ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶️📜 २५ फेब्रुवारी इ.स.१५६८
अकबर बादशहाने रजपुतांचा प्रचंड पराभव करुन चित्तोडगड आपल्या ताब्यात घेतला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 २५ फेब्रुवारी इ.स.१६३७
शहाजीराजे आदिलशाहीत दाखल - फर्जद किताब मिळाला.
फेब्रुवारी १६३७त महाबली शहाजीराजे आपली पत्नी जिजाबाई, मुलगा संभाजी व बाल शिवाजीसह विजापुरी गेले. शहाजीराजांनी या सर्वांस आपला स्वराज्य संपादनाचा मनोदय सांगितला तो असा, संभाजीराजे यांनी कर्नाटकात स्वराज्य कमवावे आणि शिवरायाने मातोश्रीसह पुण्यास राहून महाराष्ट्रात स्वराज्य स्थापावे. तिथे ते २५ फेब्रुवारी रोजी आदिलशहाच्या चाकरीत दाखल झाले. आदिलशहाच्या संमतीने शहाजीराजांनी विजापूर जवळच्या कंपिली गावी आपणांस राहण्यासाठी एक वाडा बांधला. मोठा बगिचा केला व तेथे ते राहू लागले. काही दिवसानी कंपिली गावात बांधलेला वाडा आपणासाठी आदिलशहाने द्यावा अशी खटपट घोरपड्यानी अदिलशहापाशी केली. तेव्हा आदिलशहाने शहाजीराजांची बदली बंगरुळास केली व कंपीचा वाडा घोरपड्यास राहण्यासाठी दिला. महमद आदिलशहा तरुण, तल्लख व महत्त्वाकांक्षी होता. मोगलांशी गोडी झाल्याने उत्तरेकडून आपल्यावर स्वारी होणार नाही हे आदिलशहाने लक्षात घेतले आणि कर्नाटक जिंकण्याच्या कामगिरीवर शहाजीराजे यांना विजापूर सरदार रणदुल्लाखान याज समवेत नेमले. यावेळी आदिलशहाच्या नजरेसमोर दक्षिणेतील तुंगभद्रा व रामेश्वरपर्यंतचा हिंदूराजांनी व्यापलेला प्रदेश होता. हा प्रदेश आदिलशहा व कुतूबशहा यांनी जिंकणे त्यांच्या फायद्याचे होते. म्हणून ह्या दोन शाह्यांनी करार करून ठरविले की कर्नाटकचा पूर्व भाग कुतूबशहाने व पश्चिम भाग आदिलशहाने जिंकावा.
शहाजी राजे विजापूरच्या चाकरीत हजर झाल्यावर आदिलशहाने रणदुल्ला खानास त्याजबरोबर
देऊन कर्नाटकांतील हिंदू राजांस जिंकण्यास पाठविले. [एक्याण्णव कलमी बखर, क्र. २२.]
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 २५ फेब्रुवारी इ.स.१६६०
बादशहाचे फर्मान ऐकून सर्व मोगल सरदार मराठ्यांवर स्वारी करण्यास तयार झाले. त्यांना आगेकूच करण्याचा हुकूम शायिस्तेखानाकडून मिळाला. तेव्हा नौबतीच्या इशाऱ्यात मोगली फौज निघाली ती औरंगबादला आली. औरंगाबाद ही दक्षिणेच्या सुभेदाराची राजधानी. तिथे आल्यावर शायिस्तेखानाने तेथे काही दिवस राहून तेथील बंदोबस्त केला. औरंगाबादेस त्याने आपला मुलगा अबूलफत्तेखान याची प्रतिनिधी म्हणून नेमणूक केली. नंतर तो तेथून निघाला तो अहमदनगरास दिनांक ११ फेब्रुवारी १६६०त फौजेसह येऊन दाखल झाला. दिनांक २५ फेब्रुवारी १६६० रोजी त्याने अहमदनगर सोडले. वाटेत महाराजांना पाण्यात पाहणारे घाटगे, जाधवराव, कोकाटे, गाढे आदी मराठे सरदार खानास येऊन मिळाले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
▶️📜 २५ फेब्रुवारी इ.स.१७२८
सरदार रायाजीराव जाधवराव यांना वीरमरण
घुमट म्हणजे श्रीमंत सरदार रायाजीराव जाधवराव यांची समाधी होय. भारतीय इतिहासातील गनिमी काव्याचे सर्वोत्तम उदाहरण म्हणून ओळखली जाणारी "पालखेडची लढाई". पहिल्या बाजीरावाच्या नेतृत्त्वाखाली मराठा साम्राज्य आणि हैद्राबादच्या निजामात झालेल्या या युद्धात मराठ्यांनी खनखनित विजय मिळवला. या युद्धात सरदार रायाजीराव जाधवराव छत्रपती शाहूंचे विश्वासु म्हणून सहभागी झाले होते.
२५ फेब्रुवारी १७२८ रोजी नाशिकमधिल पालखेड जवळील निपाणी प्रदेशात झालेल्या धुमश्चक्रीत सरदार रायाजीरावांना वीरमरन आले. परिणामतः २८ फेब्रुवारीला निजाम नाक धरून मराठ्यांना शरण आला. जाधवरावांनी गाजवलेल्या मर्दुमकीची साक्ष म्हणून ही प्रशस्त छत्री/समाधी भुईंज(सातारा) गावाच्या मध्यवर्ती चौकात बांधण्यात आली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 २५ फेब्रुवारी इ.स.१७४२
नानासाहेबांचे धाकटे बंधू रघुनाथरावही आता जवळजवळ आठ वर्षांचे झालेच होते. त्यामुळे नानासाहेबांनी रघुनाथरावांचे लग्न काढले. राधाबाई या अजूनही 'कर्त्या' असल्यामुळे बहुदा त्यांनी आपल्या 'बर्वे' घराण्यातील एक मुलगी सुचवली असावी, असे वाटते. म्हणून मौजे जळगाव (मूळ शाखा डुबेरे?) येथील गणेशपंत बर्वे सावकारांची कन्या जानकीबाई (माहेरचे नाव?) यांचा दि. २५ फेब्रुवारी सन १७४२, फाल्गुन शुद्ध द्वितीया शके १६६३, दुर्मतीनाम संवत्सरी गुरुवारी नानासाहेबांचे धाकटे बंधू रघुनाथराव यांच्याशी करण्यात आला. राधाबाईंची आणखी एक नातसून घरात आली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
▶️ २५ फेब्रुवारी इ.स.१८१८
दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या बहुतेक सर्व किल्ल्यांची तोड़फोड़ केली . त्यात २५ फेब्रवारीला चाकण उर्फ संग्रामदुर्ग किल्ला ले. कर्नल डिफनने उद्धवस्त केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment