव्हा कटी, खून बहाया। धरम का सौदा किया नहीं।। शिवाजी का बेटा था वह। गलत राह पर चला नहीं।। वर्ष तीन सौ बीत गये अब। शंभू के बलिदान को।। कौन जीता, कौन हारा। पूछ लो संसार को।। कोटि कोटि कंठो में तेरा। आज जयजयकार है।। अमर शंभू तू अमर हो गया। तेरी जयजयकार है।। मातृभूमि के चरण कमलपर। जीवन पुष्प चढाया था।। है दुजा दुनिया में कोई। जैसा शंभू राजा था ।।
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ १ फेब्रुवारी इ.स.१६८९
सरनौबत म्हालोजी घोरपडेंचे बलिदान
मराठा सरनौबत म्हालोजी घोरपडे यांच्या शर्थीच्या प्रयत्नानंतर सुद्धा 'छत्रपति संभाजी महाराज' संगमेश्वर येथे असताना मुघल सरदार शेखनजीब खानाच्या तावडीत सापडले. या लढाईमध्ये म्हालोजी घोरपडे धारातीर्थी पडले. ९ वर्षांच्या अथक प्रयत्नानंतर शंभूराजे मुघलांच्या तावडीत सापडले होते. मराठ्यांच्या छत्रपतिला कैद करून आणले म्हणुन औरंगजेबाने शेखनजीब खानाला 'मुकर्रबखान' हा किताब दिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ १ फेब्रुवारी इ.स.१६८९
छत्रपती शंभूराजांना मुघलांनी कैद केले होते आणि स्वराज्याचा राज्यकारभार पुढे चालवण्यासाठी छत्रपती राजाराम महाराजांची निवड केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ १ फेब्रुवारी इ.स.१८१४
आॅक्टोबर १८१३ मध्ये लोर्ड हास्टिंग्ज भारतात दाखल झाला. भारतातील स्थितीचा त्याने आढावा घेतला. मराठा राजमंडळातील सरदार पुन्हा एकत्र यायच्या प्रयत्नात आहेत व तुळसाबाईही त्यात सामील आहे हे त्याच्या लक्षात आले. होळकरांचे सैन्य त्याही काळात सर्वांत अधिक प्रबळ होते. बाजीरावावर अन्य सरदारांचा विश्वास नसला तरी पेशवेपदाचा मान होताच. त्यामुळे १ फेब्रुवारी १८१४ च्या पत्रात त्याने लिहिले कि ब्रिटिश साम्राज्याच्या सुरक्षिततेसाठी मध्य भारतात तातडीने असंतोष चिरडून टाकला पाहिजे. होळकर तसेच अन्य संस्थानिकांच्या सैन्याचा मुख्य आधार म्हणजे पेंढारी. त्यामुळेच ही इंग्रजांनी त्यांच्याहीविरुद्ध कारवाया करण्याचे निर्णय घेतले. पण यात होळकर, शिंदे आणि अमिरखान मोडता घालून मोठ्या प्रमाणावर बंड करतील अशी भितीही त्यांना वाटत होती. त्यामुळे त्यांनी कटकारस्थानाचाच वापर करायचा निर्णय घेतला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
..
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment