ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶️📜 ११ फेब्रुवारी इ.स.१६५८
शिवरायांनी आरमार उभारणीचा शुभारंभ केला. मराठा साम्राज्यामधे कल्याण आणि त्याच्या आसपासचा संपूर्ण भाग होता, तेथेच १६५७ ते १६५८ साली जहाज बांधनीमधे कुशल आशा कारागिरांना काढुन जहजांची निर्मिति पहिल्यादा सुरु झाली, सीद्दी, पोर्तुगीज, इग्रज आणि डच यांच्या पासून स्वराज्याच रक्षण करण हे मराठा आरमाराच मुख्य काम, पण महाराजांची नजर होती अथांग आशा समुद्र साम्राज्यावर, आरमाराच काम सुरु असतानाच* पद्मदुर्ग, विजयदुर्ग, सुवर्णदुर्ग, सिंधुदुर्ग, आणि आणखिन बऱ्याच छोट्या मोठ्या सागरी किल्ल्याणची बांधनीही सुरु होती, अथांग आसा समुद्र आणि त्याच्या किनारी असणार हिंदवी स्वराज्य, मराठा साम्राज्यातील व्यापाऱ्याना समुद्रा मार्गे मुक्तपणे व्यापार करता यावा तसेच राज्याची भरभराट होण्यासाठी समुद्राच रक्षण अत्यंत गरजेच होत, त्यामुळे संपूर्ण कोकणामधे असणाऱ्या असंख्य खाडया जहाजांसाठी उत्कृष्ठ आसा आसारा होता. तर समुद्र किनारी आसणाऱ्या कठिण दगडाच्या जमिनी आरमाराच्या तळासाठी बलवान आशा होत्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ११, फेब्रुवारी इ. स. १६५८, रोजी माघ वद्य ४, चतुर्थी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, वार गुरुवार, म्हणजेच आजच्या दिवशी रोजी दाखल केला गेला.
महाराजांच्या शुर मावळ्यांकडून नेतोजी पालकर यांच्या नेतृत्वात कोकणातला सुरगड, बिरवाडी किल्ला स्वराज्यात
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜११, फेब्रुवारी इ. स. १६६०, रोजी शाइस्तेखान अहमदनगरला आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜११ फेब्रुवारी इ.स.१६६०
औरंगजेबाने मुख्तारखान याला दख्खनेची जबाबदारी देऊन औरंगाबाद येथे पाठवले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ११ फेब्रुवारी इ. स. १६८१, रोजी फाल्गुन शुद्ध ३, त्रृतीया, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार शुक्रवार, म्हणजेच आजच्या दिवशी नळदुर्ग किल्ल्यापासून ६ मैलांवर रणमस्त खानाशी मराठ्यांचा सामना. मराठ्यांनी "धरणगाव" लुटले.
मोगली सेनेला धक्का तंत्र देऊन सळो की पळो करून सोडण्यात मराठे कसलीही कसर बाकी ठेवत नव्हते.
बुर्हाणपुर लुटून अचानक औरंगाबादवर धडक!
सोलापूर-नळदुर्ग या भागात धुमाकूळ, हे प्रकार करून मराठे मोगलांस हैराण करून सोडत असत.
याचवेळी मराठ्यांनी धरणगाव लुटून अजून एक दणका दिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ११ फेब्रुवारी इ. स. १६८७, रोजी संताजी घोरपडे-केसोपंत त्रिंबक कर्नाटकात!
दख्खन जिंकण्याच्या इराद्याने आलेल्या औरंगजेबाने मराठ्याविरोधात आपली मात्रा चालत नाही असे पाहून आपली दृष्टी गोवळकोंडा आणि विजापूरकडे वळवली आणि अल्पावधीतच ती राज्ये जिंकूनही घेतली.
ही बलाढ्य राज्ये हाती आल्यानंतर तो स्वराज्यातील कर्नाटक प्रांतात पुन्हा हल्ले सुरू करणार हे ओळखून छत्रपती संभाजीराजेंनी कर्नाटकचा प्रांताचा बंदोबस्त करण्याला विशेष प्राधान्य दिले.
तिथे मुघल आणि म्हैसूरकरांच्या हल्ल्याला हरजीराजे महाडिक यांना एकट्याला तोंड द्यावे लागू नये म्हणून छत्रपती संभाजीराजेंनी ऑक्टोबर- नोव्हेंबर इ. स. १६८६, मध्ये केशव त्रिमल आणि संताजी घोरपडे यांना कर्नाटकात जायची आज्ञा केली. या आज्ञेनुसार केशव त्रिमल व संताजी घोरपडे आपल्या १२,०००, बारा हजार सैन्यासह कर्नाटकात पोहोचले. शकावलीतील नोंदीनुसार हे सैन्य कर्नाटकात पोहोचले ती तारिख होती, ११, फेब्रुवारी इ. स. १६८७.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment