ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶️📜 १८ फेब्रुवारी इ.स.१५७६
महाराणा प्रताप आणि अकबर यांच्यात युद्ध
महाराणा प्रताप यांच्या सैन्याचे नेतृत्व हकीम खान सुरी ( हा दिल्लीचा एकेकाळ चा बादशाह शेरशाह सुरीचा वंशज ) या अफगाणी मुस्लिम सेनानी कडे होते, तर बादशहा अकबराकडून मोगलांच्या सैन्याचे नेतृत्व राजा मानसिंह (जयपूर चा राजा, मिर्झाराजा जयसिंह चे आजोबा ) हे हिंदू राजा करत होते.
१८ फेब्रुवारी १५७६ साली लढल्या गेलेल्या या लढाईचे वैशिष्ठ्य म्हणजे महाराणा प्रताप हे मेवाडच्या स्वातंत्र्यासाठी अकबराविरुद्ध लढत होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 १८ फेब्रुवारी इ.स.१६५३
(फाल्गुन शुद्ध प्रतिपदा, शके १५७४, संवत्सर नंदन, वार शुक्रवार)
महाराजांनी गोपाळभटांना वर्षासन नेमून दिले.
महाराजांनी गोपाळभटांना वर्षासन नेमून दिले. आपल्या स्वराज्य कार्याचा अभ्युदय व्हावा यासाठी महाराज देवाब्राह्मणांना साकडे घालत होते. सत्पुरुषांसमोर नम्र होत होते. श्री. महाबळेश्वराचे वेदमूर्ती गोपाळभट बिन श्रीधर भट हे असेच 'सूर्योपासक श्रेष्ठ अनुष्ठाते' होते. छत्रपती शिवाजी महाराजांनी गोपाळ भटांपासून मंत्र उपदेश संपादीला. महाराजांनी गोपाळ भटांना पत्र लिहून,स्वामींनी सुर्यानुष्ठान करावे" ही विनंती केली आणि वर्षासन नेमून दिले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 १८ फेब्रुवारी इ.स.१६८२
औरंगजेब बादशहाने बुन्हानपुर सोडले! बादशहा औरंगजेब ३ ते ४ महिने बु-्हानपुर येथे आनंदाने राहीला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 १८ फेब्रुवारी इ.स.१६८५
(माघ वद्य १०, दशमी, शके १६०६, रक्ताक्ष संवत्सर, वार बुधवार)
स्वकीय झाले फितूर!
शहाआलम आल्यावर गोव्यातील साखळी, पेडणे, डिचोली, फोंडे येथील देसाई मंडळी छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध होती. कुडाळचे खेमसावंत, राम दळवी, तानसावंत वगैरे देसाई तसेच साखळीचे रुद्राजी राणे, मसोबा राणे हे सुद्धा छत्रपती संभाजी महाराजांच्या विरुद्ध झाले. खेमसावंताला विजापुरच्या सिकंदर अदिलशहाने सुद्धा त्या सुमारास पत्र पाठवून तू छत्रपती संभाजी महाराजांच्या बरोबर ममता राखून राहा असे कळविले होते. तरीसुद्धा तो छत्रपती संभाजी महाराजांच्या विरोधात गेला. या संदर्भात एक पत्रही इतिहासात उपलब्ध आहे.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 १८ फेब्रुवारी इ.स.१७५५
तुळाजी आंग्रे विरुद्ध पेशव्यांनी करवीरकरांशीहि कारस्थान आरंभिले तेव्हां करवीरकर यांनी तुळाजीकडून अंमल दूर करुन सरकारात दिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 १८ फेब्रुवारी इ.स.१७५६
रत्नागिरीचा रत्नदुर्ग जिंकला
उत्तर हिंदुस्थानातील राघोबादादांच्या मोहीमेत समशेर बहाद्दर सामील होते. मात्र कोकणातील मोहीमेवर जाण्याकरीता उत्तरेकडील मोहीम सोडून समशेर बहाद्दर सन १७५५ च्या मे महिन्यात कोकण मोहीमेवर रवाना झाले. दिनांक १८ फेब्रुवारी १७५६ रोजी समशेर बहाद्दर यांनी रत्नागिरीचा किल्ला जिंकून घेतला. कोकणातील मोहीमेनंतर समशेर बहाद्दर यांना पून्हा उत्तरेत राजपुताना मोहीमेवर पाठविण्यात आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment