ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष






⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

▶️📜 ३ मार्च इ.स.१६६०
(चैत्र शुद्ध द्वितीया, शके १५८२, संवत्सर शार्वरी, वार शनिवार)

स्वराज्यावर दुहेरी संकट!
      इ.स.१६६०, च्या सुमारास दिल्लीहून मोगलांचा मातब्बर सरदार औरंगजेबाचा मामा शाहिस्तेखान सुद्धा स्वराज्याचा घास घेण्यासाठी दिल्लीहून निघाला व या दिवशी पुरंदरच्या पायथ्याशी सोनवडी गावात तळ ठोकला. स्वराज्य आता दुहेरी संकटात सापडले होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 ३ मार्च इ.स.१६६०
सिद्दी जौहरने किल्ले पन्हाळ्याला घातलेल्या वेढ्याच्या दुसऱ्याच दिवशी आदिलशहाने छत्रपती शिवरायांचे सावत्र बंधू व्यंकोजीराजांना छत्रपती शिवरायांना मदत न करण्यासाठी धमकीचे पत्र पाठवले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 ३ मार्च इ.स.१६६५
(फाल्गुन शुद्ध द्वादशी, शके १५८६, क्रोधी संवत्सर, वार शुक्रवार)

            मुघल सरदार मिर्झाराजा जयसिंग १ लाख सैन्य घेऊन पुण्याला दाखल झाला. मागील ३ वर्षात छत्रपती शिवरायांनी मुघलांना सळो की पळो करून सोडले होते, शाहीस्तेखानाची बोटे कापली, सुरत लुटली आणि त्यावर औरंगजेब बादशहाला पत्र पाठवून आपले उद्दीष्ट स्पष्ट कळविले होते.
त्यामुळे औरंगजेबाला त्याचा सर्वात जिगरीचा सरदार दख्खनमध्ये पाठवणे भाग पडले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 ३ मार्च इ.स.१६८९
(फाल्गुन वद्य ७, सप्तमी, शके १६१०, विभव संवत्सर, वार रविवार)

छत्रपती संभाजी महाराज आणि कवी कलश यांना मारण्याचा निर्णय पक्का!
           औरंगजेबाने छत्रपती संभाजी महाराजांना ठार मारण्याचा निर्णय पक्का केला, कारण हे औरंगजेबाच्या राज्यारोहणाचे ३२, बत्तीसवे वर्षे होते. आजच औरंगजेब बहादुरगडावरून कोरेगाव मध्ये आला व येथे त्याने छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना मारण्याची आज्ञा दिली. योगायोग हा की ३ मार्च इ.स.१६८९ रोजी बरोबर ३२ व्या वर्षी छत्रपती संभाजी महाराजांच्या हत्येचा निर्णय पक्का झाला. औरंगजेबाने भिमा कोरेगाव जवळ छावणी करून छत्रपती संभाजी महाराज व कवी कलश यांना "फतवा" काढला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 ३ मार्च इ.स.१७००
छत्रपती राजाराम महाराज जिंजी च्या वेढ्यातून सुटून आल्यानंतर राजाराम महाराजांनी मोंगलांना अक्षरशः सळो की पळो करून सोडले. मराठ्यांच्या गनिमी काव्याने मोंगल अगदी हैराण होऊन गेले होते. संताजी घोरपडे
आणि धनाजी जाधवरावांच्या मावळी तुकड्या मोंगलांची अक्षरशः लांडगेतोड करत होत्या. महाराष्ट्रात आल्यानंतर राजाराम महाराजांनी कोकणात उतरून आपल्या सागरी किल्ल्यांची पाहणी केली. कोकण किनारा अजूनही अजिंक्यच होता. राजाराम महाराज सिंधुदुर्गावर आले. महाराष्ट्राची ही 'शिवलंका' अभेद्य होती. महाराज आग्र्यात अडकले असतानाच हा दागिना घडवलेला होता. राजाराम महाराजांनी आपल्या पुण्यशील पित्याच्या, श्री शिवछत्रपतींच्या स्मरणार्थ सिंधुदुर्गावरच 'शिवराजेश्वर' मंदिराची निर्मिती केली. यानंतर दुर्दैवाने केवळ दोनच वर्षात, गेली काही वर्षे होणाऱ्या सततच्या धावपळीमुळे आणि दगदगीमुळे दि. ३ मार्च १७०० या दिवशी या तरुण राजाचा, वयाच्या केवळ २९ व्या वर्षी सिंहगडावर मृत्यू झाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 ३ मार्च इ.स.१७१९
दिल्लीच्या लालकिल्ल्यात शाही दरबार भरला. वजीर हसनअली सय्यदाने लहानग्या रफिउदौरजतला तख्तावर बसवले व कामकाजाला सुरुवात झाली. आधीच ठरल्याप्रमाणे सय्यद बंधूंनी शाहूमहाराजांबरोबर झालेल्या तहनाम्यावर नव्या रफिउदौरजत बादशहाची संमती सनद उमटवली होती. दरबारात चौथाईच्या सनदा जाहीरपणे शाहूमहाराजांचे विश्वासू व मराठी राज्याचे पेशवे म्हणून बाळाजी विश्वनाथांच्या हाती मोठ्या सन्मानपूर्वक देण्यात आल्या. बाळाजीपंतांनी लवून बादशहाला मुजरा केला व सनदापत्रे ताब्यात घेतली. मुजरा करताना बाळाजीपंतांच्या मनात काय आले असेल? 'हे सिंहासन हिंदूंचे आहे. इंद्रप्रस्थच्या या भूमीत महाराजा युधिष्ठिराने राज्य केले आहे. आज त्याच सिंहासनावर हे परके तुराणी बसलेत. हा मुजरा या बादशहाला नसून अजातशत्रू युधिष्ठिराला आहे, भगवान श्रीकृष्णाला आहे, प्रभू श्रीरामाला आहे. थोरल्या शिवछत्रपतींनी हे इंद्रप्रस्थचे सिंहासन आपल्या स्वराज्यात आणण्याचे स्वप्न बघितले. लवकरच त्यांचे ते स्वप्न आपण नक्कीच पूर्ण करू. मला जमले नाही तर माझा मुलगा, माझा नातू ते पूर्ण करेल.' इतर लहान-मोठ्या कारभारानंतर दरबार संपला. नंतर दि. १५ मार्च रोजी परत दरबार भरवून सरदेशमुखी व स्वराज्याच्या अधिकृत सनदा याचप्रमाणे पेशव्यांच्या हाती सुपूर्द करण्यात आल्या. यानंतर लगेचच पाच दिवसांनी दि. २० मार्च १७१९ रोजी ५० हजार मराठी फौज राजमाता येसूबाईसाहेब व इतरांना घेऊन साताऱ्याच्या दिशेने निघाली. वाटेत नरवरपाशी आल्यानंतर बाळाजीपंत आपले थोरले पुत्र व अंबाजीपंतांना सोबत घेऊन काशीविश्वेश्वराच्या दर्शनाला गेले. इतर फौज नरवरहून दक्षिणेच्या मार्गाला लागली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 ३ मार्च इ.स.१७८९
गुलाम कादरला पकडून आणण्याच्या कामगिरीवर  राणेखान फौजेसह गेला होता. त्यास घाबरून त्याने मिरज किल्ल्याचा आश्रय घेतला. त्याने तिथे राहून मराठ्यांशी दोन महिने झुंज दिली. दिनांक १७ डिसेंबर १७८८ रोजी किल्ल्याचे बाहेर येऊन मराठ्यांशी लढाई केली. मराठ्यांनी कापाकापी सुरू केल्यावर गुलाम कादरने पळ काढला. त्याचा पाठलाग करून त्यास दिनांक १९ डिसेंबर १७८८ रोजी पकडले व पाटील बावांकडे रवाना केले. महादजीनी त्यास कैदेत ठेवून दिनांक ३ मार्च १७८९ रोजी ठार मारिले व बादशहा शहा अलम यास पुन्हा तक्तावर बसविले. या थोर कामगिरीबद्दल शहा अलम बादशहाने खूष होऊन महादजी शिंदे यांना अलिजा बहाद्दर हा किताब दिला. मथुरा, वृन्दावन ही स्थळे मराठ्यांस पुन्हा मिळाली. महादजींच्या इच्छेप्रमाणे बादशहाने आपल्या मुलुखात गोवधबंदीचे फर्मान काढिले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 ३ मार्च इ.स.१८१८
सिंहगड इंग्रजांच्या ताब्यात
गडावर २४ फेब्रुवारी ते २८ फेब्रुवारी १८१८ असा ५ दिवस प्रिट्झलरने तुफान तोफगोळ्यांचा मारा केला. उपलब्ध कागदपत्रांनुसार, ह्या ५ दिवसात हॉवित्झर आणि मोर्टर्समधून १४१७ आणि १८ पौंडी तोफांमधून सुमारे २३०० गोळे गडावर डागले  गेले. ६ पौंडी अथवा १२ पौंडी गोळ्यांच्या गणतीचा उल्लेख इंग्रजी कागदपत्रात नाहीये पण जर त्या तोफा वर चढवल्या गेल्या होत्या म्हणजे त्या वापरल्या नक्कीच गेल्या होत्या. गडावरूनही इंग्रज र्न मारा होत होताच.
१ मार्च १८१८ ला गडावरून तहाचे पांढरे निशाण फडकवण्यात आले. तोफांचा मारा दोन्ही बाजूने थांबवण्यात आला. गडाचा ताबा घेण्याची बोलणी करायला प्रिट्झलर काही सैन्य घेऊन गेला होता. तहाच्या अटी किल्लेदाराकडे देऊन इंग्रज खाली उतरले. त्यानंतर ३ तासांत गडावरून काही उत्तर न आल्याने इंग्रजांनी तोफांचा मारा पुन्हा सुरु केला गेला. शेवटी ३ मार्चला इंग्रज सैन्य गडावर घुसले आणि त्यांनी गडाचा ताबा घेतला. गडावर ५० लाख रुपयांची लूट आणि एक गणेशाची सुवर्णमूर्ती मिळाली अशी इंग्रजी कागदपत्रात नोंद आहे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव "जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments