ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 १९ मार्च इ.स.१६४६
छत्रपती शिवाजी महाराजांनी व आईसाहेब जिजाबाई यांनी पुण्यात प्रथम आल्यानंतर कसबा गणपतीचे देऊळ बांधले, त्या पुण्यातल्या गणपतीला त्यांनी नंदादीप दिला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १९ मार्च इ.स.१६७४
(फाल्गुन वद्य अष्टमी शके १५९५ प्रमादी वार गुरुवार)

शिवराज्ञी काशीबाईसाहेब यांना देवाज्ञा!
   महाराजांच्या अष्टराज्ञींपैकी एक काशीबाघसाहेब यांचा रायगडावर मृत्यू झाला. राज्याभिषेकाच्या अगदी तोंडावर काशीबाईसाहेब यांचे निर्वाण महाराजांना चटका लावून गेला. काशीबाईसाहेब जश्या महाराजांच्या जिवनात आल्या तश्या त्या निघुन गेल्या. काशीबाईसाहेब अगदी काही अबोलपणे  कायमच्या निघून गेल्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १९ मार्च इ.स.१६७०
शिवरायांनी त्रिम्बक भास्करांना पुरंदरचे किल्लेदार नेमले.
निळोपंत मुजुमदारांनी पन्हाळा पुन्हा जिंकून स्वराज्यात परत आणला यामुळे राजारामांच्या जन्माचा पायगुण स्वराज्यासाठी चांगला लाभदायक ठरला खासा मोगली सुभेदार शेख राझीउद्दीनला निळोपंतांनी कैद केले यास्तव शिवरायांनी त्रिम्बक भास्करांना पुरंदरचे नवे किल्लेदार म्हणून नेमले

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १९ मार्च इ.स.१६८०
ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र
अलिबागच्या समुद्रात अर्धा किलोमीटरवर असलेल्या खडकावर मराठी सैन्याची चौकी होती.
ज्यांचे आरमार त्यांचा समुद्र हे छत्रपती शिवाजी महाराजांना माहीत असल्यामुळे मोक्याच्या बेटांवर त्यांनी किल्ले बांधले व जुने बळकट केले १९ मार्च १६८० रोजी महाराजांनी किल्ला बांधायला सुरुवात केली त्यांच्या निधनानंतर छत्रपती संभाजी महाराजांनी कुलाबा किल्ल्याचे बांधकाम जून १६८१ मध्ये पूर्ण केले सरखेल कान्होजी आंग्रे ह्यांच्या कारकीर्दीत कुलाबा किल्ला प्रसिध्दीस आला त्यावेळी आरमारी हालचालींचा डावपेचांचा हा किल्ला केंद्र होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜१९ मार्च इ.स.१६८३
छत्रपती संभाजी महाराजांनी कल्याण भिवंडी परिसरात मोगल  सैन्यास प्रतिकार अत्यंत तीव्र केला होता तेव्हा दिनांक १९ मार्च रोजी मोगल सेनानी रोहिला खान कोकणात कल्याण जवळच्या पौंड खोऱ्यात उतरला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १९ मार्च इ.स.१७५४
मल्हारराव होळकरांचा एकुलता एक पुत्र व अहिल्यादेवीचे पती खंडेराव होळकर यांचा मृत्यू.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १९ मार्च इ.स.१७५५
तुळाजी आंग्रे वर स्वारी करण्यापूर्वी इंग्रज व पेशवे यांचा सात कलमी करार झाला (१९ मार्च १७५५). त्यात संयुक्त आरमार इंग्रजांच्या हुकमतीखाली रहावयाचे, इंग्रजांनी समुद्रावरून मोहिम सुरू करावयाची. व जी जहाजे घेण्यात येतील ती इंग्रज व पेशवे यांनी निम्मे निम्मे वाटून घ्यावयाची. आंग्र्यांच्या किल्ल्यात जी लूट मिळेल ती पेशव्यांनी घ्यावयाची. तुळाजी विरुद्धचे पेशव्यांचे आरोप तीन होते- (१) पेशवे हे धनी व आंग्रे त्यांचे नोकर हे नाते तुळाजीने ओळखले नाही; (२) मराठी सत्तेच्या इतर महत्त्वाच्या घटकांशी ते “सौरस्ये वर्तत नसत”, (३) मराठी सत्तेच्या विरुद्ध गोवेकर फिरंग्याची त्याचप्रमाणे मुंबईकर इंग्रजांची त्यांनी मदत मागितली. तुळाजी आंग्रे याजवरील संयुक्त मोहिमेची प्रत्यक्ष सुरूवात दिनांक २६ मार्च १७५५ पासून झाली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १९ मार्च इ.स.१७७२
आनंदवल्लीहून पुण्यात परत आलेल्या रघुनाथराव पेशव्यांची दि. १९ मार्च १७७२ रोजी नजरकैदेतून सुटका करण्यात आली. त्यापूर्वी कटकारस्थाने करणार नाही, फितुरी करून राज्याचे तुकडे करणार नाही अशा अटी रघुनाथरावांना मान्य कराव्या लागल्या होत्या. परंतु, त्या बदल्यात आपले दत्तक पुत्र अमृतराव यांना सात लक्ष रु. वार्षिक उत्पन्नाची जहागीर शिवाय स्वतः रघुनाथरावांना बारा लक्ष रु. वार्षिक उत्पन्नाची जहागीर मिळावी, अशी त्यांनी माधवराव पेशव्यांकडे मागणी केली. माधवरावांनीही काकांना जास्त अपमानीत करू नये, म्हणून त्यांच्या मागण्या मान्य केल्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १९ मार्च इ.स.१७७९
गायकवाड इंग्रजास सामील झाल्यामुळे इंग्रजांची शक्ति द्विगुणीत झाली. अशा शक्तिशी गुजरातेत लांब ठिकाणी सामना देणे सोपे नव्हते. कारण ह्याच सुमारास खानदेशात गुलजारखानाचे खूळ माजले होते. तो गुलजारखान व दादासाहेबांचा कारकून केसो कृष्ण या उभयतांनी मोठी फौज जमवून दंगा सुरू केला होता. अशा कठीण प्रसंगी नाना फडणिसांची विशाल बुद्धी आणि शहाणपणा उपयोगी आला. नानानी धूर्तपणा दाखवून इंग्रजांविरुद्ध एतद्देशीय सत्ताधिशांची एकजूट घडवून आणिली. ह्या संघात चार सत्ताधिश सामील झाले. पेशवे, निजाम, हैदरअल्ली आणि नागपूरकर भोसले हे चार सत्ताधिश जरी इंग्रजांविरुद्ध एकत्र आले तरी इंग्रजांविरुद्ध सबंध हिंदुस्थानात सर्व एतद्देशिय सत्ताधिशांमध्ये एक प्रकारची उद्वेगाची भावना पसरलेली होती. कारण ह्या सर्व सत्ताधिशांबरोबर कोणत्या ना कोणत्या तरी कारणास्तव लबाडी करून त्यांच्या स्वातंत्र्यावर घाला घालण्याचे कृत्य हेस्टिंग्जने केले होते. अयोध्येचा नबाव, बनारसचा राजा, बंगालचा नबाब इत्यादि सत्ताधाऱ्यांना मांडलिक बनवून त्यांच्या संरक्षणाची हमी घेऊन त्याजकडून कित्येक लाख रुपये नजराण्यादाखल उपटले होते. त्यामुळे हे सर्व सत्ताधिश कफल्लक होऊन देशोधडीस मिळाले. ह्यांनाही इंग्रजांचे जू नको होते. नाना फडणिसास या वैफल्याचा उपयोग इंग्रजांबरोबर लढताना झाला. याचवेळी इंग्रज-फ्रेंचांचे युद्ध चालू असून फ्रेंचांचे माहे बंदर कर्नल ब्रेट वेटच्या हाताखालील ब्रिटिश नाविक काफिल्याने १९ मार्च १७७९ मध्ये काबीज केले. ह्याच बंदरातून हैदरास फ्रेंचांकडून युद्धोपयोगी सामुग्री मिळत असे ती त्यामुळे बंद झाली. त्यामुळे हैदर इंग्रजांचा कट्टर दुष्मन बनला. ही गोष्ट जेव्हा पुण्यातील कारभारी मंडळाच्या लक्षात आली तेव्हा त्यांनी हैदराशी चालू असलेले युद्ध बंद करून त्याजला इंग्रजांशी युद्ध पुकारण्यास प्रवृत्त केले. नाना व महादजींनी हैदराशी सलोखा करून त्याजबरोबर संरक्षणात्मक तह इंग्रजांविरुद्ध घडवून आणण्यासाठी वाकबगार व हुशार वकील कृष्णाजी जोशी यास त्याजकडे पाठविले. हैदराशी झालेल्या तहात असे ठरले की, तुंगभद्रेच्या दक्षिणेकडील जो मराठी मुलूख हैदराने जिंकला होता तो त्याजकडे रहावा आणि त्याने अर्काट व महमदअल्लीच्या ताब्यातील कर्नाटक हा प्रदेश उध्वस्त करावा. या अटी हैदरास कळविल्या. रास्ते आणि महादजी शिंदे हे मराठ्यांचे दोन सरदार ह्या सलूखाच्या तारणास जामीन राहिले. हा तह होताच पेशवे व म्हैसुरकर यांजमध्ये आज अनेक वर्षे जो युद्ध प्रसंग सुरू होता तो बंद पडून दिनांक २० फेब्रुवारी १७८० रोजी तह होऊन एकोपा झाला.  या एकोप्याच्या पायावर एक प्रचंड कारस्थान उभारले गेले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments