ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶️ ९ फेब्रुवारी इ.स.१६५८
तुंग-तिकोना गडाचा फारसा इतिहास उपलब्ध नाही.. परंतु पंधराव्या शतकाच्या अखेरीस, मलिक अहमद निजामशहा याने इ. स. १४८२-८३ च्या सुमारास जुन्नर प्रांतावर स्वारी करून जुन्नर चा बराचसा प्रांत आला त्यानंतर त्याने लोहगड काबीज केला. नंतर त्याने आपले सैन्य तुंग व तिकोना गडांकडे वळविला.इ.स. १५८५ मध्ये मलीक अहमद निजामशाहने हा किल्ला जिंकुन निजामशाहीत आणला. इ.स. १६५८ मध्ये शिवाजी महाराजांनी तुंग- तिकोना किल्ला जिंकुन परत स्वराज्यात
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ ९ फेब्रुवारी इ.स.१६६५
छत्रपती शिवाजी महाराजांनी विजापुरकरांचे 'बसनुर' छापा घालुन लुटले. छत्रपती शिवाजी महाराजांनी बसनुरची स्वारी ही जलमार्गे केली, राजांनी नौकाप्रवास करुन सागर ऊल्लंघु नये ही अंधश्रध्दा उधळुन लावली.
शिवराय हिंदु धर्मातील परंपरांचा सन्मानपुर्वक गौरव गाणारे होते पण धर्मातील खुळचट रुढींना आपल्या चरीत्रात त्यांनी मुळीच थारा दिला नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ ९ फेब्रुवारी इ.स.१६७०
(माघ वद्य १४, चतुर्दशी, शके १५९१, संवत्सर सौम्य, वार बुधवार)
महाराजांचे वाढते आरमार!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या वाढत्या आरमाराने आरमारी प्रभावाने त्रस्त होऊन नाइलाजाने पोर्तुगिजांनी महाराजांच्या बरोबर तह केला व आपल्या हद्दीतही महाराजांच्या गलबतांना मुक्त संचार करण्यास परवानगी दिली. महाराजांच्या आरमाराला तत्कालीन सत्ताकर्ते किती घाबरत होते हे यावरुन दिसते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ ९ फेब्रुवारी इ.स.१६८९
(माघ शुद्ध १४, चतुर्दशी शके १६१०, दुर्मती संवत्सर, वार शनिवार)
राजाराम महाराजांचे पुन्हा मंचकारोहण!
किल्ले रायगडावर राजाराम महाराजांचे पुन्हा एकदा मंचकारोहण करण्यात आले. शके १६११ फाल्गुन अमावस्या ११ मार्च इ.स.१६८९ रोजीच्या काळ्या दिवशी श्री सखी राज्ञी जयती, सकल सौभाग्य संपन्न वज्रचुडेमंडीत महाराणी येसुबाईसाहेब यांच्या कपाळावरचे कुंकू कायमचे पुसले गेले. ऐन तारुण्यात वैधव्याचा वज्रप्रहार त्यांना सहन करावा लागला. हे दुःख पचवणे खर तर सामान्य गोष्ट नव्हतीच. मात्र शोक करायला वेळ नव्हताच. महाराजाची ही सुन ऐन आणीबाणीच्या प्रसंगी पदर खोचून स्वराज्यासाठी तडफेने उभी राहिली. स्वतःच्या पुत्राचे हित बाजुला ठेवुन फक्त स्वराज्यासाठी स्वतःच्या दिराचा म्हणजेच राजाराम महाराजांचा मंचकारोहण करण्याचा धाडसी व क्रांतिकारी निर्णय येसुबाईसाहेब यांनी घेतला. किल्ले रायगडाला झुल्फिकारखानाचा वेढा होताच त्यामुळे गडावर मसलत बसून सर्वानुमते राजाराम महाराजांचे मंचकारोहण पार पडले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ ९ फेब्रुवारी इ.स.१७४३
गोव्याच्या व्हिसेरेईने छत्रपती संभाजी महाराजांना पाठविलेल्या पत्राची नोंद!
"रामचंद्र बाबाजी यांची बडदास्त आम्ही चांगली ठेवली होती. तरिही ते आम्हाला न सांगता न सवरता इकडून गुपचूप निघून गेले". "मी आपल्या निदर्शनास आणू इच्छितो की, आमच्या शेजारच्या प्रदेशात जर रामचंद्र बाबाजी यांचे वास्तव्य झाले तर ते आम्हाला बिलकूल आवडणार नाही आणि त्यांनी आमच्यावर केलेल्या आरोपांचा आपण पाठपुरावा केला तर त्यालाही आमची हरकत असेल".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️ ९ फेब्रुवारी इ.स.१७५७
प्लासीचा तह
प्लासीच्या लढाईपासून इंग्रजांच्या राज्याचा पाया हिंदूस्थानात रोवला गेला असे म्हणतात.
सिराजउदौला अनेक गोष्टींमुळे पेचात सापडलेला होता. याचा फायदा घेऊन क्लाईव्ह ने त्याच्याशी ९ फेब्रुवारी १७५७ रोजी तह करून घेतला.
या तहानुसार सिराजउदौला ने मागील युद्धातले इंग्रजांचे नुकसान भरून दिले.तसेच तहात यानंतर सर्वांनी तटस्थ रहावे असे ठरले.परंतू इंग्रजांनी प्रामाणिकपणा न दाखविता फ्रेंचांविरोधात आघाडी उघडली व सिराजलाच मदत मागितली. क्लाईव्हने चंद्रनगरवर हल्ला करून ते ताब्यात घेतले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment