ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 १८ मार्च इ.स.१६७९
(चैत्र वद्य प्रतिपदा, शके १६०१, संवत्सर सिद्धार्थी, वार मंगळवार) कोप्पळ स्वराज्यात दाखल!
कोप्पळचा किल्ला ३ मार्च इ.स.१६७९ रोजी जिंकल्यानंतर दोंडा बाळापुर व बहादुर बिंडा ताब्यात घेतला. आणि कोप्पळ स्वराज्यात दाखल केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १८ मार्च १६८०
सर्जाखानाला विजापुरी सैन्याचा मुख्य सेनापती केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १८ मार्च इ.स.१६८८
हरजीराजे महाडिक त्रिणामल्लीहून कंचीवर गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १८ मार्च इस.१६८९
१८ मार्च १६८९ रोजी खर्डी गाव सोडून मातबरखान पुढे निघाला. माहुली गडावरून एक हजार घोडेस्वार सैनिक आक्रमण करण्याकरता निघाले असल्याची त्याला वार्ता कळली. मराठे सैनिकांनी अवघड खिंडीचा व ठिकाणांचा आश्रय घेतला होता. हे वृत्त मातबरखानाला समजल्यावर त्याने हाजी अहमद बेग, विक्रम श्रीपत हा जव्हारचा जमीनदार आणि इतर अधिकाऱ्यांना घोडेस्वार, पायदळ आणि बंदुकधारी सैनिकांसह लढण्याकरता रवाना केले. तेव्हा सुमारे तीन तास बंदुका आणि बाणांचे युद्ध झाले. कित्येक मराठे सैनिक मरण पावले, जखमी झाले असे वृत्त मातबरखानाने औरंगजेबास पत्राने कळविले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १८ मार्च इ.स.१७०४
गोव्याच्या व्हिसेरेईने (दुसरे) छत्रपती शिवाजी महाराज यांना पाठवलेल्या पत्राची नोंद!
मराठ्यांच्या राज्य कारभाराविषयी मराठी कागदपत्रांत काही गोष्टी आढळत नाहीत, परंतु त्या पोर्तुगीज व मोगल कागदपत्रांतून आढळून येतात. ऊदाहरनार्थ, महाराणी ताराबाईसाहेब यांनी कोकणच्या प्रदेशापैकी काही प्रदेशाचा कारभार पाहण्यासाठी श्रीनिवास माधवराव या अधिकाऱ्याची नेमणूक करून त्याची दखल घेण्याबद्दल गोव्याच्या व्हिसेरेईस पत्र पाठविले होते. त्या पत्राची नोंद गोव्याच्या व्हिसेरेईने (दुसरे) छत्रपती शिवाजी महाराज यांना दि. १८ मार्च इ.स.१७०४रोजी पाठविलेल्या पत्रांत आढळतो. सदरहू पत्रात सिंधुदुर्ग बंदरात पोर्तुगीज जहाजांवर जो हल्ला झाला त्याला जबाबदार अधिकाऱ्यांना शिक्षा करण्याची विनंती (दुसरे) छत्रपती शिवाजी महाराज यांना करण्यात आली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 १८ मार्च इ.स.१७६०
चैत्री पाडाव्याच्या शुभ मुहूर्तावर राजमाता जिजाऊंचे माहेरघर सिंदखेदराजा येथून सदाशीव भाऊ यांनी आपल्या सहकार्यांसह उत्तरेकडे प्रयाण केले. त्यावेळी ५० हजारांची फौज सोबत होती. शिंदे-होळकर मार्गात मिळणार होते. अहमदशाह अब्दाली याच्या आक्रमणापासून दिल्लीच्या पातशाहीचे रक्षण करण्यासाठी मराठे युद्धाला निघाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १८ मार्च इ.स.१७७३
इ. स. १८ मार्च १७७३ रोजी रायगड अपाजी हरीच्या (माधवराव पेशवे यांचे सरदार) हाती आला. आपाजी, महाराज छत्रपतींच्या तख्तास मुजरा करण्यास गेला. त्याने नजर म्हणून नख्त पाच रुपये सिंहासनापुढे ठेविले. रुप्याची फुले सिंहासनावर उधळली. या प्रसंगी तख्तास पागोट्यांची झालर लाविली होती. आपाजीने दरबार भरविला; त्याप्रसंगी त्याने एक मोहोर नजर केली. भालदार व चोपदार यांस त्याने १८ रुपये बक्षीस दिले सैन्यांत असलेल्या हंसाजी खैरा यास त्याने रायगडची हवलदारी सांगितली रजा-परवागीच काम त्याचे हातून घ्यावयाचे ठरले. गणेश विश्वनाथ व हंसाजी यांचे नावे दोन मोर्तब तयार झाले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment