ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
▶️📜 ६ मार्च इ.स.१६६०
४ मार्च च्या दिवशी सिद्दी जौहरने पन्हाळा वेढला (वेढा घातला).आणि शिवाजी महाराज वेढ्याच्या पेचात सापडले शिव छत्रपतींना प्रतापराव गुजर यांची प्रतीक्षा..!! इंग्रज अधिकार्यांकडून सिद्दि ला तोफा आणि दारू गोळ्यांची रसद पुरवतो म्हणून होकार...!!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ६ मार्च इ.स.१६६५
(फाल्गुन अमावस्या, शके १५८६, संवत्सर क्रोधी, वार सोमवार)
महाराज व मिर्झाराजे जयसिंग दिल्लीकडे निघाले. मिर्झाराजे जयसिंग ३ मार्च रोजी पुण्यात आले. यावेळी महाराज जसवंतसिंह बादशाही फौजेसह तिथे तळ ठोकून बसला होता. याच सुमारास महाराज व मिर्झाराजे जयसिंग जसवंतसिंहाची भेट झाली आणि पुढील मोहीमेची सगळी सूत्रे मिर्झाराजे जयसिंग यांच्याकडे सुपूर्द करून महाराज जसवंतसिंह दिल्लीकडे निघून गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ६ मार्च इ.स.१६६६
(फाल्गुन शुद्ध दशमी, शके १५८७, संवत्सर विश्वावसू, वार मंगळवार)
औरंगजेबाचे अभयपत्र!
महाराजांना जिविताची हमी देणारे अभयपत्र मिळाले. महाराजांनी बिनघोर आग्रा येथे यावे हा औरंग्याचा डाव मात्र केवळ स्वराज्याखातर आणि मिर्झाराजे जयसिंगच्या शब्दावर विसंबून महाराजांनी जिवाचा धोका पत्करला होता. स्वतःबरोबर युवराज शंभुराजेंना घेऊन जात दुहेरी धोका महाराजांनी स्विकारला होता. नियती मात्र महाराजांची परीक्षा घेत होती.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ६ मार्च इ.स.१६७२
१६७२ मध्ये घोडबंदरवर स्वारी करून पोर्तुगीझांची वसाहत काबीज करण्याची छत्रपती शिवाजी महाराजांनी धाडसी प्रयत्न केला. त्यामुळे मुंबईकर इंग्रज घाबरून शिवाजी महाराजांची मर्जी संपादण्याच्या उद्योगास लागले. सख्य जोडण्यासाठी मिस्टर उस्टिक यास रायगडावर पाठविण्याचे कंपनीने ठरविल. राजापूरलुटीची भरपाई करून घेणे, हा तहाचा एक हेतु होता. २२ फेब्रुवारी रोजी मुंबईकरांनी ठरविले की शिवाजी महाराजांस स नजराणा देण्यासाठी ६०० रु. व शिवाजीच्या सरकारकुनांसाठी १५० रु. खर्च करावेत. उस्टिकने आपल्याबरोबर दहा भंडारी, दोन इंग्रज, दोन घोडे, पालखीचे भोई व दोनशे रुपये रोकड घ्यावी. उस्टिक रायगडावर का जात आहे, या बाबत गुप्तपणा राखावा; जाहीर करणेच झाले, तर राजापूरच्या वखारीची व गलबतांची नुकसानभरपाई करून घेण्यासाठी त्यास पाठवीत आहोत, एवढेच सांगावे असे कंपनीने ठरविले. उस्टिकने ६ मार्च १६७२ रोजी रायगडवर जाण्यास मुंबईहून निघाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ६ मार्च इ.स.१६७३
विजापूरचा सरदार खवासखान आपल्याविरुद्ध स्वारी काढण्याच्या बेतात आहे हे कळल्याबरोबर छत्रपती शिवाजी महाराजांनी आक्रमक भूमिका घेऊन प्रतापराव गुजर आणि आनंदराव यांना विजापूरी प्रदेशात चढाई करण्यासाठी पाठविले. दरम्यान अण्णाजी दत्तो व कोंडाजी फर्जंद यांना पन्हाळा किल्ला घेण्यासाठी शिवाजी महाराजांनी पाठविले. कोंडाजींनी आपल्या बरोबर मर्द मराठे ६० मावळे घेतले. दिनांक ६ मार्च १६७३ रोजी रात्री ते दोऱ्यांवरून किल्ल्यावर चढले. भेद यशस्वी होऊन ते वर जाऊन पोचले, तेव्हा किल्ल्यांतील लोक सावध होऊन त्यांजवर चालून आले. इतकी कडी गस्त ठेऊनही शत्रू आला कसा हेच कोणाला समजेना. शत्रू अफाट असावा असे त्यांस वाटले. भयंकर लढाई जुंपली. कोंडाजींनी एकदम किल्लेदारावर तलवार उगारून चाल केली. दोघांचे अटीतटीचे तुंबळ युद्ध झाले. कोंडाजींनी किल्लेदाराचे मुंडके उडविले. किल्लेदार गडावरच्या राजवाड्यापुढे ठार होऊन पडला. अवघ्या दोन-तीन तासात पन्हाळा किल्ला मराठ्यांनी जिंकला. स्वारीचे रसभरीत वर्णन जयराम पिंडये या कवीच्या ‘पर्णाल पर्वत ग्रहणाख्यान' या संस्कृत ग्रंथात आलेले आहे. पन्हाळा किल्ला हातचा गेला हे समजल्यावर विजापूर दरबारात खळबळ माजली. महाराज रायगडावर होते. त्यांजकडे जासूद पाठविला. ही आनंदाची बातमी महाराजांस २ दिवसांनी कळली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ६ मार्च इ.स.१७२८
#निजामाचा_पराभव, मराठ्यांबरोबर मुंगी-शेगावचा तह
निजाम-उल-मुल्क त्याआधी दिल्लीहून सेना घेऊन दक्षिण सुभा सोडवायला बाहेर पडला होता निजाम हा औरंगजेबाच्या काळातील लढवय्या अनेक देश पाहीलेला व अनेक लढाया त्याने स्वबळावर जिंकल्या होत्या....
निजामाचा सरदार इवाझ खान याने बाजीरावांचा पाठलाग सुरू केला बाजीराव खानदेशातून गुजरातकडे निघाले बाजीराव आपल्याला पतंगाप्रमाणे ओढीत नेत असल्याचे
लक्षात येऊन निजामाच्या सैन्याने त्यांचा नाद सोडला व बाजीरावास शह देण्यासाठी त्याने पुण्यावरच चाल केली आणि साताऱ्यातील छत्रपतींना धोका निर्माण केला....
असा शह बसल्यावर छत्रपती, बाजीराव दोघेही नाक मुठीत धरून आपल्यास शरण येतील असा निजामाचा हा डाव पूर्ण होत आला होता बाजीरावांनी त्यास भीक न घालता निजामालाच काटशह देण्याचे ठरवले व खुद्द निजामाची राजधानी असलेल्या औरंगाबादवर चाल केली....
निजामास ही खेळी अनपेक्षित होती त्याला औरंगाबादचा बचाव करणे भाग होते पण हाताशी आलेला मराठा छत्रपती सोडणेही त्याच्या जीवावर आले होते आता बाजीरावांच्या कचाट्यातून औरंगाबाद तरी वाचवावे यासाठी निजाम पुणे-सातारा परिसर सोडून उत्तरेस निघाला....
बाजीरावांनी औरंगाबादचा रस्ता सोडून निजामाला वाटेतच पकडण्याचा व्यूह रचला छापा घालून चकमकींचे लढाईत पर्यवसन होण्याआधी आपल्याला अनुकूल अशा दिशेस पळ काढत बाजीरावांनी निजामास नाशिककडे ओढत नेले अवजड तोफखाना, बोजड चिलखती घोडदळ यामुळे निजामाचा तोटाच झाला....
राऊंनी अगदी नियोजन बद्धतेने निजामाला पालखेडला आणले पूर्वनियोजित योजने प्रमाणे सर्व अधिकाऱ्यांना आपापल्या फौजेसह बाजीरावांनी पालखेडला बोलून घेतले होते....
आता मराठ्यांकडे अंदाजे ५०००० सैन्य जमले होते नगर पासून मराठा हेरांच्या टोळ्या निजामाच्या आस-पास होत्या त्याच्या प्रत्येक हालचालीची खबर बाजीरावांना टाकोटाक मिळत होती....
पालखेड वैजापुरच्या पूर्वेला १२ मैल तर औरंगाबाद पासून २८ मैलावर आहे पूर्वेला पाण्याचा साठा आहे त्याच बाजूला आपले सैन्य घेऊन राऊ होते Horse Shoe अर्थात घोड्याच्या नालेसारखी व्यूह रचना करून निजामाला खेचत आणून कोंडीत पकडले....
औरंगाबादकडे झेपावणारे बाजीराव (राऊ) आणि त्यांना तेथे पोहचण्या अगोदर रोखण्याच्या इराद्याने निघालेला निजाम यांची टक्कर २५ फेब्रुवारी १७२८ ला पालखेडला झाली मराठ्यांनी निजामाचे पाणी रोखले, रसद तोडली....
अर्जुनाच्या दिव्यास्त्रां प्रमाणे प्रभावी असलेला निजामाचा प्रसिद्ध तोफखाना नगरला गंजत पडला होता आता त्याचा ह्या आणीबाणीत निजामाला काहीच उपयोग नव्हता मराठ्यांना तोफांनी भाजण्याचे स्वप्न मनात मांडे खाणाऱ्या निजामाचे पुर्णपणे भंगले होते....
आणि भयानक वास्तव मृत्यू बनून पालखेडला त्याच्या समोर उभे होते पालखेडला कोंडीत सापडलेल्या निजामाचे अनन्वित हाल होऊ लागले भूक, तहान आणि समोर असलेले मराठे यांच्या कात्रीत सापडलेल्या निजामावर आणि त्याच्या फौजेवर जिवंतपणीच स्वतःचीच कबर खोदण्याचा प्रसंग आला....
या सर्व बिकट परिस्थितीमुळे अखेर निजामाने ईवाझखाना मार्फत तहाचे बोलणे चालवले अखेर ६ मार्च १७२८ मुंगी-शेवगावला तह झाला....
त्यानुसार निजामाला खालील अटींचे पालन करणे बंधनकारक होते -
१.छत्रपती शाहूराजे हे मराठा साम्राज्याचे एकमेव वारस असल्याचे निजामाने व पर्यायाने मोघल सम्राटाने मान्य केले....
२. मराठ्यांना दख्खनमधील चौथ व सरदेशमुखीच हक्क परत केला गेला....
३.मराठ्यांच्या देशमुखांना परत आपापल्या जहागिरी इनाम झाल्या....
४.महसूलाची थकलेली रक्कम निजामाने मराठ्यांस नजर करण्याचे कबूल केले....
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ६ मार्च इ.स.१७३९
चिमाजी आप्पांच्या वसई मोहीमेत या किल्ल्याने महत्वाची भूमिका वठवली होती इ.स १७३७ मध्ये मराठे व पोर्तुगिज यांच्यात पेटलेल्या वसईच्या युध्दामुळे धारावी बेटाला महत्व आले धारावी किल्ला हा वसईच्या किल्ल्या समोर आहे एका बाजूला वसईची खाडी तर दुसऱ्या बाजूला अरबी समुद्रयामुळे धारावी किल्ल्याचे स्थान वसई मोहीमेत अतिशय महत्वाचे होते या किल्ल्यावरुन वसईच्या पोर्तुगिजांना समुद्र व खाडीमार्गे मिळणारी रसद तोडणे शक्य होते तसेच वसई किल्ल्यावर लक्ष ठेवणे व मारा करणे धारावी किल्ल्याच्या उंचीमुळे सहज शक्य होते...
१२ एप्रिल १७३७ मध्ये मराठ्यांनी धारावी बेटावर हल्ला केला आणि घाइघाइत धारावी किल्ला बांधायला घेतला पोर्तुगिजांना मराठ्यांच्या किल्ला बांधण्याची बातमी लगेच कळली व पुढील धोका ओळखून त्यांनी हल्ला करुन धारावी बेट व अर्धवट बांधकाम झालेला किल्ला ताब्यात घेतला आणि किल्ला बांधून पुर्ण केला....
वसई किल्ल्याच्या दृष्टीने मराठ्यांना “धारावी किल्ला” जिंकून घेणे आवश्यक होते म्हणून ३० नोव्हेंबर १७३७ रोजी मराठ्यांनी ४००० हशम व १०० घोडेस्वारांच्या मदतीने धारावी किल्ला जिंकला त्यानंतर पोर्तूगिजांनी २८ फेब्रुवारी १७३८ च्या निकराच्या युद्धात धारावी किल्ला परत एकदा जिंकून घेतला पुन्हा चिमाजी आप्पांनी ९ मार्च १७३८ ला जातीने किल्ला घेण्याचा अयशस्वी प्रयत्न केला हा पराभव जिव्हारी लागल्यामुळे मराठे व पोर्तुगिज यांच्यातील संघर्ष वर्षभर चालू होता शेवटी ६ मार्च १७३९ रोजी मराठ्यांनी परत धारावीचा किल्ला जिंकून घेतला इ.स १८१८ मध्ये या किल्ल्याचा ताबा इंग्रजांकडे गेला....
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
▶️📜 ६ मार्च इ.स.१७७५
रघुनाथरावांनी दि. ६ मार्च १७७५ रोजी इंग्रजांशी पेशवाई पुन्हा मिळवून देण्याबाबत तह केला. यानुसार इंग्रजांना त्यांनी वसई, साष्टी, ठाणे इ. प्रदेश देण्याच्या करारावर सह्या केल्या. हाच तो दुर्दैवी असा प्रख्यात 'सुरतेचा तह'!
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment