ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 ३० मार्च इ.स.१६६३
(चैत्र शुद्ध प्रतिपदा शके १५८५ संवत्सर शोभन वार सोमवार)
सरसेनापती नेतोजी पालकर जखमी!
मोगली मुलखात लुटालूट करण्यासाठी सरसेनापती नेतोजी पालकर गेले होते. परंतु दैव प्रतिकूल होते. त्यामुळे मोगली मुलखातच मुघल फौजेने त्यांना गाठले व चकमक झाली. सरसेनापती नेतोजी पालकर यांनी पराक्रमाची शर्थ केली. परंतु बळ कमी पडल्यामुळे मराठी सैन्याला माघार घ्यावी लागली व त्यातच सरसेनापती नेताजी पालकर यांच्या हाताला व पायाला जखमा होऊन ते जायबंदी झाले. मात्र मराठा फौजेचा पाठलाग करीत मुघल सैन्य विजापुर मुलखात दाखल झाले. यावेळी रस्तम ए जमान याने मुघलांची भेट घेऊन त्यांचे मन वळविले. अपरिचित मुलूख असुन अनवट वाटा व जंगल असल्यामुळे सरसेनापती नेताजी पालकर यांचा पाठलाग करु नये. असे सांगून मुघल सैन्य माघारी पाठविले. रुस्तम-ए-जमान व महाराजांचा अंतस्थ स्नेह अशा रीतीने उपयोगास आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३० मार्च इ.स.१६६५
मिर्झाराजे जयसिंग व दिलेरखान यांनी ठरविल्याप्रमाणे ते पुरंदर किल्ल्यास वेढा घालण्यासाठी पुण्याहून दिनांक १५ मार्च १६६५ रोजी निघाले. बरोबर अफाट फौज, तोफखाना व सामान, सरंजाम होता. ते राजेवाडीच्या जवळपास दिनांक ३० मार्चला पोचले. तेथून जयसिंगाने दिलेरखानास सासवडला रवाना केले. सासवड मुक्कामी त्याजवर मराठी फौजेचा अचानक छापा पडला. गडबड उडाली पण खान आपली फौज घेऊन दौडत सुटला पुरंदरा कडे निघाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३० मार्च इ.स.१६८४
(चैत्र वद्य दशमी, शके १६०६, रक्ताक्ष संवत्सर, वार रविवार)
औरंगजेबाचे विजापुरकरांना फर्मान!
औरंगजेबाने विजापुरकरांना एक फर्मान धाडले. त्यात विजापुरकरांना खडसावून सांगितले की, छत्रपती संभाजी महाराजांची तुमची मित्रता व सख्य करण्याचे सोडून आपण सर्वांनी एकदील होऊन छत्रपती संभाजी महाराजांचा फडशा पाडला पाहीजे. या आशयाचे हे फर्मान म्हणजे विजापुरकरांना एक प्रकारे तंबी होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३० मार्च इ.स.१७४१
सातारा व कोल्हापूरकर छत्रपति या एका झाडाच्या दोन फांद्या. ह्या दोन गाद्या एक कराव्या असा विचार बाळाजी बाजीरावांचा होता. त्यास चिमाजीअप्पांची संमति होती. कोल्हापूरकर संभाजी राजे शाहू महाराजांच्या भेटीस साताऱ्यास आले आणि तारीख २ जून १७४० ते ३० मार्च १७४१ पर्यंत साताऱ्यास राहिले. ह्या मुदतीत बाळाजी बाजीरावांनी कोल्हापूरच्या संभाजी राजांशी वाटाघाटी करून शाहू महाराजांच्या पश्चात राज्यव्यवस्था कशी करावी ह्या बद्दल एक गुप्त करार संभाजी राजांशी केला. हा करार शाहू महाराजांच्या कारकीर्दीत बाहेर न फुटण्याची खबरदारी दोन्ही पक्षांनी घेतली. करार नानासाहेब व चिमाजी अप्पा ह्या उभयतांनी संभाजी राजे यास लिहून दिला. त्यातील मुख्य बाब अशी “सातारचे राज्य स्वामींचे आणि एकछत्री शिक्का महाराजांचा (संभाजी राजांचा) चालावा. शाहू महाराजांचा जीवात्मा आहे तो बाह्यात्कारी आम्ही त्यांचे सेवक परंतु अंतर्यामी स्वामींचे, शाहू महाराज ह्यांनी कैलासवास केल्यावर दोन्ही राज्ये स्वामींची व आम्ही सेवक स्वामींचे, स्वामींच्या आज्ञेप्रमाणे वर्तणूक करू”. शाहू महाराज निवर्तल्यावर अशी परिस्थिती निर्माण झाली की हा करार मागे पडला आणि दोन्ही राज्यांचा समेट घडवून आणण्याचे काम तसेच राहून दोघांच्या भांडणामुळे राष्ट्राची हानी व्हावयाचे टळले नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜३० मार्च इ.स.१७५७
प्लासीच्या लढाईत इंग्रजांनी बंगालच्या नबाबाचा पराभव केला. या विजयामुळे ईस्ट इंडिया कंपनी सरकारचा पाया घातला गेला आणी ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीने कोलकाता काबीज केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment