ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶️📜 २ मार्च इ.स.१६६०
(चैत्र प्रतिपदा, शके १५८२, संवत्सर, शार्वरी, वार शुक्रवार)
महाराज पन्हाळगडास आश्रयास!
अफजलखानाच्या (३२, दातांच्या राक्षसी बोकडाच्या वधानंतर) महाराजांनी अफजलखान मुलखात त्राही माजविली. आदिलशहाकडून महाराजांच्यावर पुन्हा एकदा सिद्धी जौहर हा कसलेला पठाण, आक्रमणासाठी निघाला. मात्र, त्याचा धोकाओळखून महाराजांनी सिद्धी जौहर जास्त पुढे सरकता कामा नये म्हणून पन्हाळगडावर महाराज आश्रयास आले. जेणेकरून, जौहरचे आगमण थेट स्वराज्यात न येता कोल्हापुरच्या पन्हाळगडापर्यंत सीमित राहिल.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 २ मार्च इ.स.१६८७
औरंगजेबपुत्र शहाआलम याने गोवळकोंड्याचा बादशाहा यास अभय देण्याचे वचन दिले होते परंतु औरंगजेबाचा मनसुबा गोवळकोंडा हस्तगत करण्याचा होता पण शहाआलम दिलेल्या वाचनाला जागला होता. तेव्हा औरंगजेबाने युक्तीने शहाआलम व त्याचा पुत्र अज्जीजुद्दिन यास आपल्या भेटीस बोलावले व त्यांना कैद केले तो आजचा दिवस.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 २ मार्च इ.स.१७००
छत्रपती राजाराम महाराजांचा मृत्यू...
महाराणी ताराबाईंनी राज्य कारभार हाती घेतला...
औरंग्याने छत्रपती शंभुराजांची अमानुष हत्या केली...
आता मराठे घाबरतील, शक्तिहीन होतील आणि महाराष्ट्र आपल्याला सहज हस्तगत करता येईल असं त्याला वाटत होतं... पण घडलं भलतचं.... छत्रपती शंभुराजांचा मृत्यु मराठ्यांच्या अतिशय जिव्हारी लागला... छत्रपती राजाराम महाराजांच्या नेतृत्वाखाली मराठे औरंगजेबाला टक्कर देवू लागले...दक्षिनेतील जिंजीच्या किल्ल्यावर राहून छत्रपती राजाराम महाराज स्वराज्याचा कारभार पाहू लागले...
या काळात छत्रपती राजारामराजांना संताजी घोरपडे, धनाजी जाधव आशा रणधुरंधर सेनापति तसेच प्रल्हाद निराजी, रामचंद्रपंत अशा कारभारयांची साथ लाभली...मुघलांशी निर्णायक युद्ध जिंकने अशक्य होते... म्हणून छत्रपती राजारामांनी मुघलांनी मिळवलेला जो भाग मराठे जिंकतील तो भाग त्यांची जहागीर बनवण्याचे स्वातंत्र्य आणि अधिकार दिले... वेग-वेगळे मराठा सरदार जागो-जागी मुघल सैन्यावर आक्रमण करू लागले... संधी मिळताच त्यांचा पराभव करून रसद लुटू लागले... आपली पिछेहाट होताना दिसताच पसर होवू लागले..
मुघलंनी जिंजीला वेढा दिला...पण छत्रपती राजाराम पसार होवून विशालगडावर गेले... तेथून सातारा, कर्नाटक पुन्हा महाराष्ट्र अशा चकमकी होवू लागल्या... महाराष्ट्रात मुघलांना धुळ चारायची हेच एकमेव लक्ष्य मराठ्यांसमोर होते. त्यासाठी कोणताही मार्ग अवलंबायाला ते तयार होते... त्यांना सर्वसामान्य जनतेचाही पाठिंबा होताच. शेतकरी दिवसा शेती करून रात्री सैनिक बनत होता... परन्तु, दुर्दैवाने महाराष्ट्राची पाठ सोडली नाही... २ मार्च रोजी सिंहगडावर मराठ्यांचा तिसरे छत्रपती राजाराम राजांचा सिंहगडावर मरण पावला... निधन झाले तेंव्हा छत्रपती राजाराम महाराज ३० वर्षाचे होते.. त्यांच्या काळखंडातच सिंधुदुर्गावर छत्रपती शिवरायांचे मंदिर उभारण्यात आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 २ मार्च इ.स.१७९५
खरडा येथे मराठा सेना आणि निजाम यांच्यात महाभयंकर युद्ध होण्यास झाले यावेळी नागपूर, बडोदा, इंदोर येथील रघुजी भोसले दुसरे, गायकवाड,तुकोजी होळकर आपापल्या सैन्यासह उपस्थित झाले होते
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 २ मार्च इ.स.१८१८
इंग्रजांनी सिंहगडावर तोफा डागायला सुरवात केली, दख्खन ताब्यात आल्यावर इंग्रजांनी सह्याद्रीतल्या सर्व किल्ल्यांवर तोडफोड केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment