ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

▶️📜 २७ फेब्रुवारी इ.स.१६७६
(फाल्गुन वद्य ९, नवमी, शके १५९७, संवत्सर, राक्षस, वार रविवार)

महाराज विश्रांतीसाठी पन्हाळगडावर!
   महाराज पन्हाळगडावर विश्रांतीसाठी आले. सततच्या दगदगीमुळे महाराजांची प्रकृती खालावत होती. त्यामुळे पुढील ३/४, महीने महाराजांनी इथे विश्रांती घेतली मात्र या काळातही बंकाजी फर्जद याने अथणी भुईसपाट केली व बेळगावात अदिलशाहाची मुजोरी मोडून काढली!

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 २७ फेब्रुवारी इ.स.१६८३
सरसेनापती हंबीरराव मोहिते यांची मोघल सरदार बहादूरखान बरोबर कल्याण-भिवंडीच्या जवळ लढाई

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 २७ फ़ेब्रुवारी इ.स.१६९८
छत्रपती राजाराम महाराज” जिंजी किल्ल्याहून स्वराज्यात दाखल, व किल्ले विशाळगड येथे मुक्कमी.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 २७ फेब्रुवारी इ.स.१७३१
छत्रपती शाहू महाराज (सातारा गादी) आणि छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापुर गादी) यांनी कर्‍हाड येथे एकमेकांची भेट घेतली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 २७ फेब्रुवारी इ.स.१७४०
नासिरजंग हा निजाम उल्मुल्काच्या सहा पुत्रांपैकी एक पुत्र. तो सर्व मुलात हुशार व पराक्रमी होता. भोपाळवर निजामाचा कोंडमारा होत असता त्याने लढाईसाठी ज्या फौजा जमविल्या होत्या त्या जवळ औरंगाबादेस होत्या. भोपाळ येथे निजाम पेशवे तह झाल्यावर नासिरजंगाची स्वारी दिल्लीस आली. त्यावेळी निजाम दिल्लीस होता. तेवढ्यात मराठ्यांनी पोर्तुगीजांकडून वसई काबीज केली. भोपाळच्या पराभवाचा वचका श्रीमंत बाजीरावांविरुद्ध छत्रपती शाहू महाराजांचे कान फुकून त्याने त्यांच्यात तेढ निर्माण करून काढावयाचा असे निजामाने ठरवून त्यासाठी आपला हस्तक सुमंत यास साताऱ्यास महाराजांकडे पाठविले. पण बाजीरावाविरुद्ध महाराजांचे मन कलुषित झाले नाही. एवढ्यात निजामाच्या वहाड प्रांतावर रघुजी भोसल्याने हल्ला करून तो प्रांत बळकाविला. ह्याचा सूड घेण्याचे मनात आणून नासिरजंगाने जमविलेल्या फौजेनिशी सन १७३९ च्या अखेरीस गोदावरी नदी ओलांडून मराठ्यांच्या मुलुखावर चढाई केली. थोड्या दिसांनी चिमाजी अप्पा व बाजीराव पेशवे नासिरजंगावर चालून गेले. पुढे काही काळ उभयतांची रेटारेट होऊन बाजीरावांनी नासिरजंगास औरंगाबादेपर्यंत पिटत नेले. तेव्हा तो तहास तयार झाला. निरुपाय होऊन त्याने हंड्या व खर्गोण हे दोन जिल्हे बाजीरावास देऊन त्यांच्याशी तारीख २७ फेब्रुवारी १७४० रोजी मुंगी पैठण येथे तह केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 २७ फेब्रुवारी इ.स.१९३१
चंद्रशेखर आझाद यांचा शौर्यशाली बलिदान दिन
(जन्म : २३ जुलै १९०६)
तुम्हारी फांसी तुमको मुबारक,
हम तो आझाद है और आझाद ही रहेंगे...
- क्रांतीवीर चंद्रशेखर आझाद.

भारतीय स्वातंत्र्यलढ्यातील एक अग्रगण्य क्रांतीवीर,
चंद्रशेखर आझाद यांच्या स्मृतीदिनानिमित्त विनम्र अभिवादन...

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments