ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶📜 १४ मार्च इ.स.१६४९
छत्रपती शिवरायांनी शहाजीराजांच्या सुटकेसाठी शाहजहानचा मुलगा आणि दख्खनचा सुभेदार शहजादा मुराद यास पत्र पाठविले. छत्रपती शिवाजी राजांच्या दख्खनेमधल्या कारवायांच्या बदल्यात अफझलखानाने शहाजीराजांना २५ - २८ जुलै १६४८ च्या दरम्यान जिंजी येथे अटक केली होती. ह्या पत्राने विजापुरच्या आदिलशहा वर दबाव पडून २ महिन्यानंतर शहाजीराजांची सुटका झाली. मात्र त्या बदल्यात छत्रपती शिवरायांना सिंहगड विजापुरला परत द्यावा लागला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶📜 १४ मार्च इ.स.१६६५
(चैत्र शुद्ध अष्टमी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार मंगळवार)
महाराज किल्ले भिवगडावर मुक्कामी!
शेरखानामुळे कारवारचे महाराजांचे संकट टळले. शेरखानाने इंग्रज व इतर व्यापारी यांना समजावून सामुदायिक खंडणी छत्रपती शिवाजी महाराजांना पेश केली. कारवारवरून महाराज सुमारे २५ कि. मी. अंतरावरील भिवगडास जाण्यास निघाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶📜 १४ मार्च इ.स.१७२३
खानदेशात लांबकानी येथे निजामाच्या फौजांशी युद्ध करून मराठ्यांच्या फौजासह बाजीराव माळव्यात गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶📜 १४ मार्च इ.स.१७६०
पानिपत मोहीमेत अब्दालीच्या सैन्यापेक्षाही पेक्षाही मराठ्यांचा खरा पराभव हा "पाण्याने" केला. दिनांक १४ मार्च सन १७६० रोजी पडदुर येथून निघून सदाशिवराव भाऊसाहेब अत्यंत वेगाने उत्तरेत सरकले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶📜 १४ मार्च इ.स.१८१८
घणगड आणि कोरीगड इंग्रजांच्या ताब्यात
कोरीगड या गडाचा इतिहासात फारसा कुठे उल्लेख नाही गडावरील गुहा गड प्राचीन असल्याचे सिध्द करतात इ.स. १४८६ मध्ये हा किल्ला निजामाने कोळी राजाकडून जिंकला १६५७ मध्ये महाराजांनी लोहगड, विसापूर, तुंग, तिकोना या किल्ल्यांबरोबर कोरीगड आपल्या स्वराज्यात दाखल करून घेतला इ.स. १७०० मध्ये हा किल्ला पंत सचिवांनी मुघलाकडून जिंकून घेतला ११ मार्च १८१८ मध्ये कर्नल प्रॉथरने लढाई करूनही हा किल्ला आपल्याला जिंकता येत नसल्याने फार वैतागला मात्र १४ मार्च १८१८ मध्ये एक तोफेचा गोळा दारुकोठारावर पाडून त्याने हा गड जिंकला गडावर मोठ्या प्रमाणावर प्राणहानी आणि वित्तहानी झाली या किल्ल्याबरोबर दक्षिणेकडील घनगडही इंग्रजांना मिळाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments
Post a Comment