ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 २२ मार्च इ.स.१६६०
छत्रपती शिवराय पन्हाळा वेढ्यात असताना याच वेळी केदारजी खोपडे देसाई व ईतर देशमुखांना आदीलशहाने आदीलशाहीस मदत करन्याचे पत्र पाठवले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

📜 २२ मार्च इ.स.१६८०
छत्रपती शिवराय ज्वराच्या व्यथेने आजारी पडले
महाराज दक्षिण दिग्विजय प्राप्त करून रायगडी परत आले होते. रामराजांचा व्रतबंध व विवाह पार पडला होता. सूर्यग्रहणाचे पर्व आटोपले होते. दोनच दिवसांनी महाराज रायगडी ज्वराच्या(तापेच्या) व्यथेने आजारी पडले. आजार बळावत चालला होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩

📜 २२ मार्च इ.स.१६८२
तब्बल पाच वर्षे मराठ्यांची झुंज
औरंगजेब बादशहा औरंगाबदेला पोचला आणि वेळ न दवडता लढाईचे मनसूबे आखु लागला. त्याने लढाईची सर्व सूत्रे आपल्या हाती घेतली होती. बादशाहला वाटले होते की अगदी थोड्याच अवधित मोघली फ़ौज मराठ्यांचा हा मुलुख काबिज करील आणि म्हणुनच त्याने आधी मराठ्यांचे किल्ले घेण्याचे ठरविले.
त्याने शहाबुद्दीन फिरोजजंग याला रामसेज किल्ला जिंकण्यासाठी रवाना केले. शहाबुद्दीखान सोबत शुभकर्ण बुंदेला - रतनसिंह हे पितापुत्र, दलपत बुंदेला हे कसलेले सरदार होते. तर रामसेजच्या किल्लेदाराची शिबंदी होती केवळ ५०० मराठ्यांची !
संख्येने कमी असले तरी या मुठभर मर्द मावळ्यांनी शहबुद्दीखान आणि त्याच्या सगळ्या सरदारांना सळो कि पळो करून सोडले. किल्ल्याला सुरुंग लावणे. मोर्चे बंडाने असे अनेक उपाय करूनही रामसेज दाद देईना तेव्हा खानाने लाकडी धाम्धामे (बुरुज) उभे करून त्यावरून किल्ल्यावर गोळ्यांचा मारा सुरु केला. पण मराठ्यांनी शहाबुद्दीन खानाचे सगळे मनसुबे उधळून लावले.
किल्ल्यावरचे मराठे शरण येत नाहीत हे कळताच औरंजेबाने कासिमखानाला शहाबुद्दीन खानाच्या दिमतीला पाठवले.
किल्ल्यावरची अल्प शिबंदी एवढ्या मोठ्या फौजेच्या वेढ्याला किती काळ टक्कर देणार? शहबुद्दीनखानाचा वेध मोडून काढण्यासाठी शंभूराजांनी मानाजी मोरे व रुपाजी भोसले यांना पाठवले. शहाबुद्दीन खानाच्या तोफा गडाच्या बुरुजावरील दरवाजावर एकसारख्या आग ओकू लागल्या. भिंत कोसळली आणि अनेक सैनिक जखमी झाले. वेढा उठवण्यासाठी रुपाजी भोसले रामसेजच्या पायथ्याशी येऊन मोगलांना भिडले. घनघोर युद्धाला तोंड फुटले. करणसिंह या मोगली सरदारावर त्वेषाने तुटून पडलेले रुपाजी भोसले तलवार गाजवताना स्वतः जखमी झाले
इरेला पेटलेला खान आता निर्णायक विजय मिळवण्यासाठी किल्ल्याच्या दरवाजाला भिडला. त्याने मोर्चे लावले आणि लाकडी धमधमा (बुरुज) उभा करून तो किल्ल्यातील मराठ्यांवर एकसारखा गोळ्यांचा मारा करू लागला. इतक्यात वेढा फोडण्यासाठी मराठ्यांची ताज्या दमाची नवी कुमुक आली आणि त्यांनी मोगलांवर एकच हल्ला केला. किल्ल्यात येऊन घुसलेल्या चारही सैनिकांना मराठ्यांनी कापून काढले. या अनपेक्षित हल्ल्यामुळे खानची प्रचंड मोठी हानी झाली आणि गुडघे टेकून त्याने माघार घेतली.
संतापलेल्या औरंजेबाने शहाबुद्दीन खानाला माघारी बोलवून त्याजागी बहादुर खानाची नेमणूक केली. १५,००० फौजेनिशी बहादुरखानाने रामसेजला विळखा घातला होता. मराठे आणि मोगल एकमेकांचे हल्ले चुकवून आपल्या सैनिकांना रसद पुरवत होते. शरीफखान नावाचा मोगली अधिकारी बहादुरखानाला रसद पुरवण्यासाठी निघाला होता. ७००० मराठे एकाचवेळी त्यावर तुटून पडले आणि त्यांनी जाहीरखान फैजुल्लाखान अशा अनेक सरदारांना कापून काढले. मोगलांची जबरदस्त पिछेहाट झाली.
मराठ्यांच्या शौर्याला कोणतीही माया लागू होत नाही हे पाहून बहादूर खानाने एक योजना आखली. एका बाजूने लढाईची तयारी चालू आहे असे दाखवायचे. किल्ल्याच्या या बाजूला दारुगोळा, तोफखाना आणि मोगल सैन्याची हालचाल दाखवून मराठ्यांच्या डोळ्यात धूळ फेकायची आणि दुसऱ्या बाजूने कोणतीही चाहूल लागू न देता निवडक सैन्याने गडावर चढायचे असा बेत आखला. सावध असलेल्या रामसेजच्या किल्लेदाराने बहादुरखानाचा हा डाव अचूक ओळखला.
ज्या बाजूने मोगल किल्ल्यावर हल्ला चढवायचे भासवत होते तिथे मराठा किल्लेदाराने नगारे, नौबती, कर्णे अशा रणवाद्यांचा कल्लोळ सुरु केला. किल्ल्यावरून खाली दगडांचा मारा सुरु झाला. तेलाने पेटवून माखलेले कपडे पेटवून खाली फेकण्यात येऊ लागले आणि दुसरीकडे बहादूर खानाचे सैन्य ज्या बाजूने वर चढणार त्या ठिकाणी सशस्त्र मावले दबा धरून बसले.                                  बहादूर खानाचे बेसावध मोगली सैनिक गडावर पाय ठेवतात न ठेवतात तोच ते मराठ्यांच्या तलवारीचे बळी ठरले. मोगली सैनिकांच्या किंकाळ्या आसमंतात दुमदुमल्या आणि वरून कोसळणाऱ्या सैनिकांमुळे खालून वर चढणारे हि थेट खाली आपटले. किल्लेदाराने बहादूर खानची चांगलीच फजिती केली.
बहादूर खानाने वेढा उठवण्याची तयारी सुरु केली, बादशहाच्या हुकुमानुसार खाली मान घालून तो परत फिरला. किल्ल्यावर मोर्चे बांधण्यासाठी व चढाई करण्यासाठी त्याने प्रचंड लाकडे साठवली होती. ती सगळी लाकडे त्याने परत जाताना पेटवली. पण बादशहाची हौस अजून फिटली नव्हती म्हणूनच त्याने कासीमखान किरमाणी या सरदाराची या वेढ्यासाठी नियुक्ती केली. पण तरीही रामसेज झुकला नाही. मराठ्यांच्या तळपत्या तलवारीचे चटके कासीम खानाला सहन झाले नाहीत. सगळे वार झेलून आणि सगळे हल्ले परतवून रामसेजच्या बालेकिल्ल्यावर भगवा जरीपटका अजूनही डौलाने फडकतच होता. रामसेजचा तो किल्लेदार म्हणजे मूर्तिमंत शौर्याचा धगधगता आविष्कार, त्या नररत्नाच नाव दुर्दैवाने आजही इतिहासालाच्या पानात सापडत नाही हे दुर्दैव. त्याच्या विलक्षण धैर्याचा आणि अतुलनीय शौर्याचा मनाचा पोशाख, रत्नजडित कडे आणि रोख रकमेचा पुरस्कार देवून म्हणून त्याची नियुक्ती दुसऱ्या एका प्रमुख किल्ल्यावर केली आणि रामसेज वर दुसरा किल्लेदार नेमण्यात आला.

किल्लेदाराच्या आणि मराठ्यांच्या हातून घडलेल्या या अद्वितीय पराक्रमाची किंचित सुद्धा जाणीव त्यांना स्वतःला नव्हती. राजपूत, शिख, निजामशाही, आदिलशाही, कुतुबशाही आणि अश्या अनेक शत्रूंच्या राजधान्या काही दिवसात खालसा करणाऱ्या या मोघली फौजेला अर्ध्या दशकाहुन अधिक काळ नुसत्या रामसेजने झुंजवले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २२ मार्च इ.स.१६९८
जिंजीहून राजाराम महाराज २ जानेवारी १६९८ रोजी निसटले व वेलोरच्या किल्ल्यात मुक्कामास आले. जिंजीच्या किल्ल्यांतील सर्व व्यवस्था लावण्यासाठी झुल्फिकार खानाने दुसऱ्या दिवशी किल्ल्यात मुक्काम केला. इतर अमीर उमराव आपआपल्या निवासस्थानी परतले. त्यापैकी राजाराम महाराजांची बायकां-मुले व युद्ध कैदी घेऊन झुल्फिकार खान हा किल्ल्याबाहेर आला. राजाराम महाराजांच्या बायकां-मुलांची मात्र त्याने काळजी घेतली. त्यांना पालख्या देऊन वेलोर येथे पोचविण्यात आले. त्यात ताराबाई, राजसबाई, शिवाजीराजे व सोयराबाई ही मंडळी होती. परतीच्या प्रवासांत त्यांचे संरक्षण करण्यासाठी महाराष्ट्रांतून पाच हजारांची फौज आल्यावर राजाराम महाराज आणि कबिला यांनी फेब्रुवारी १६९८ मध्ये वेलोर सोडले. राजाराम महाराजांच्या मदतीस येत असलेल्या सैन्यास रोखण्याकरिता व राजाराम महाराज निसटले म्हणून त्यांचा पाठलाग करण्याचे नाटक झुल्फिकार खानाने केले. त्याने राजाराम महाराजांचा पाठलाग करण्यासाठी १६९८ च्या फेब्रुवारी २६ तारखेस जिंजीहून कूच केले. खानाने गुरुमकोंड्यापर्यंत त्यांचा पाठलाग करण्याचे नाटक केले. राजाराम महाराजांनी मंडळीसह कोपल-भुदरमार्गे प्रवास केला. मार्च मध्ये भुदरगडास आले. तिथून २२ मार्च १६९८ रोजी विशालगडला आले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २२ मार्च इ.स.१७३९
नादिरशहाने दिल्ली ताब्यात घेतली

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २२ मार्च इ.स.१७५५
इंग्रज व पेशवे तह.
यावरुन इंग्रज मराठा नौदलावर म्हणजेच
तुळाजी आंग्रेवर ( शिवरायांच्या किल्ले सुवर्णदुर्ग ) वर
चाल करण्यासाठी मुंबईहून गेले.
तुळाजी जुमानत नाही म्हणुन स्वतः पेशवेच
आपल्या आरमाराच्या जिवावर उठले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments