ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶️📜 ७ मार्च इ.स.१६४७
इ.स. १६४७ मधे सतरा वर्षांच्या छत्रपती शिवरायांनी आदिलशहाच्या ताब्यातला तोरणगड जिंकला आणि स्वराज्याची मुहूर्तमेढ रोवली. तोरणगड हे स्वराज्याचे तोरणच ठरले. त्याच साली शिवरायांनी कोंढाणा(सिंहगड), आणि पुरंदर हे किल्ले आदिलशहाकडून जिंकून पुणे प्रांतावर पूर्ण नियंत्रण मिळवले.या शिवाय तोरणगडा समोरील मुरुंबदेवाचा डोंगर जिंकून त्याची डागडुजी केली व त्याचे नाव त्यांनी राजगड असे ठेवले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ७ मार्च इ.स.१६४७
आदिलशाहीशी आज ना उद्या राजांना टक्कर द्यावी लागणार हे दादाजींना स्पष्ट दिसत होते. मनातून ते निराश झाले होते. राजांच्या किल्ल्यांचे बांधकाम पूर्ण होत आले होते. रोहिडेश्वरांची तटबंदी भक्कम झाली होती. किल्ल्यांवरच्या तोफांनी बुरूज सजले होते. राजांची शिबंदीही आता मोठा आकार घेत होती. रोहिडेश्वरावर जमा केलेली हजार-बाराशे मावळेफौज पाच-सहा हजारावर गेली होती. व्याप वाढत होता. त्याबरोबर राजांच्या चिंताही वाढत होत्या. मुख्य चिंता होती दादाजींच्या आजारपणाची. दादाजींचे वय झाले होते. आणि आजारपण चालू होते. त्यांना रात्रीची झोप लागत नसे. दादाजींना आठवले की आपण पारस परगण्याचे मलठाण गावचे हिशेबनीस. शहाजीराजांनी आपल्या कारभारासाठी आपणांस उचलले. महाराज साहेबांचा विश्वास बसला, पुणे जहागिरीचा कारभार आपल्या नावे करण्याची त्यांनी दादाजींना आज्ञा केली. शहाजीराजांच्या ह्या विश्वासामुळे आदिलशाहीच्या दरबारचासुद्धा दादाजींच्यावर भरवसा होता. त्यांनीही दादोजींना अधिकार दिले होते. दादोजींना आपले मरण जवळ आल्याचे समजले, त्यांनी जहागिरीच्या हिशेबांच्या वह्या शिवाजीराजांस दाखविल्या. हळूहळू ते थकत चालले. अंथरुणातून उठण्याची शक्तीसुद्धा त्यांच्यात राहिली नाही. दादोजी घाबरे झाले आणि त्यांनी प्राण सोडला. (इ. स. ७ मार्च १६४७)
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ७ मार्च इ.स.१६४७
शिवाजी महाराजांचे राजकारणातील, विद्येच्या प्रांगणातील व क्षात्रकारणातील गुरू दादाजी कोंडदेव यांचे पुणे येथे वृद्धापकालाने निधन.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ७ मार्च इ.स.१६६५
सिंहगडाखाली मार खाल्लेला महाराजा जसवंतसिंह राठोड पुण्यातच हाय हाय करित बसला होता.त्याने शिवरायांविरूद्ध नंतर एकही पाऊल उचलले नव्हते. मिर्झा राजांना पुण्याचा अम्मल देऊन टाकून जसवंत सिंह याच दिवशी दिल्लीला निघून गेला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ७ मार्च इ.स.१६७३
#वीर_कोंडाजी_फर्जंद_यांचा_महापराक्रम
किल्ले पन्हाळा जिंकण्यासाठी केवळ ६० मावळ्यांना सोबत घेऊन शत्रूच्या २५०० ते ३००० फौजेविरूद्ध लढा देऊन फक्त ३ तासात ती लढाई व किल्ला जिंकणारे वीर कोंडाजी फर्जंद यांची शौर्यगाथा...
जगाच्या इतिहासात एवढ्या कमी सैन्याने एवढ्या जास्त सैन्याचा कमीत कमी वेळेत केलेला हा एकमेव पराक्रम...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ७ मार्च इ.स.१६८०
या दिवशी छत्रपती राजाराम महाराजांची मुंज रायगडावर झाली. लगेच आठ दिवसांनी १५ मार्च रोजी राजाराम महाराजांचे लग्न सरसेनापती प्रतापराव गुजर यांची मुलगी जानकीबाईंशी झाले होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment