ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

▶️📜 १९ फेब्रुवारी इ.स.१६३०
(फाल्गुन वद्य ३, तृतीया, शके १५५१, संवत्सर शुक्ल, वार शुक्रवार)

पराक्रमी सुर्याचा जन्म!
पराक्रमी सूर्याचा जन्म झाला... ज्यांच्यामुळे आज जगात ताठ मानेने मराठी म्हणून जगता येते. त्या जगातल्या एकमेव सर्वोत्तम राजाचा, अर्थात छत्रपती शिवाजी महाराजांचा किल्ले‌ शिवनेरी येथे जन्म झाला. अशा युगपुरूषोत्तम आणि जगातल्या एकमेव सर्वोत्तम राजा छत्रपती शिवाजी महाराज यांचा आजच्याच दिवशी जन्म झाला. त्यांच्या हिमालयाएवढ्या कर्तुत्वाकडे पाहून इतकंच म्हणावसं वाटतं, छत्रपती शिवरायांचे आठवावे रूप, शिवरायांचा आठवावा प्रताप, आणि शिवरायांचा आचरावा प्रताप... भूमंडळी...! हिंदवी स्वराज्य संस्थापक, मर्यादा पुरूषोत्तम, छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मानाचा मुजरा...!!

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 १९ फेब्रुवारी इ.स.१६८१
(फाल्गुन शुद्ध द्वादशी, शके १६०२, रौद्र संवत्सर, वार शनिवार)

औरंगजेब बादशहास बुन्हानपुर लुटीची बातमी!
    खानजहानला मराठ्यांनी दिलेल्या चकव्यामुळे लुटीच्या मालासकट मराठे चोपडा मार्गे साल्हेरला गेल्याने खानजहानला हात चोळत, बसावे लागले. याच बुन्हानपुर लुटीसंबंधी औरंगजेब दरबारात याची बातमीपत्रात खालील नोंद आहे. बुन्हाणपुरच्या वृत्तपत्रावरून असे समजते की, "शत्रू सैन् एकत्र जमून आले या बातमीमुळे खानजहान, काकरखान येथे आला. किल्ला बंद करून त्याने खबरदारी बाळगली. शत्रू मात्र करणपुऱ्यावर तुटून पडला. रजपुतांना निःशस्त्र केले. व ३, तीन दिवस शहरात राहून तो लुटून नेला"

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 १९ फेब्रुवारी इ.स.१७६०
निजामाच्या या पराभवानंतर सारी दक्षिण काबीज करावी हाच श्रीमंत सदाशिवराव भाऊसाहेब यांचा इरादा होता. उत्तरेकडील सरदारांस पाठविण्यात आलेल्या भाऊसाहेब दिनांक १९ फेब्रुवारी सन १७६० लिहितांत "तिकडील पेचामुळें इकडे आटोपते घ्यावे लागलें. नाही तरी सारी दक्षिण मोकळी होती.."

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 १९ फेब्रुवारी इ.स.१८१८
पेशव्यांचे अखेरचे सरसेनापती सरदार बापू गोखले यांचे आष्टी येथे झालेल्या ब्रिटिशांविरुद्धच्या घनघोर लढाईत वीरमरण !

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 १९ फेब्रुवारी इ.स.१९५१
छत्रपती शिवाजी महाराज आणि व्हिएतनाम
गूगलवर ‘shivaji staue in vietnam’ शोधल्यावर लांबून एक घोड्यावर बसलेल्या योध्याचा फोटो दिसतो. तो पुतळा दक्षिण व्हिएतनाम मधील एक शहर होचिमिन सिटी (जुनं नाव सैगोन) मधील आहे त्याच्या मागे एक फुलाच्या कळी सारखी काचेची इमारत दिसते तिचा नाव आहे ‘Bitexco Financial Tower’. तो एक व्हिएतनामी राज्याचा पुतळा आहे त्याचा नाव आहे ‘Trần Nguyên Hãn’. आणि त्याच्या हातात कबुतर आहे.

होचिमिन हा त्यांचा राष्ट्र पिता आणि शिवाजी महाराजांचा गाढा अभ्यासक त्याच्या कबरीवर लिहलंय ‘ छत्रपती शिवाजी महाराजांचा मावळा इथे चिरविश्रांती घेत आहे’
होची मिन यांचा कार्यकाळ १९ फेब्रुवारी १९५१ ते २ सप्टेंबर १९६९. यांना व्हिएतनामचे राष्ट्रपिता म्हणतात. त्यांच अजून एक वैशिष्ठ्य म्हणजे एक्दम साधी राहणी. या माणसाचं सगळ्यात मोठा वैशिष्ठ्य म्हणजे ते व्हिएतनामचा खुपमोठा ऊर्जा स्रोत होते आणि आजही आहेत.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments