ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

आग्र्याहून सुटल्यानंतर छत्रपती शिवरायांनी उठवलेल्या वादळी झंझावाताला रोखण्यासाठी औरंगजेबाने मुघल सरदार दाऊदखानला दख्खनमध्ये पाठवले. आजच्या दिवशी दाऊदखान फौजफाटा घेऊन नगरला पोहोचला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २८ मार्च इ.स.१६८३
(चैत्र वद्य द्वितीया, शके १६०३, संवत्सर सिद्धार्थी, वार सोमवार)

छत्रपती संभाजी महाराजांचे सरदार नारोजीराव यांनी धारूर किल्ल्यावर चाल केली.
छत्रपती संभाजी महाराजांच्या हुकुमानुसार मराठे व-हाडपर्यंत मुलुखगिरी करत होते. मराठ्यांच्या मुलुखगिरीत त्यांची अनेक ठिकाणी मोगलांशी चकमक उडे. छत्रपती संभाजी महाराजांच्या नारोजी नावाच्या एका सरदाराने धारूर किल्ल्यावर आपल्या सैन्यासह चाल केली. किलअदारखान या किल्लेदाराशी सामना झाला. १०० मराठी सैन्य मारले गेले. किल्लेदाराने त्यांची डोकी कापून मनोरा रचला. १३ लोकांना जिवंत पकडले. मोगल सैनिक बहुतेक कामी आले. मात्र मराठ्यांनी प्रचंड पराक्रम गाजवून मोगल सैन्य कापून काढले. छत्रपती संभाजी महाराजांच्या सूचनेनुसार मराठी सरदारांचा यल्गार जबरदस्त होता.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २८ मार्च इ.स.१७३७
बाजीराव पेशव्यांनी दिल्लीवर हल्ला करुन मोगलांचा पराभव केला.
मे १७३६ मध्ये दिल्लीच्या बादशहाकडून अनेक किल्ले, जहागिर्‍या आणि पन्नास लक्ष रुपये मिळण्याचा तह झाला पण तो पुरा न झाल्याने २८ मार्च १७३७ रोजी पेशव्यांनी थेट दिल्लीवर धडक मारून दुसर्‍या दिवशी रामनवमीस यात्रा लुटली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments