ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 १५ मार्च इ.स.१६६१
छत्रपती शिवाजी राजांनी राजापुरची इंग्रजांची वखार खणून काढून पन्हाळ्याचा सूड उगवला. राजापूरकर इंग्रजांनी सिद्दी जौहरला सहाय्य करून महाराज वेढ्यात आडकलेले असताना, निशाण लाऊन पन्हाळ्यावर तोफा डागल्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १५ मार्च इ.स.१६६५
जयसिंग व दिलेरखान यांनी ठरविल्याप्रमाणे ते पुरंदर किल्ल्यास वेढा घालण्यासाठी पुण्याहून दिनांक १५ मार्च १६६५ रोजी निघाले. बरोबर अफाट फौज, तोफखाना व सामान, सरंजाम होता. ते राजेवाडीच्या जवळपास दिनांक ३० मार्चला पोचले. तेथून जयसिंगाने दिलेरखानास सासवडला रवाना केले. सासवड मुक्कामी त्याजवर मराठी फौजेचा अचानक छापा पडला. गडबड उडाली पण खान आपली फौज घेऊन दौडत सुटला. त्याने पुरंदरचा पायथा गाठला व गडाच्या पायथ्याशी तळ ठोकला (३१ मार्च १६६५) जयसिंगास ही बातमी समजताच त्याने दिलेरखानास मोगली फौजेची कुमक रवाना केली. पुरंदर व वज्रगड या दोन्ही किल्ल्यास वेढा घालण्यास फर्माविले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १५ मार्च इ.स.१६६९
पैशाअभावी मुलीच्या लग्नाची टाळाटाळ करणाऱ्या विठोजी हैबतराव शिळीमकारास जिजाऊ साहेबांनी २५ होन रोख व ५०० माणसांचे सामान देवून त्याच्या मुलीचे लग्न गोमाजी नाईक यांच्या मुलासोबत झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १५ मार्च इ.स.१६७०
छत्रपती शिवाजी महाराजांनी कल्याण व भिवंडी मोगलांकडून जिंकून घेतली. कल्याण व भिवंडीकरांनी आजचा दिवस सणासारखा साजरा करावा.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १५ मार्च इ.स.१६७०
माहुली गडावर मनोहरदासने छत्रपती शिवरायांचा छापा हेरून मराठ्यांवर हल्ला चढवला व ह्या लढाईत १ हजार मराठे कापले गेले. हि गोष्ट छत्रपती शिवरायांच्या जिव्हारी सलू लागली .
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १५ मार्च इ.स.१६७९
शिव छत्रपतींच्या राज्यभिषेका नंतरच्या काळात रामनगरच्या बाजूचा कोळ्यांचा प्रदेश हस्तगत करण्यास मोरोपंत पिंगळेच्या हाताखालील फौजा कोकणातून थेट रामनगरपर्यंत गेल्या आणि त्यांनी वसईच्या पोर्तुगिजांकडे चौथाईची मागणी केली. छत्रपती शिवाजीमहाराजांनी रामनगरचे राज्य जिंकले, तेव्हा त्या राजाला पोर्तुगीज सरकार चौथाईचा हक्क देत असे, तो आपणास मिळावा अशी मागणी महाराजांनी पोर्तुगिजांकडे केली. यासंबंधी कित्येक वर्षे वाटाघाटी चालल्या तेव्हा त्याचा निकाल करण्यासाठी महाराजांनी आपला हुशार वकील पितांबर शेणवी यांस स. १६७७ च्या डिसेंबरात गोव्यास पाठविले. दुसऱ्या वर्षी ते मरण पावले म्हणून चौथाई वसुलीच्या कामगिरीवर महाराजांनी तारीख १५ मार्च १६७९ रोजी गणेश शेट नावाच्या वकिलास गोव्यास पाठविले. तेव्हा त्या सरकारने चौथाईची मागणी मान्य केली पण प्रत्यक्षात दिल्याचा दाखला सापडत नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १५ मार्च इ.स.१६८०
छत्रपती राजाराम महाराजांची जानकीबाईंशी लग्न
वीरगती लाभलेल्या सरनौबत प्रतापराव गुजरांची लेक जानकीबाई. छत्रपती शिवाजी महाराजांच्या चरित्रातील हे शेवटचे मोठे मंगल कार्य. यानंतर १९ दिवसांनी त्यांचे रायगडावर देहावसान झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १५ मार्च इ.स.१७१९
छत्रपती शाहुंनी बाळाजी विश्वनाथ यांना पेशवेपदी नियुक्त केल्यावर लगेचच बाळाजींनी पश्चिम किनारपट्टीवरील सर्वशक्तिमान सरखेल कान्होजी आंग्रे यांना छत्रपती शाहू महाराजांच्या सेवेत आणून मोठा डाव जिंकला. मुत्सद्दी बाळाजींनी परिस्थितीचा योग्य फायदा घेत थेट दिल्लीच्या राजकारणात हात घालून सहा सुभ्यांच्या सनदा मिळविल्या. सनदा मिळाल्यानंतर मराठ्यांचा उत्तरेत मुक्त संचार सुरू झाला. १५ मार्च १७१९ रोजी स्वराज्याच्या सनदा मिळवून राजमाता येसूबाईसाहेब यांना घेऊन २० मार्च १७१९ मराठी फौजा स्वराज्याकडे निघाल्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १५ मार्च इ.स.१७६०
सदाशिवराव भाऊनीच उत्तर हिंदुस्थानात स्वारीस जावे असे पेशवे मंडळात ठरल्यावर भाऊ पडदूराहून १४ मार्च रोजी निघाले व १५ मार्च
रोजी शिंदखेडास येऊन डेरेदाखल झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १५ मार्च इ.स.१८१७
बाजीरावा (दुसरे) पेशव्यांनी सेनापती बापू गोखलेस त्रिंबकजींचा बंदोबस्त करण्यास सांगितले. गोखले नीरेहून परत आले आणि त्यांनी त्रिंबकजींच्या काहीच हालचाली नीरेच्या काठी नाहीत असे पेशव्यास सांगितले हे वृत्त एल्फिन्स्टनला कळविले गेले तेव्हा एल्फिन्स्टनने बाजीरावांची नीती ओळखली आणि बाजीरावांची भेट घेऊन त्यांस बजाऊन सांगितले की “त्रिंबकजींस आम्ही पकडू पण तुमची त्याजला आतून फूस आहे, ती बंद करा. तसेच तुम्ही फौजा जमवून जी लष्करी तयारी करीत आहात तीही लगेच बंद करा”. त्यावर बाजीरावाने अत्यंत कांगावा केला. मी इग्रज सरकारची मर्जी सांभाळण्यात इतका तत्पर असता मजवर हे नसते कुभांड रचण्यात येत आहे”, अशी त्याने बतावणी केली पण त्याचा परिणाम
एल्फिन्स्टनच्या मनावर न होता त्यान दिनाक १५ मार्च १८१७ रोजी कर्नल स्मिथला सैन्यासह पुण्यावर
चालून जाण्यास सांगितल. तसेच गव्हर्नर जनरलला खलिता पाठवून बाजीरावांविरुद्ध उघडपणे युद्ध
पूकारण्याची परवानगी मागितली. पण पुढे याचे रूपांतर तहात झाले गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment