ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶📜 ११ मार्च इ.स.१६७७
दक्षिणदिग्विजय मोहिम
दि. ११ मार्च १६७७ रोजी, राजे हैद्राबादहून निघाले . महाराज जिंजी, वेलोर, यमन गोंडा, आणि पोर्तो नोव्होचा कर्नाटकचा भाग विजापूरच्या ताब्यातून घ्यावयास निघाले. कुतुबशहाने १ हजार घोडदळ, ४ हजार पायदळ आणि एक अनुभवी सेनापती राजांच्या बरोबर दिला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶📜 ११ मार्च इ.स.१६७९
(चैत्र शुद्ध दशमी, शके १६०१, संवत्सर सिद्धार्थी, वार मंगळवार,)
आनंदरावांनी कोप्पल पाठोपाठ विजापुरकरांकडून दोड्डा बाळापुर जिंकले. किल्ले पन्हाळा प्रांतापासून जिंजीपर्यंत सलग भुमी स्वराज्यात दाखल करण्याच्या उद्देशाने सतत मोहीमा आखण्यात आल्या होत्या. कुठे हंबीरराव, कुठे मोरोपंत, कुठे आनंदराव यांनी स्वराज्य हेच स्वकार्य मानून यज्ञ आरंभला होता. कोप्पल पाठोपाठ आनंदरावांनी विजापुरकरांकडून दोड्डा बाळापुर जिंकले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶📜 ११ मार्च इ.स.१६८९
(फाल्गुन वद्य अमावस्या शके १६१० सवंस्तर विभव वार सोमवार)
#छत्रपती_संभाजी_महाराज_बलिदानदिन...
औरंगजेबाची अखेरंची सजा, "छत्रपती संभाजींच मस्तक कलम करा". आणि छत्रपति संभाजींच मस्तकं छाटलं गेलं. भाल्याच्या फाळाला अडकवलं आणि ""गुढीपाडव्याच् या आदल्या दिवशी महाराष्ट्रात संभाजींच्या मस्तकाची गुढी उभारंली". निघाली वाजत...गाजत! आली "इंद्रायणी - भीमेच्या" तीरावरं त्या रेतीत रोवला तो भल्याचा फाळं आणि मस्तकातनं रक्ताचा एक थेंब पडला "इंद्रायणी - भीमेच्या" पात्रात आणि थरारली ""इंद्रायणी - भीमा"" अरे!!! याच "इंद्रायणी - भीमेनं" पाहिलं होतं ते शौर्य, ते धाडसं, ते साहसं, तो पराक्रम, ती ज्वलाज्वलन तेजसनिष्ठा, ते धैर्य, तो संयम, मानवी जीवनाच्या चिरंतन तत्वाशी जुळंलेलं "छत्रपती संभाजींच" ज्ञाननातं. ती "इंद्रायणी - भीमा" छत्रपती संभाजींच्या मस्तकाकडं तिरक्या माना करून आसवं ढाळू लागल्या. गेली ३५० वर्ष झाली "इंद्रायणी - भीमा" अजून रडतेचाय. सांगतेय! खरा "सर्जा संभाजीराजा" अजून कळंलाच नाही.
"छत्रपती शिवाजी महाराजांनी सांगितलं... कसं जगावं !!! आणि छत्रपती संभाजी महाराजांनी दाखवंल... कसं मरावं !!!... ती "इंद्रायणी - भीमा" आजही सांगतेय........
या स्वराज्याच्या धाकल धन्यास त्रिवार मानाचा मुजरा.
!! जय जिजाऊ ! जय शिवराय ! जय शंभूराजे 🚩🚩
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶📜 ११ मार्च इ.स.१७९५
इतिहासातील प्रसिद्ध खर्ड्याची लढाई हैदराबादचा निजाम आणि मराठ्यांमध्ये ११ मार्च १७९५ रोजी झालीत, यात निजामाचा पराभव झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶📜 ११ मार्च इ.स.१८१८
कोरीगड किल्ला इंग्रजांकडे
११ मार्च इ.स. १८१८ रोजी इंग्रज कर्नल प्राथरने लूट करण्याच्या उद्देशाने या किल्ल्यावर चढाई केली. तीन दिवस लढून यश येईना. शेवटी गडाच्या दारुकोठारावर तोफेचा गोळा पडला. प्रचंड स्फोटाने गडावर आगीचे साम्राज्य पसरले. नष्ट झालेल्या दारुकोठारामुळे व गडावरील प्राणहानीमुळे मराठ्यांनी शरणागती पत्करली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment