ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜१६ मार्च इ.स.१५२८
फत्तेपूर-शिक्री येथे राणा संग व बाबर यांचे घनघोर युद्ध होऊन राणा संग यांचा पराभव झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜१६ मार्च इ.स.१५९९
स्वराज्य संकल्पक राजे शहाजीराजे यांचा जन्म!
राजे शहाजीराजे यांच्या जन्मतारखांमध्ये इतिहासकारांत मतभेद आहेत.
काही इतिहासकारांच्या मते १५ मार्च इ.स.१५९४, रोजी झाला.
तर काही इतिहासकार म्हणतात १८ मार्च इ.स.१५९४, रोजी झाला.
जन्म तारखेविषयी एकमत नाही. बहुतेक तज्ज्ञ बिकानेर आणि जोधपुर येथील उपलब्ध जन्म पत्रिकेतील तारीख १६ मार्च इ.स.१५९९ रोजीची आहे, त्यामुळे हीच ग्राह्य धरतात. "इतिहासाचे भीष्माचार्य गुरुवर्य वासुदेव सिताराम बेंद्रे सर यांनी ४१ वर्षे अभ्यास करून ही तारीख निश्चित केली आहे." "गजानन भास्कर मेहेंदळे सर यांनीही हीच तारीख श्री राजा शिवछत्रपती खंड १ यात नमूद केली आहे." राजे शहाजीराजे यांचा जन्म १६ मार्च इ.स.१५९९ रोजी झाला. शरीफजीराजे त्यानंतर २ वर्षांनी झाले. राजे मालोजीराजे यांच्या देवाज्ञानंतर त्यांचा मोकासा निजामशहाने त्यांच्या मुलांना म्हणजे राजे शहाजीराजे व शरीफजीराजे यांना दिला. राजे मालोजीराजे यांच्या पश्चात विठोजीराजे यांनी मुलांचे संगोपन केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜१६ मार्च इ. स. १६७३
किल्ले पन्हाळा पुन्हा स्वराज्यात दाखल!
तब्बल १२, बारा वर्षांनी किल्ले पन्हाळा चैत्र शुद्ध अष्टमी, शके १५९५, संवत्सर प्रमादी, वार रविवार, म्हणजेच आजच्या दिवशी, पुन्हा स्वराज्यात दाखल झाला. पन्हाळा स्वराज्यात नसल्याचा सल महाराजांना होताच मात्र कामगिरी कोणास सांगावी हा प्रश्न होता कारण महाराजांच्या शब्दाखातर जीवाचे बलिदान करावयास मराठी मावळे घाबरत नव्हते. आणि नाव आले कोंडाजी फर्जंद! कोंडाजी फर्जंद यांनी पन्हाळगड १२, बारा वर्षांनी स्वराज्यात जोडला तोही अवघ्या ६०, साठ मावळ्यांसह सुलतानढवा करून! रात्रीच्या किर्र काळोखात अवघ्या ६०, साठ मावळ्यांसह किल्लेदार कोंडाजी फर्जंद याने हा गड घेतला. गडाचा किल्लेदार कोंडाजी फर्जंद याने मारला. अन् मग या मावळ्यांनी पराक्रमाची शर्थ केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜१६ मार्च इ.स. १६८१
इंग्रजांना छत्रपती संभाजी महाराजांची दहशत!
महाराजांच्या महानिर्वाणानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी राज्यकारभाराची घडी बसविली! सिद्दीचा बंदोबस्त करण्यासाठी छत्रपती संभाजी महाराजांनी आपला धुर्त व निष्णात वकील आवजी पंडीत यांस २०, नोव्हेंबर इ. स. १६८०, रोजी मुंबईला पाठविले. आवजी पंडीत यांनी आपले काम चोख करून वर इंग्रजांना ऐकवले की, "छत्रपती शिवाजी महाराजांशी झालेल्या तहाप्रमाणे मुंबईकरांनी सिद्दीचा बंदोबस्त केला नाही, तर छत्रपती संभाजी महाराज इंग्रजांविरुद्ध युद्ध पुकारतील त्यामुळे आपण सिद्दीशी असलेला घरोबा व देणारी मदत तात्काळ थांबवावी" छत्रपती संभाजी महाराजांशी वैर नको म्हणून इंग्रजांच्या दडपणामुळे सिद्दी काही काळ मुंबई बाहेर गेलाही!
याच काळात इंग्रजांनी आवजी पंडीत यांची चांगली बडदास्त ठेवली. निघताना त्यांस भारी नजराणाही भेट दिला. छत्रपती संभाजी महाराजांसाठी नजराणा दिला.
यात इंग्रजांचा दुहेरी फायदा इंग्रजांनी ओळखला.
एक तर इंग्रजांशी आणि छत्रपती संभाजी महाराजांशी सलोख्याचे संबंध तयार होण्यास मदत होईल व दुसरे म्हणजे सिद्दी प्रकरणातील घेतलेल्या भूमिकेमुळे व पाठविलेल्या नजराण्यामुळे छत्रपती संभाजी महाराज संतोष पावून किनारपट्टीवरील आपली तांदळाची गरज भागवतील!
चैत्र शुद्ध सप्तमी, शके १६०३, संवत्सर दुर्मती, वार बुधवार, म्हणजेच आजच्या दिवशी, १६, मार्च इ. स. १६८१, रोजी इंग्रजांना छत्रपती संभाजी महाराजांची दहशत बसली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜१६ मार्च इ.स.१६८६
(चैत्र शुद्ध द्वितीया, शके १६०८, संवत्सर क्षय, वार मंगळवार)
छत्रपती संभाजी महाराजांचे धार्मिक पुरोगामी धोरण!
धर्मांतराबाबत महाराजांचे धोरण फारच पुरोगामी होते!
महाराज जातपात, जातीय भेदाभेद मानत नसत. मोगलांकडे जाऊन बादशाही क्रृपेने मोहम्मंद कुलीखान बनलेल्या नेतोजी पालकरांना पश्चात्तापदग्ध झाल्यानंतर महाराजांनी शुद्धीकरण करून पुन्हा हिंदु धर्मात घेतले होते. धर्मांतराबाबत आपल्या पित्याच्या पुरोगामी धोरणाचाच छत्रपती संभाजी महाराजांनी अंगीकार केला व पुरस्कार केला. इ.स.१६८०-१६८१ मध्ये औरंगाबादेच्या हरसुल येथील गंगाधर रंगनाथ कुलकर्णी याने ५ वर्षे इमाने इतबारे मोगलांची चाकरी केली त्या प्रामाणिक क्रृपेचे फळ म्हणून औरंगजेबाने त्यांना सक्तीने मनाविरुद्ध इस्लामची दिक्षा दिली. ही गोष्ट स्वाभिमानी व जाज्वल्य हिंदु धर्मातील गंगाधर रंगनाथ कुलकर्णी यांच्या जिव्हारी लागली. धर्मांतरीत केल्यापासून तो धर्मांतराच्या अग्नीजाळात होरपळत होते. इतके की, अन्नग्रहणही त्याने बंद केले. मोठ्या प्रयासाने छावणीतून त्याने शिताफीने पलायन करुन इ.स.१६८५म ध्ये थेट मराठ्यांचे तीर्थक्षेत्र किल्ले रायगड गाठले व छत्रपती संभाजी महाराजांनी जबरदस्तीने बाटलेल्या गंगाधर रंगनाथ कुलकर्णी यांना अत्यंत मायेने जवळ घेऊन कवी कलश यांच्या मदतीने त्यांस परत यथासांग विधी करून हिंदु धर्मात घेतले!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜१६ मार्च इ.स.१६८६
(चैत्र शुद्ध द्वितीया, शके १६०८, संवत्सर क्षय, वार मंगळवार)
मादण्णापंतांचा व आकण्णापंतांचा निर्घृण खून!
छत्रपती संभाजी महाराजांच्या वर निर्णायक विजय मिळविता येत नाही हे पाहून औरंगजेब बिथरला होता. त्याला कळून चुकले होते की, जग आता आपल्याला हसेल. मराठा साम्राज्य नष्ट करण्याची शपथ घेऊन आलेल्या औरंगजेबाने अदिलशाही संपविल्यावर निजामशाहीकडे दौरा वळवला. त्याला सलत होते ते मादण्णापंत व आकण्णापंत हे बंधू कुतुबशाहीचा सर्व डोलारा या दोघांनीच सावरून धरला होता. कारण कुतुबशहा हा सुखलोलूप होता. सदैव विलासात दंग. मात्र मादण्णापंत व आकण्णापंत यांनी कुतुबशाहीची मान सदैव उंच ठेवली होती. दक्षिण दिग्विजयात महाराजांनी आधी भेट मादण्णापंतांचीच घेतली. इतका दाट स्नेह की, मादण्णापंत व आकण्णापंतांच्या आई आक्कम्माबाईसाहेबांनी महाराजांना जेवण करून घातले. मात्र हेच मादण्णापंत व आकण्णापंत बंधू औरंगजेबाच्या डोळ्यात सलू लागला. औरंगजेबाने फितुरीचे अस्त्र बाहेर काढले. कुतुबशाहीच्या सरोमा बेगमने आपल्या खोजा नोकरांच्या हस्ते मादण्णापंत व आकण्णापंत यांचे निर्घृण खून करवले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜१६ मार्च इ.स.१६९३
शुर सुभेदार मल्हारराव होळकर जयंती
(मृत्यू २० मे १७६६)
हे मूळचे महाराष्ट्रातील धनगर जमातीतील होते.
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मराठा साम्राज्याच्या मावळ प्रांताचे पहिले सुभेदार होते. बाळाजी विश्वनाथ यांनी मराठ्यांचे उत्तर भारतात वर्चस्व प्रस्थापित करण्यात मोठा वाटा असलेल्या मल्हाररावांना इंदूर संस्थानाची जहागिरी दिली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜१६ मार्च इ.स.१७२६
कर्नाटकात मराठ्यांच्या दोन स्वाऱ्या झाल्या. पहिली स्वारी नोव्हेंबर १७२५ पासून मे १७२६ पर्यंतची ही चित्रदुर्ग ची स्वारी. दुसरी नोव्हेंबर १७२६ पासून एप्रिल १७२७ पर्यंतची. ही श्रीरंगपट्टणची स्वारी म्हणून ओळखली जाते. या स्वारीत निजामाचे सहकार्य मिळावे हा हेतू शाहू महाराजांचा होता. पण निजामाने आपल्या मनाचा थांगपत्ता शाहू महाराजांस शेवटपर्यंत लागू दिला नाही. निजामास शाहू महाराज कर्नाटकच्या स्वारीची तयारी करीत आहे हे कळताच त्याने भगवंत रामचंद्र अमात्यास शाहू महाराजांविरुद्ध उठविले. त्यांचा पराभव शाहू महाराजांनी करविला पुढे निजामाचा प्रतिकार उत्तरोत्तर वाढतच गेला. त्याने शाहू महाराजांचे सरदार नीळकंठराव जाधव यांजवर हल्ला करून त्यांना पकडून कैदेत ठेविले. तीस न जुमानता शाहू महाराजांनी प्रतिनिधी, खंडेराव दाभाडे, सुलतानजी निंबाळकर सरलष्कर या सरदारास सन १७२५ च्या दसऱ्या कर्नाटकच्या स्वारीसाठी राजश्री पंत प्रतिनिधी यांस सामील होण्यास हुकूम सोडले. खंडेराव दाभाड्यांनी आपला पुत्र त्रिंबकराव यास पाठविले. शाहू महाराजांनी सोंदूरकर घोरपड्यास सेवेस येण्यास फर्माविले. त्यावरून तेही या स्वारीत येऊन मिळाले. महाराजांनी फत्तेसिंगाना तंजावरकर राजे तुळजोजी यांचे भेटीस तंजावरी जाण्याचा हुकूम केला. अशी ही स्वारी श्रीमंत बाजीरावांनी पुणे तारीख २० नोव्हेंबर १७२५ ला सोडल्यावर इंदापूर, करंबेळ, पंढरपूर मार्गे निजामाच्या सरहद्दीवरून, विजापूर, बिदरगी, गलगले, कोप्पळ मार्गाने चित्रदुर्गला तारीख १६ मार्च १७२६ ला पोचली. स्वारीत फौजांनी जाऊन तुंबलेल्या खंडण्या वसूल केल्या. चित्रदुर्गाहून परत येताना बाजीराव पेशवे हरपनहली व गदग, गोकाक मार्गे येऊन पश्चिमेकडील मार्गाने ते साताऱ्यास तारीख २२ मार्च १७२६ ला पोचले. सबंध पावसाळा साताऱ्यास घालविला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜१६ मार्च इ.स.१७७३
इ.स.१७७३ मध्ये पेशव्यांनी रायगड आपल्याकडे घेतल्यावर त्याची व्यवस्था ठरवून टाकली. छत्रपतींची राजधानी रायगडाहून हलल्यामुळे रायगडाचे राजकीय महत्व कमी झाले होते. मात्र तरीही पेशव्यांनी रायगडाची व्यवस्था अत्यंत चांगल्या प्रकारे ठेवलेली होती. पेशवे दप्तरातील अनेक तत्कालीन कागदपत्रें याची पुष्टी देतात. ह्या कागदपत्रांत शिवछत्रपतींच्या सिंहासनाची जी व्यवस्था आढळतें ती कौतुकास्पद आणि जाणून घेण्यासारखीच आहे.
इ.स.१७७३ मध्यें पेशव्यांनी सिंहासनाबाबत काही गोष्टी आणि रिवाज कायमचे ठरवून टाकले. सिंहासनास चार खांब होते. सिंहासन गजनी, किनखाप, ताफता अश्या बहुमूल्य कापडाने आच्छादिले जात असे. १६ मार्च १७७३ रोजीचा सिंहासनाच्या कापडाच्या खर्चाचा हिशेब उपलब्ध आहे. एकूण १६०८ रुपयांचे कापड २२८ रु. गजनी, २२० रु. ताफता, ८१२ रु. किनखाप, १६ रु. खारवे आणि ३३२ रु.ची मखमल अशा प्रकारे खर्ची पडले. सिंहासनाच्या बैठकीचा भाग व तलाव्याचा भाग यांस कापडण्यासाठी हा खर्च पडला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments
Post a Comment