ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜२१ मार्च इ.स.१६५७
चैत्र वद्य द्वितीया, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, वार शनिवार, म्हणजेच आजच्या दिवशी, महाराजांनी न्यायदान केले!
गुंजण मावळ्याच्या देशमुखीबद्दल शिलीमकरांमध्ये कलह उत्पन्न झाला होता. शिलीमकरांची भाऊबंदकी फार जुनी होती. चंद्ररावाने मात्र भाऊबंदकीचा फायदा घेत शिलीमकरांना महाराजांच्या पक्षातून फोडण्याचाही प्रयत्न केला. मात्र शंभुमहादेवाची व आईसाहेबांची आण घेऊन महाराजांना सत्यता पटवून द्यावी लागली. इतके हे महत्वपूर्ण प्रकरण होते.
त्यामुळेच सर्व अधिकारी पुण्यास जमले असताना महाराजांनी शिलीमकर वतनाचा तंटा लालमहालात बसून आई जिजाऊंच्या समवेत सर्व संमतीने सोडविला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜२१ मार्च इ.स.१६५७
छत्रपती शिवरायांनी स्वराज्याचे सरनोबत म्हणून 'नूरखान बेग' यांना सन्मान व सैन्याचे नेतृत्व करण्याचे फर्मान लाल महाल -पुणे येथून दिले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜२१ मार्च इ.स.१६६७
किल्ले सिंधुदुर्ग स्वराज्यात सामील..!
किल्ले सिंधुदुर्ग किल्ल्याचे बांधकाम पूर्ण करून. छत्रपती शिवरायांनी गडदेवतांची पूजा केली समुद्राला नारळ अर्पण केला. सिद्दी आणि हबशांच्या जोरावर त्यांना उत्तर म्हणून शिवरायांनी भर समुद्रात शिवलंका उभी केली.
सिंधुदुर्ग हा महाराष्ट्राच्या सिंधुदुर्ग जिल्ह्यातील अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराजांनी बांधलेला जलदुर्ग
आहे. नोव्हेंबर २५, इ.स. १६६४ रोजी किल्ल्याच्या बांधकामाला सुरुवात झाली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜२१ मार्च इ.स.१६८०
(काही ठिकाणी १९ मार्च अशी तारीख आहे)
छत्रपती शिवरायांनी कुलाबा उर्फ़ अलिबाग किल्ल्याची बांधणी सुरु केली. तीस ते पस्तीस किलोमीटर लांबीची अलिबाग तालुक्यातील किनारपट्टी ‘अष्टागर’ या नावाने ओळखली जाते.
या अष्टागराचा राजा म्हणजे ‘किल्ले कुलाबा’, अलिबागचा पाणकोट. छत्रपती शिवरायांनी जे जुने किल्ले दुरुस्त करून मजबूत केले त्यापैकी एक ‘किल्ले कुलाबा!’ प्रथम शिवशाहीनंतर पेशवाई आणि सरतेशेवटी इंग्रज असे कालखंड ‘किल्ले कुलाब्याने’ पाहिले. इंग्रज ज्यांना ‘समुद्रावरील शिवाजी’ असे संबोधत त्या कान्होजी आंग्रे यांच्या पहिल्या सागरी राजधानीचा मान किल्ले कुलाब्याला मिळाला.
ह्यानंतर अवघ्या १४ दिवसात ३ एप्रिल १६८० रोजी राजांचे महानिर्वाण झाले
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇
🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments
Post a Comment