ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶️📜 २८ फेब्रुवारी इ.स.१५७२
महाराना सांगाचा पुत्र उदयसिंहाचे निधन जेव्हा उदयसिंह आजारी पडला तेव्हा त्याने आपली आवडती राणी धीरबाई भटियाणी हिचा मुलगा जगमाल याला युवराज घोषित केले.
आणि २८ फेब्रुवारी १५७२ साली उदयसिंहने प्राण सोडला.
त्याकाळी अशी रीत असायची की जेव्हा राजा मरण पावतो तेव्हा त्याचा मोठा मुलगा(युवराज) अंतीमसंस्काराला जात नाहीत. लगेच सिंहासनावर बसतात, जेणेकरून सिंहासन रिक्त राहत नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 २८ फेब्रुवारी इ.स.१६४४
शहाजीराजे व आदिलशाहीतमधे तडे...
रणदुल्लाखानच्या मृत्यूनंतर शाहजी व आदिलशाहतील अंतर वाढत गेले १२ मार्च १६४३ ते २८ फेब्रुवारी १६४४ च्या मधे कधीतरी रणदुल्लाखानचा मृत्यू झाला ह्यानंतर आदिलशाही दरबारात मुस्तफाखानचा दबदवा वाढला मुस्तफाखान बरोबर शाहजीराजेंचे फारसे चांगले संबंध नसावेत शाहजीराजेंला ह्यामुळेच चिंता वाटू लागली...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 २८ फेब्रुवारी इ.स.१६८२
सन १६८२ मध्ये संपूर्ण दख्खन काबीज करण्याकरीता औरंगजेब मोठ्या सेनासागरानिशी दक्षिणेत उतरला. दि. २८ फेब्रुवारी १६८२ मध्ये त्याने बुऱ्हाणपूर सोडले, नंतर दि. २२ मार्च १६८२ रोजी औरंगजेब संभाजीनगर ( औरंगाबाद ) मध्ये आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 २८ फेब्रुवारी इ.स.१७१४
लोहगडाच्या जवळ पेशवे व आंग्रे यांच्यात लेखी तह झाला. तो तहनामा असा - "थोरातांशी अपक्रिया करू नये. भाकर दिली आहे ती त्यांनी घ्यावी. कोकणची मसलद दसऱ्यापासून मार्गशीर्षापावेतो तुम्ही राहून प्रतिवर्षी करावी. हबशी-फिरंगी मारून गर्देस मिळवावे. राजमाची, श्रीवर्धन, मनरंजन, मृगगड, कोथळा आम्हांकडे (शाहूमहाराजांकडे) द्यावे. लोहगड, तुंग, कोरीगड सामानासहित तुम्हांकडे (आंग्र्यांकडे) घ्यावे. तुम्हांकडील चाकर आम्ही न ठेवावा व आम्हांकडील तुम्ही न ठेवावा. खाजगत गाव तुम्हाकडे आहेत ते चालवावे. १. पणवेली (पनवेल), १ शिरढोण, १ सोमाटणे, १ तळे घरचे किल्ले यास तुम्ही राजकारण करून घेतले तर आमचे स्वाधीन करावे. कुलाब्यास जाताच बहिरोपंत पिंगळे व चिटणिसांना कैदेतून मुक्त करावे. सातारियाहून महाराजांकडून कान्होजींना पूर्वीप्रमाणेच सरखेल किताब बहाल करावा. त्याउपर कान्होजींनी कोल्हापूरकरांचा पक्ष सोडावा. शाहूछत्रपतींनी १६ सबघड (डोंगरी किल्ले) व १० अवघड (जलदुर्ग) असे एकूण २६ किल्ले आंग्र्यांना बहाल करावेत व त्याभवतालचा एकूण २४ लक्ष होनांचा मुलुख कान्होजींना सरंजामाकरता मिळावा. या डोंगरी किल्ल्यांमध्ये कोथळीगड, बहिरवगड (ढाक बहिरी?), रायगड, व्यंकटगड, भिरागड, माणिकगड, रसाळगड, सागरगड, पालगड, खारेपाटण, राजापूर, कामते, अंबरगड, साठवली, श्रीवर्धन व मनरंजन असे १६ गिरीदुर्ग होते तर जलदुर्गांमध्ये खांदेरी, कुलाबा, सुवर्णदुर्ग, विजयदुर्ग, अवचितगड, देवगड, फत्तेगड, जयगड, यशवंतगड आणि कनकदुर्ग यांचा समावेश होता. कान्होजींकडे हा सारा प्रदेश आल्यावर त्यांची ताकद कैक पटींनी वाढली. याच वेळेस महाराजांनी आंग्र्यांना दिलेल्या काही मुलुखापैकी सुवर्णदुर्ग, श्रीवर्धन व मनरंजन (राचमाची) हे किल्ले जंजिऱ्याच्या सिद्दी याकुतखानाच्या ताब्यात होते. पेशवे व आंग्रे यांच्या संयुक्त फौजांनी हे किल्ले अगदी थोड्या अवधीतच जिंकले. त्यामुळे सिद्दी याकुतखान पुरता घाबरला. आत्तापर्यंत हा कान्होजी एकटाच होता. पण आता साताऱ्याचा पेशवाही त्याच्या बरोबर आहे. आता
आपल्याला काहीही करून त्यांना रोखायलाच हवे, या विचाराने याकुतला ग्रासले. शेवटी दि.३० जानेवारी १७१५ रोजी सिद्दीने कान्होजी आंग्र्यांशी म्हणजेच सातारा दरबाराशी तह केला. कान्होजी आंग्रे व पेशवे बाळाजी विश्वनाथ एकत्र झाले. बाळाजीपंतांनी आपल्या हुशारीने कान्होजींना पुन्हा शाहू महाराजांकडे वळते केले हे पाहून इंग्रज, पोर्तुगीज, मोंगल, सिद्दी या सर्व परकीय सत्तांची पाचावर धारण बसली. हे महत्त्वचे काम केल्याने शाहूंचा बाळाजी पंतांवरचा विश्वास कैकपटीने वाढला व परिणामी दरबारातही बाळाजी विश्वनाथांचे वजन इतर मानकऱ्यांच्या तुलनेत वाढले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
▶️📜 २८ फेब्रुवारी इ.स.१७१९
दि. २३ फेब्रुवारीला सैय्यद बंधू व बादशहात वाटाघाटी झाल्या. त्या नेमक्या कोणत्या ते माहीत नाही. परंतु, यानुसार मदनसिंहाला मोंगलांनी मुक्त केले. दि. २८ फेब्रुवारीला हुसेनअलीची फौज दिल्लीत घुसली. यात महम्मद अमीन खान व मराठ्यांची झटापट झाली. दुर्दैवाने या लढाईत बाळाजी महादेव फडणीस (भानू) आणि संताजी भोसले मारले गेले. फर्रुखसियरने पुन्हा आपला शब्द फिरवला. त्याने शाहू महाराजांच्या मातोश्री व इतर परिवाराची सुटका करण्यास नकार दिला. आता मात्र सय्यद बंधू भडकले. त्यांनी लालकिल्ल्यातच सैन्य घुसवले व फर्रुखसियरलाच बेड्या ठोकल्या. सय्यदबंधूंनी फर्रुखसियरचा चुलतभाऊ रफिउदौरजत याला ताबडतोब दिल्लीचा बादशहा म्हणून घोषित केले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
▶️📜 २८ फेब्रुवारी इ.स.१७५७
अब्दाली गोकुळ मथुरेच्या दिशेने पुढे गेला. काही दिवसांपूर्वीच राघोबादादांनी येथील यात्रांसाठी करमाफी मिळवली होती. २८ फेब्रुवारी ते ६ मार्च या दरम्यान गोकुळात होळीचा उत्सव सुरू असताना पठाणांची स्वारी आली आणि होळीच्या रंगात रक्ताचे पाट वाहू लागले. यमुनेचे पात्र लालीलाल करून सोडले. रस्त्यातून प्रेताचे ढीग इतके पडले की, चालावयास वाट मिळेना. भरतपूर, दिग, कुंभेरी हे वास्तविक लुटण्याचा अब्दालीचा इरादा होता. परंतु सूरजमलने वकिली आणि युद्धाचीही तयारी दाखवून त्यास आपल्या प्रांतापासून दूर ठेवले. मथुराही प्रदेश जाटांचाच. परंतु मोकळ्यावर असल्याने आणि अपुरी शिबंदी असल्याने तो पठाणांच्या तडाख्यात सापडला. आपल्या क्रूरतेचे प्रतीकच जणू म्हणून अब्दालीने खुलेआम आदेश दिला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
▶️📜 २८ फेब्रुवारी इ.स.१७७८
कोल्हापूरकरांचा साताराकरांबरोबर तह
२८ फेब्रुवारी रोजी पुन्हा एकदा सटवाजी भोसले यांनी ५०० घोडेस्वार घेऊन थेट महादजीच्याच चौकीवर हल्ला चढवला. त्याठिकाणी उदाजी पवारांचा नातू मल्हारराव पवार होता. सटवाजींच्या पट्ट्याच्या घावात मल्हाररावाच्या नाकाचा शेंडा उडाला. महादजीची सात माणसे जागीच ठार झाली. वेळ पाहून सटवाजी फौज घेऊन शहरात परतले. शेवटी ५ मार्च रोजी महांकाळी तोफ कराड येथे येऊन पोहोचल्याचे वर्तमान महादजीस समजले. गेले तीन महिने कोल्हापूरास वेढा पडला होता. अतोनात जिवीत व वित्तहानी झाली होती. इकडून हैदर अलीचीही फौज अजून आली नव्हती. त्यात महांकाळी तोफ कोल्हापूरात पोहोचल्यास तटबंदी टिकाव धरु शकणार नाही हे ओळखून सेनापती येसाजी शिंद्यांनी महादजीच्या अटीवर तह करण्याचे कबूल केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 २८ फेब्रुवारी इ.स.१८११
इ. स. १८०४ मध्ये एलफिन्स्टनची 'नागपूरकर भोसल्यांचा वकील' म्हणून नागपुरास बदली करण्यात आली. १८०८ पर्यंत तो नागपुरातच होता. त्यानंतर इ. स. १८०८-१० या काळात काबुल-कंदहार प्रांतात इंग्रजांचा राजदूत म्हणून त्याची नेमणूक करण्यात आली. या काळात त्याच्याकडून फारशी काही कामगिरी न होऊ शकल्याने अखेरीस इ. स. १८१० मध्ये त्याला परत बोलवण्यात आले अन् दि. २८ फेब्रुवारी १८११ या दिवशी माऊंट स्टुअर्ट एलफिन्स्टनने पुण्यात पेशवे दरबाराच्या रेसिडेंट पदाची सूत्रे हातात घेतली. पूर्वी 'तैनाती फौजेच्या करारा'नुसार आता एलफिन्स्टनला पुणे दरबारातल्या कामाबरोबरच मराठी राज्यातल्या परिस्थितीवरही नियंत्रण ठेवण्याचे बंधन होते. मराठी राज्य म्हणजे आता एकसंध राज्य नव्हतेच. मराठा संघराज्य (Maratha Confederacy) मुळे मूळे मालक छत्रपती-पेशवे आणि त्यांचे सरदार यांच्यात बेबनाव झाला होता. दोन्ही पक्षांमध्ये प्रचंड दरी निर्माण झाली होती. शिंदे, होळकर, गायकवाड, भोसले, पटवर्धन, देसाई, पवार असे अनेक सरदार छत्रपतींपासून आणि पेशव्यांपासून फारकत घेऊन आपली 'स्वतंत्र राज्ये' निर्माण करायच्या विचारात होते. परिस्थिती दिवसेंदिवस चिघळत चालल्याने एलफिन्स्टनने उभय पक्षांच्या दरम्यान समझोत्यासाठी एक मसुदा तयार केला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment