ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

▶️📜 ४ मार्च इ.स.१६७७
(फाल्गुन शुद्ध दशमी, शके १५९८, संवत्सर नल, वार रविवार)

महाराजांच्या भेटीला आकण्णापंत आणि मादण्णापंत!
छत्रपती शिवाजी महाराज कुतुबशहाच्या भेटीस जाताना कुठल्याही प्रकारची लुट न करता शांतपणे येत असल्याचे पाहून कुतुबशहा निष्चितपणे संतोष पावला. आपले पाहुणे म्हणून त्यांच्या अर्थात महाराजांच्या सत्कारार्थ सामोरा येण्याची तयारी करू लागला. कुतुबशहा सामोरा येतोय, लागलीच महाराजांनी निरोप धाडला की, "तुम्ही न येणे, आपण वडील भाऊ मी धाकटा भाऊ आपण पुढे न येणे". अर्थात या निरोपाने बादशहा अजून संतोष पावला. त्याने आकण्णापंत आणि मादण्णापंत यांना हुकूम केला की, "खासे आपण जाऊन महाराजांचे स्वागत करावे". त्याबरहुकूम आकण्णापंत व मादण्णापंत यांनी सन्मानाने महाराजांना सन्मानपुर्वक शहरात नेले. या पहिल्याच भेटीत महाराजांनी कुतुबशहाचे मन जिंकून एक नवा मित्र जोडला!

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 ४ मार्च इ.स.१६८०
राजपुतांचे बंड मोडून काढण्यासाठी औरंगजेबाने आपली तीन मुलं शहाआलम, आझमशाह आणि अकबर ह्यांना पाठविले.
४ मार्च १६८० रोजी अकबराला चितोडची बाजू सांभाळण्यासाठी पाठविण्यात आले. प्रत्येक ठिकाणी अकबराचा सारखा पराभवाचं होत होता. अकबराने राजपुतांविरोधात लढण्यात पाच महिने असेच फुकट घालविले. राजपुतांपुढे आता काही आपला निभाव लागत नाही असे पाहून अकबराने आपल्या बापास औरंगजेबास हे युद्ध बंद करण्याची विनंती केली. ह्या विनंतीने औरंगजेब भयंकर चिडला. आणि त्याने रागाने अकबराची चांगलीच कानउघडणी केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 ४ मार्च इ.स.१७०६
छत्रपती शिवरायांचा संदेश, त्यांनी दिलेली स्पूर्ति, त्यानी तयार केलेली ही माणसं. एक मोठ नेता नाही, पण सामुदायीक नेतृत्व त्यांनी उभं केलं. त्याचाच परिणाम म्हणून मराठ्यांची घोडदौड जी अशी चालली की, ४ मार्च १७०६, रोजी धनाजी जाधवांने गुजराथचे द्वार मराठ्यांना मोकळं करून दिलं.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 ४ मार्च इ.स.१८१८
इंग्रजांनी विसापूर जिंकला
जनरल प्रॉथर लोहगड जिंकण्यासाठी आला. त्याने प्रथम विसापूर जिंकला. ज्या दिवशी विसापूर इंग्रजांनी घेतला त्याच्या दुसऱ्याच दिवशी मराठे लोहगड सोडून गेले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments