ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 १७ मार्च इ.स.१६३१
शहाजीराजांनी अॉगस्ट १६३० मध्ये मोगलांची नोकरी पत्कारली. दि. १७ मार्च १६३१ रोजी त्यांची नेमणूक नाशिकचे लष्करप्रमुख म्हणून झाली. मोगलांच्या अन्यायी वागणुकीमुळे अॉक्टोबर १६३१ त्यांची नोकरी सोडून ते निजामशाहीत सामील झाले. आठ वर्षाच्या मुर्तुजा निजामशहाला मांडीवर बसवून त्यांनी इ.स. १६३१ ते इ.स.१६३६ पर्यंत स्वतंत्र कारभार केला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १७ मार्च इ.स.१६६७
(चैत्र शुद्ध त्रृतीया, शके १५८९, संवत्सर प्लवंग, वार रविवार)
नेतोजीराव काबूल प्रांती रवाना करण्यात आले. ( महमंद कुलीखान (नेतोजीराव) काबुल प्रांती!) औररजेबाने नेतोजीरावांना ५ हजारी स्वारांची मनसब देऊन काबूल प्रांती रवाना केले. महाराजांनी आग्रा येथून औरंगजेबाला तुरी दिल्या. मात्र तो राग त्याने प्रतिशिवाजी असलेल्या नेतोजी पालकरांवर काढला. त्यांचा आतोनात छळ केल्यामुळे नेतोजीरावांनी धर्म बदलला. महमंद कुलीखान हे नाव धारण करून ते जगत होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १७ मार्च इ.स.१६७९
कर्नाटक मोहिमेवर महाराज असताना सरनौबत हंबीरराव मोहिते मोरोपंत पेशव्यांनी कोप्पळ जवळील तंगभद्रा नदी काठावरील बहादरपुर किल्ल्याला जोरदार हल्ला चढवून तो जिंकून घेतला. यामुळे पन्हाळा प्रांतापासुन जिंजी पर्यंतची सलग भूमी स्वराज्यात दाखल झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १७ मार्च इ.स.१६८३
(फाल्गुन वद्य चतुर्दशी, शके १६०४, संवत्सर, दुदुंभी, वार शनिवार)
सरसेनापती हंबीरराव मोहिते कल्याण-भिवंडीकडे!
सरसेनापती हंबीरराव मोहिते २० हजार स्वार व १० हजार पायदळ घेऊन मोगलांचा सामना करण्यास कल्याण भिवंडीस उतरले बहादुरखानाच्या सेनेतील पद्मसिंह रतन राठोडचा मुलगा रामसिंह हे सगळे रजपूत सरदार हंबीररावांचा सामना करण्यासाठी हंबीररावांवर चाल करून गेले. स्वतः हंबीरराव मैदानात असल्याने मराठ्यांची समशेर तळपत होती. पद्मसिंह मारला गेला, आजारी असूनही लढत असलेला रतन राठोडचा मुलगा रामसिंह पण फार वेळ टिकू शकला नाही. माणकोजी हरिसिंह हे सरदार मराठ्यांच्या झंझावातापुढे टिकू शकले नाहीत. तुंबळ युद्ध झाले. मात्र मराठा झंझावाता मुळे आणि समशेर बहादुर रणराज हंबीररावांच्या पुढे निभाव न लागल्याने बहादुरखान २ पावले मागे सरकला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १७ मार्च इ.स.१८८४
छत्रपती शाहू महाराजांचा जन्म जून २६ , इ.स. १८७४ रोजी कागल येथील घाटगे घराण्यात झाला. त्यांचे नाव यशवंत, त्यांच्या वडिलांचे अप्पासाहेब तर आईचे नाव राधाबाई होते. कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे छत्रपती शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. एप्रिल २ , इ.स. १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment