ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

▶️📜 २६ फेब्रुवारी इ.स.१६४७
थोरले महाराज फर्जद "शहाजीराजे भोसले" यांनी छत्रपती शिवरायांकडे पुणे जहागिरीची जबाबदारी दिली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 २६ फेब्रुवारी इ.स.१६६८
किल्लेदार रायाजी गंगादास यांना गोव्याच्या व्हिसेरेईने लिहीलेल्या पत्राची नोंद!
   देसायांचे हस्तक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात शिरून बंडाळी मारजवित असल्याचे आपण माझ्या निदर्शनास वारंवार आणले आहे. पण ह्या बंडाळीला आळा घालण्यास मी असमर्थ आहे. त्याचे कारण हे की "देसायांची माणसे आमच्या राज्यातून छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्यात जात नाहीत. ती इतर ठिकाणाहून कुठून तरी जात असतील तरी पण लखम सावंत, आणि केशव प्रभू ह्या दोघा उपदव्यापी देसायांना मी आमच्या राज्यातून हाकलून देत आहे. असे जर झाले, तर आपण आणि छत्रपती शिवाजी महाराज यांचे प्रजाजन देसायांच्या उपद्रवापासून मुक्त होतील अशी आशा आहे".

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 २६ फेब्रुवारी इ.स.१७३७
चिमाजी आप्पानी अटेर व भदावर लुटले

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 २६ फेब्रुवारी इ.स.१७३९
खंडोजी माणकर व तुबाजीपंत यांजवर धारावी काबीज करण्याची जबाबदारी सोपविण्यात आली.
चिमाजीअप्पांनी तुबाजीस मुर्ध्यावर मोर्चा बसविण्यास आज्ञा केली. तुबाजीपंतांचा मुर्ध्यावर दिनांक २२ फेब्रुवारी मोर्चा कायम झाला. इतक्यात पोर्तुगीजांनी त्यावर हल्ला केला. तुबाजीपंताच्या फौजेने पोर्तुगीजांचा हल्ला निकराने परतविला. इतकेच नाही तर दिनांक २६ फेब्रुवारी सन १७३९ रोजी गायमुखावर तुबाजीपंतांनी मोर्चा बसविला. धारावी किल्यात पाण्याची सोय नाही. गायमुख मराठ्यांनी काबीज केल्याने पोर्तुगीजांचे पाणी तुटले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 २६ फेब्रुवारीला इ.स.१७८४
पहिल्या इंग्रज-मराठा युद्धात (१७७७-१७८२) इंग्रजांनी ग्वाल्हेरचा किल्ला गोहदकर जाट राण्यांच्या हातात सुपूर्द केला होता. परंतु, नंतर गोहदकर जाट ग्वाल्हेर पुन्हा शिंद्यांकडे द्यायला राजी नव्हता. शेवटी फेब्रुवारी १७८३ मध्ये महादजी शिंद्यांनी स्वतः जाऊन ग्वाल्हेरला वेढा घातला. जवळच असणारे प्रसिद्ध ‘पन्ना' शहरही मराठी फौजांनी काबीज केले. गोहदकर जाटाची राणी आणि काही सावकार या किल्ल्यात होते. महादजींच्या प्रचंड फौजेला घाबरून किल्लेदाराने हत्यार ठेवायची तयारी दर्शवली. परंतु, गोहदकर राणीला हे समजताच ती खवळलीच. तिने आपल्याच किल्लेदाराला तोफेच्या तोंडी दिले. शेवटी पाच महिन्यांच्या अथक परिश्रमांनंतर महादजींना त्यांची 'ग्वाल्हेरी' परत मिळाली (दि. २१ जुलै १७८३). यानंतर महादजींनी गोहदच्या किल्ल्यालाही वेढा घातला आणि दि. २६ फेब्रुवारीला १७८४ रोजी गोहदचाही पाडाव झाला. आधीच इंग्रजांविरुद्धचा प्रचंड विजय अन् आता ग्वाल्हेर-गोहदची यशस्वी मोहीम यामुळे संपूर्ण हिंदुस्थानात मराठ्यांच्या वर्चस्वावर पुन्हा एकदा निर्विवाद शिक्कामोर्तब झाले. दिल्लीकर मोगलांनाही आता पुन्हा एकदा मराठ्यांचे 'भीती' वाटू लागली होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 २६ फेब्रुवारी इ.स. १८०९
फाल्गुन शुद्ध एकादशी शके १७३० म्हणजेच दि. २६ फेब्रुवारी सन १८०९ या दिवशी एक भयंकर घटना घडली. चिमाजीअप्पांच्या पत्नी सीताबाई या संध्याकाळच्या सुमारास जवळच असणाऱ्या ओंकारेश्वरला रिवाजानुसार दिवा लावण्यासाठी गेल्या. परंतु हातातील निरांजनाचे तबक निसटून अंगावर आले अन् त्या निरांजनाच्या ज्योतीने सीताबाईंच्या लुगड्याने पेट घेतला. मंदिराच्या पुजाऱ्यांनी आणि आसपासच्या लोकांनी सीताबाईंना वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न केले. परंतु, काही वेळातच सीताबाई मृत्यू पावल्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 २६ फेब्रुवारी इ.स.१९६६
महान क्रांतिकारक, प्रतिभासंपन्न कवी, नाटककार, प्रभावी वक्ते व लेखक स्वातंत्र्यवीर विनायक दामोदर सावरकर यांचे दीर्घ प्रायोपवेशनानंतर निधन (जन्म: २८ मे १८८३)

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments