ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶️📜 १६ फेब्रुवारी इ.स.१५१०
हिंदी महासागरातील व्यापारातून मुसलमानांना हुसकावून लावण्याच्या धोरणानुसार पोर्तुगीज सरदार अफांसो द अल्बुकर्क याने गोवा हस्तगत केले (१६ फेब्रुवारी १५१०). त्यात त्याला विजयानगरचा नौदल प्रमुख तिम्मय्या याची मदत झाली. आदिलशाही फौजांशी संघर्ष करून पोर्तुगीजांनी १५७० पर्यंत गोव्याखेरीज सासष्टी, बारदेश आणि तिसवाडी एवढा प्रदेश बळकावला. त्याचप्रमाणे मोगलांविरुद्ध मदत करण्याच्या मिषाने चौल व वसई हे प्रदेश गुजरातच्या सुलतानांकडून मिळविले आणि दीव-दमणचे किल्ले बांधले (१५३५ व १५५९).
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 १६ फेब्रुवारी इ.स.१५८५
बिरबलाचा मृत्यू
काराकार डोंगराळ मुलुखात पुढे जात असताना १६ फेब्रुवारी रोजी 'झैन खान कोका' याने एक धोक्याची सूचना 'बिरबल' याला दिलेली होती की शत्रू रात्री हल्ला करेल परंतु ती सूचना 'बिरबल' याने मान्य केली नाही. 'बिरबल' याचे सैन्य हे एका अरुंद खिंडीजवळ पोहोचले आणि सूर्यास्त झाला. अंधाराचा फायदा घेऊन अफगाणी टोळ्यांनी 'बिरबल' आणि 'हकीम अब्दुल फतेह' यांच्या खिंडीतील सैन्यावर जोरदार हल्ला चढवला. दगड धोंड्याचा मारा संपूर्ण मुघल सैन्यावर चारही बाजूने व्हायला लागला. यामध्ये बिथरलेले सैन्य हे सपाटीच्या बाजूला पळत सुटले या गोष्टीमुळे सैन्याची महत्वाची फळी अस्ताव्यस्त होऊन अजून गोंधळ वाढला. मुघल सैन्यामधले पळत असलेले लोकं मारले गेले. याच दरम्यान बाकीचे सैन्य चुकून एका घळीजवळ पोहोचले तेथे 'युसुफझाई' टोळ्यांनी 'बिरबल' आणि 'हकीम अब्दुल फतेह' यांच्याजवलील ८००० सैनिकांची कत्तल केली. यामध्ये जीवानिशी पळून जाणारा 'बिरबल' मात्र मारला गेला आणि 'झैन खान कोका' व 'हकीम अब्दुल फतेह' हे थोडक्यात बचावले.
जेव्हा या 'स्वात' जवळील खिंडीमध्ये झालेल्या हल्ल्यामध्ये 'बिरबल' मारला गेल्याचे वृत्त जेव्हा दुसऱ्या दिवशी 'अकबर' याला कळाले तेव्हा त्याला खूप दु:ख झाले. याबाबत 'अबुल फझल' लिहितो की "स्वामिनिष्ठ नोकरांचा मृत्यू त्यातल्या त्यात धार्मिक बाबीमधला त्याचा सहकारी असलेला बिरबल मारला गेल्यामुळे बादशहाला अतिशय वाईट वाटले. दोन दिवस त्याने अन्नपाण्याला स्पर्श देखील केला नाही."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 १६ फेब्रुवारी इ.स.१६३५
मुघल सरदार "शाहीस्तेखान" हा २०००० ची फौज घेऊन
जुन्नर, संगमनेर, नाशिक मार्गे छत्रपती शिवरायांचे थोरले बंधू "संभाजीराजे" यांच्यावर चालून यायला निघाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 १६ फेब्रुवारी इ. स.१७०४
औरंगजेबने राजगड़ जिंकून त्याचे नाव नबिशाहगड़ ठेवले.
येथून तो पुढे किल्ले तोरण्याकडे निघाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 १६ फेब्रुवारी इ.स.१७१९
मराठ्यांची दिल्लीला धडक
फर्रुखसियर आणि सय्यद अब्दुल्लाखान यांच्यातील तणाव वाढत गेला. सय्यद अब्दुल्लाने आपल्या बंधूला ताबडतोब ससैन्य बोलावले. त्याच्याकडे ५० हजार फौज होती. शाहूंनी मोठ्या हुशारीने पेशवे बाळाजीपंतांना ५० हजार फौजेनिशी त्याच्या मदतीला दिले. बदल्यात सय्यद बंधूंनी रोजचे ५० हजार रुपये याप्रमाणे दरमहा १५ लाख रुपये मराठी फौजांना देण्याचे मान्य केले. इतकेच नव्हे तर दख्खनच्या विजापूर, बिदर, वऱ्हाड, खानदेश, औरंगाबाद आणि हैद्राबाद अश्या ६ प्रांतांची चौथाई-सरदेशमुखी देण्याचेही आश्वासन दिले. आणि सर्वांत महत्त्वाचे म्हणजे या मोहीमेच्या यशानंतर साक्षात राजमाता येसूबाईसाहेबांची सुटका होण्याचेही वचन देण्यात आले. सर्व बाजूंनी लाभदायी अश्या या मोहीमेत बाळाजींनी आपले थोरले पुत्र बाजीरावांनाही सोबत ठेवले होते. त्यांचे वय त्यावेळी अगदीच १८-१९ वर्षांचे असेल. परंतु त्यांना शाहूंनी सरदारकी बहाल केलेली होती. अश्या या सय्यद आणि मराठा संयुक्त फौजांनी १६ फेब्रुवारी १७१९ ला दिल्लीदरवाजावर धडक दिली. या वज्राघातापुढे मुघल साम्राज्याचा मत्त हत्ती गडबडला. बादशाहने तहाची बोलणी आरंभली. सय्यद बंधू आणि बाळाजीपंत यांनी मोठ्या हुशारीने एक तोतया उभा करुन त्याच्या जोरावर बादशाहकडून मराठ्यांच्या मागण्या मान्य करुन घेतल्या. २८ फेब्रुवारीला जराश्या वादाचे निमित्त होऊन हुसैनअलीने बादशाहचे डोळे काढले आणि त्याला तुरुंगात कोंबला व त्याच्याजागी रफ़िउद्दरजत नावाच्या एका पोराला गादीवर बसवले. जवळजवळ ३० वर्षांनंतर शंभूराजांच्या अर्धांगिनी महाराणी येसूबाईसाहेबांनी स्वतंत्र श्वास घेतला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 १६ फेब्रुवारी इ.स.१७४५
शनिवार दिनांक १६ फेब्रुवारी सन १७४५ रोजी सावनूर येथे श्रीमंत माधवराव पेशवे यांचा जन्म झाला. वयाच्या अवघ्या सोळाव्या वर्षी दिनांक २० रोजी माधवराव पेशवा झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 १६ फेब्रुवारी इ.स.१८३१
उमाजी नाईकांनी इंग्रजी सत्तेविरुद्ध एक जाहीरनामाच त्याने प्रसिद्ध केला त्यात नमूद केले होते, इंग्रजी नोकऱ्या सोडाव्यात. देशवासीयांनी एकाच वेळी एकत्र येऊन जागोजागी गोंधळ घालावा आणि इंग्रजांविरुद्ध अराजकता माजवावी. इंग्रजांचे खजिने लुटावेत. इंग्रजांना शेतसारा, पट्टी देऊ नये. इंग्रजांची राजवट आता लवकरच संपुष्टात येणार आहे. त्यांना कोणीही मदत करू नये तसे केल्यास नवीन सरकार त्यांना शासन करेल. असे सांगून एकप्रकारे त्याने स्वराज्याचा पुकारच केला होता. तेंव्हापासून उमाजी जनतेचा राजा बनला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment