ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶📜 १२ मार्च इ.स.१६६४
सुरतकरांनी कंपनीस एक पत्र पाठविले ते असे :
"...शिवाजीची सत्ता व सामर्थ्य वाढत असून सर्वांना त्याचे भय वाटते... आज त्याच्या ताब्यात काही नाही तरी आठ नऊ महत्त्वाची बंदरे आली आहेत. या प्रत्येक बंदरातून इराण, बसरा, मक्का या बाजूला त्याची निदान दोन तीन गलबते व्यापारानिमित्त बाहेर पडतात...."
या व्यापारार्थ बाहेर पडणाय्रा महाराजांच्या गलबतांना पकडून इंग्रजांना आपल्या वखारीच्या लूटीची भरपाई करुन घ्यायची होती त्यासाठी टपून बसले होते.
शिवरायांनी आता मोठ्या आरमारी स्वारीचा बेत आखला होता. त्याचे नेतृत्व ते स्वतः करणार होते त्यानुसार फेब्रुवारी १६६५ रोजी शिवराय मालवण येथील सिंधुदूर्गाहून ८५ लहान गलबते व ३ मोठी गलबते घेऊन बार्सिलोर
( बसनूर ) वर निघाले त्यांच्या बरोबर ४००० सैन्य होते. बसनूर हे शहर शिवरायांनी लुटले. या स्वारीचे वर्णन सभासद बखरकार करतो - " शहरांचे लोक बेहुशार होते. एकाएकी जहाजांतून मराठे उतरले, शहर मारिले एक दिवस शहर लुटून फन्ना केले. जैशी सुरत मारुन मालमत्ता आणली त्याप्रमाणे बसनूरची मालमत्ता, अगणित माल, जडजवाहीर, कापड जिन्नस घेऊन देशास आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶📜 १२ मार्च इ.स.१६८२
मुंबईकर इंग्रज सुरतकर इंग्रजांना लिहिलेल्या पत्राची नोंद!
"सिद्दीसारख्या दुष्ट आणि माजोरी, खुनशी वृत्तीच्या लोकांना आपण राहू दिल्यास छत्रपती संभाजी महाराज आपणास विचारणा केल्यावाचून राहणार नाहीत. आपण काय ऊत्तर देणार? आपणाजवळ तर जहाजे आणि सैन्य पण नाही. त्यांचा तर दंडाराजपुरी घेण्याचा निर्धार दिसतो. तसे झाले तर ते किणाऱ्याचे मालक होतील. तेव्हा सिद्दीला पावसाळ्यात येथून हलविणे योग्य होईल तशी तजवीज करावी".
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶📜 १२ मार्च इ.स.१६८५
विजापुरवर हल्ला!
सर्जा वगैरे विजापुरी लोक आणि छत्रपती संभाजी महाराजांचे लोक यांनी लष्करापासून ३० (सुमारे ५० कि.मी.) मैल अंतरावर येऊन ठाण मांडले आहे व लढाईचा हेतू आहे. म्हणून शहजाद्याने रात्री हल्ला केला. लढाई झाली. त्याने अनेकांना ठार मारले. मोगल लोक कामास आले. बादशहाने बक्षिसे दिली. विजापुरच्या किल्ल्याला वेढा पडला. रसलपुरच्या बाजूने (पश्चिमेकडून) बहादुरखान, शहापुरच्या बाजूने राहुल्लाखान बक्षी, नागठाण विजापुरपासूनचे ८ मैलांवरील (सुमारे १३, कि. मी. वरिल) ठिकाणी बहादुरखानाचा तळ पडला. लढाईची सर्व सुत्रे शहजादा आज्जमच्या हातात होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶📜 १२ मार्च इ.स.१७०१
स्वातंत्र्यसौदामिनी स्वराज्याची मुत्सद्दी महाराणी ताराऊसाहेब
बादशहाने जोरदार आक्रमणे सुरु केली. याकाळात ताराराणींनी कुशल युद्धनीतीने मत केली. बादशहाच्या फौजेने वेढा दिलेला किल्ला जास्तीत जास्त काळ लढवायचा पावसाळा जवळ येईपर्यंत किल्ला लढवायचा व नंतर वाटाघाटी करून रोख रक्कम घेऊन किल्ला बादशहाच्या ताब्यात द्यायचा हि रणनीती वापरली. वेढ्यातल्या सैन्यावर मराठे आक्रमण करतच याचबरोबर धनाजी जाधव, हणमंतराव निंबाळकर, नेमाजी शिंदे मोगली मुलखात धुमाकूळ घालत यांना रोखण्यासाठी बादशहा दाऊदखान, राव डाळपात बुंदेला, शहजादा बेदरबख्तत, जुल्फिरखान यांना पाठवत. औरंगजेबाचा चरित्रकार भीमसेन सक्सेना म्हणतो एकट्या जुल्फिरखानाला १७०० च्या मोहिमेत २००० कोसांच्या हालचाली कराव्या लागल्या. सातारा, परळी दोन किल्ले घेतल्यानंतर बादशहा माणदेशात सरकला. पुढे त्याने पन्हाळा-पावनगडास वेढा घातला या परिस्थिती मराठे जोमाने लढत होते. विठोजी केसरकरांनी गडाबाहेर पडून मोर्चा मारल्यानंतर त्यांचे कौतुक करणारे पत्र ताराराणींनी लिहिले त्यातून त्यांनी जिद्द व आत्मविश्वास वाढविला "तुम्ही हमेशा कस्त करून गनिमास नजिता पावविता. एक दोन वेळ मोर्चा मारिला. औरंगजेबाला तरी ठेचगा द्यावा अशी उमेद धरता, म्हणून हे वर्तमान देवजी रघुनाथ व फडणीस यांनी विदित केले त्यावरून तुमचा मुजरा झाला. ऐसियास तुम्ही एकनिष्ठ सेवक तैसेच राहा. याउपरी औरंगजेब आला आहे तरी त्याचा हिसाब न धरता स्वामींची जागा जतन करणे. स्वामी उर्जित हरबाब करतील. दिलासा असो देणे."
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶📜 १२ मार्च इ.स.१७०१
बादशहा विशाळगडाकडे येतोय हे समजताच ताराराणी व शिवाजीराजे प्रतापगडावर पोहचल्या. या प्रसंगी ताराराणींनी मराठा सरदार प्रतापराव मोरे यांना लिहलेले एक पत्र उपलब्ध आहे ज्यावरून त्यांचे लढाईचे धोरण, सरदारांशी वागणूक, शत्रूशी लढण्याचा निर्धार दिसून येतो. त्यातील एक वाक्य असे "औरंगजेब विशाळगडास बिलगला याजकरिता त्याचे कविलावाड मारून हमेशा गोटावर हल्ले करावेत, तरीच तो बलकुबल राहतो. याजकरिता तुम्ही लोक आपले अवघे एकदील होऊन औरंगजेबास जडून राहणे. तुम्ही स्वामींचे एकनिष्ठ सेवक, मायेचे विश्वासू आहा.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶📜 १२ मार्च इ.स.१७७३
समशेर बहाद्दर सरदार खंडेराव बर्गे
यांनी १२ मार्च १७७३ रोजी राजधानी रायगड
किल्ला जिंकून स्वराज्यात आणला .छत्रपती
महाराज यांनी ही जबाबदारी जुने विश्वासू,
लढवय्ये सरदार म्हणून खंडेराव यांचे वर सोपवली
होती .
त्या बद्दल सातारा चे छत्रपती महाराज यांनी
समशेर बहाद्दर हा खिताब दिला तसेच इनाम वतन
त्यांना दिले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment