ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष



⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

▶️ ६ फेब्रुवारी इ.स.१६७१
शिवकालीन पत्रसार संग्रह, मुंबई ते सुरत
"दाऊदखान सालिहेरला होता.तो आपल्या मुलाच्या मदतीस बुर्हाणपूरला निघाला. तेवढ्यांत शिवाजीराजांनी साल्हेर घेतला."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ ६ फेब्रुवारी इ.स.१६७४
महाराणी काशीबाई पुण्यतिथी
छत्रपती शिवाजी महाराजांची चौथी पत्नी महाराणी काशीबाई यांचे पाचाड येथे निधन.. महाराणी काशीबाई सिंदखेडच्या जाधवराव घराण्यातील होत्या.. जिजाऊंचे बंधु अचलोजी जाधवराव हे त्यांचे आजोबा तर संताजी जाधवराव हे त्यांचे वडील होते.. छत्रपती शिवरायांचा आणि त्यांचा विवाह एप्रिल १६५७ मध्ये झाला... त्या निपुत्रीक असुन त्यांचा मृत्यु ६ फेब्रुवारी १६७४ मध्ये झाला....
महाराणी काशीबाई यांची आज पुण्यतिथी.....
कुशावर्त तलावाजवळील समाधी रायगड किल्ला
कुशावर्त तलावाजवळ उत्तरेस दोन समाध्या दिसतात या समाध्यांपैकी एक महाराणी काशीबाई आणि दुसरी मोरोपंत पिंगळे यांची आहे असे बोलले जाते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ ६ फेब्रुवारी इ.स.१७३८
मोगलांचा कोय परगणा बाजीराव पेशव्यांनी लुटला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ ६ फेब्रुवारी इ.स.१७३८
'बाजीराव म्हटल की फक्त मस्तानीच काहीजणांना आठवते.' बाजीरावांची परकीय शत्रूंना किती दहशत होती ते पहा..
"जर बाजीराव विजयी झाला तर मग त्याच्याशी लढणे कुणालाच शक्य होणार नाही आणि जर तो पराभूत झाला तर त्याचे माघार घेणारे सैन्य इकडे साष्टी बेटात येऊन तळ ठोकून राहण्याचा संभव आहे. ह्या दोन्ही प्रसंगी आम्हाला साष्टी बेट घेणे अशक्य होईल"
पोर्तुगीजांचा गोव्याचा व्हाॅइसराॅय कौंट द सांदोमिल याचे उत्तरेकडील सेनापती आंतोनियु कार्दिम फाॅइश याला पत्र..
दिनांक - ६ फेब्रुवारी १७३८
स्थळ - गोवा
पोर्तुगीज दप्तर खंड तिसरा पत्र क्रमांक - ८१

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ ६ फेब्रुवारी इ.स.१९३२
पहिली क्रांतिकारी महिला बिना दास यांनी बंगालचे गर्वनर स्टॅन्ले जॅक्सन यांचे हत्येचा ६ फेब्रुवारी १९३२ रोजी प्रयत्न केला.
कोलकाता विद्यापीठाचे दीक्षांत समारंभात त्यांनी स्टॅन्ले जॅक्सन यांचेवर पिस्तुलातून ५ गोळ्या झाडल्या. त्यांना ९ वर्षाची कारावासाची शिक्षा झाली. पदवीदान समारंभातच त्यांना अटक झाली व त्यांना त्यावेळी पदवी दिली नाही.
पतीच्या निधनानंतर त्या ऋषिकेश येथे अज्ञातवासात गेल्या. तेथेच २६ डिसेम्बर १९८६ रोजी निधन झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️ ६ फेब्रुवारी इ.स.१९३९
महाराज श्रीमंत सयाजीराव खंडेराव गायकवाड (तिसरे) स्मृतिदिन
(जन्म : कौळाणे, ता. मालेगांव, नाशिक जिल्हा, ११ मार्च १८६३)
हे इ.स. १८७५ ते इ.स. १९३९ सालांदरम्यान बडोदा संस्थानचे अधिपती होते. ते अत्यंत पुरोगामी वृत्तीचे, कर्तृत्ववान संस्थानिक (कारकीर्द - १८८१-१९३९) होते. बडोदा संस्थानातील प्रजेच्या कल्याणासाठी केलेल्या कार्याकरता ते विशेषत्वाने ओळखले जातात.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments