ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

▶📜 १३ मार्च इ.स.१६६५
(चैत्र शुद्ध सप्तमी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार सोमवार)

स्वराज्य संकटात, मोगली फौजांचा स्वराज्यात धुमाकूळ!
   संकटाची मालिका सुरू झाली होती. कोटीचंडी यज्ञ करून आलेल्या मिर्झाराजे जयसिंग यांच्या परवानगीनंतर मिर्झाराजे जयसिंगच्या फौजांनी दिलेरखानाच्या नेतृत्वाखाली किल्ले पुरंदरला वेढा टाकला. आणि सुरू झाला मराठ्यांचा एल्गार

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶📜 १३ मार्च इ.स.१६७९
छत्रपती शिवरायांनी "दाबोळपूर" जिंकले.
छत्रपती शिवरायांनी कर्नाटकातील भाग जिंकण्यासाठी सरनौबत हंबीरराव मोहिते यांना पाठवले होते .सेनापती आनंदराव मकाजी यांनी जोरदार हल्ला चढऊन दोबाळपुर जिंकून घेऊन तो भाग स्वराज्यात आणला .

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶📜 १३ मार्च इ.स.१६८२
(चैत्र शुद्ध पौर्णिमा, शके १६०४, संवत्सर दुदुंभी, वार सोमवार)

छत्रपती संभाजी महाराजांचे दिवाकर गोसावी यांना पत्र!
        "स्वामी सज्जनगडी पुर्णावतार केला ते स्थळी हणुमंताचे देवालय बांधले आहे. स्वामी असता समुदाय होता. तो सेवेसी असो देणे आणि सुबासुबाहून धर्मादाये इनात देवीला तो आणावून देवांस व समुदायांस पाठवीत जाणे यथाविधी उत्सव समारंभ करीत जाणे तसेच श्री. रघुनाथ देवालय चापळी आहे. तेथील नित्यपुजा, रथोत्सव सनेदप्रमाणे मोईन व इनाम आणवून यथासांग करीत जाणे".

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶📜 १३ मार्च इ.स.१७६०
अब्दालीशी तह
सुभेदार मल्हारराव होळकर कर्तबगारीने शुन्यातून झंजावात उभे करणारा पुरुष. ज्या काळात स्त्रीयांना गोशाशिवाय शिवाय घराबाहेर पडणे मुश्किल त्या काळात अहिल्यादेवींना शिक्षण-राजनीति-युद्धनीतिचे संस्कार करत त्यांना घडवणारा द्रष्टा पुरुष. संपुर्ण आयुष्य लढाया करण्यात गेले. राजकीय मुत्सद्देगिरी कोणालाही चकीत करणारी. वयाच्या पासष्ठाव्या वर्षीही इंग्रजांशीही विजयी झुंज दिली असा हा योद्धा. पानिपत ही एक शोकांतिका. पण १३ मार्च १७६० साली अब्दालीशी तह करुन त्याला परत वाटेला लावण्याचे मुत्सद्दी कार्य त्यांनी केले होते. युद्ध टळत होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶📜 १३ मार्च इ.स.१८००
नाना फडणवीस यांचा मृत्यू (जन्म १२ फेब्रुवारी १७४२)
पेशव्यांच्या दरबारी असणारे मराठा साम्राज्यातील मुत्सद्दी होते. पेशवाईतील साडेतीन शहाण्यांपैकी हे अर्धे शहाणे समजले जात.नाना फडणवीस यांचे मूळ घराणे कोकणातल्या रायगड जिल्ह्यातील श्रीवर्धन येथील होते. त्यांचा जन्म १२ फेब्रुवारी १७४२ रोजी सातारा येथे झाला. बालवयातच नानासाहेब पेशव्यांच्या सान्निध्यात आल्यामुळे राज्यकारभाराचे शिक्षण त्यांना मिळाले. वयाच्या २० व्या वर्षी थोरल्या माधवरावांकडून त्यांना फडणिशीची वस्त्रे मिळाली. एवढे मोठे पद नानांनी आपल्या कर्तृत्वाने आणि मुत्सद्दीपणाने सांभाळले.आपल्या चातुर्याच्या बळावर नानांनी राजकीय घडी बसवलीच होती पण त्यांची कामाची तडफ, त्यांच्या वागण्यातला समतोलपणा या बरोबरच पेशवाई आणि राजसत्तेचा दबदबा आणि दरारासुद्धा त्यांनी वाढवला. इंग्रजांचा पाडाव करण्यातही ते यशस्वी झाले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments