ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 ३१ मार्च इ.स.१६६५
दिलेरखानने पुरंदर गडाच्या पायथ्याशी तळ ठोकला (३१ मार्च १६६५) जयसिंगास ही बातमी समजताच त्याने दिलेरखानास मोगली फौजेची कुमक रवाना केली. पुरंदर व वज्रगड या दोन्ही किल्ल्यास वेढा घालण्यास फर्माविले. पुरंदरच्या पायथ्याशी आल्या आल्याच दिलेरखानाने गडावर हल्ला चढविला. गडावर मोगलाची फौज चालून आल्यावर किल्ल्यातील मराठ्यांनी हुशार राहून ह्या आपत्तीस तोंड देण्यासाठी ते सज्ज झाले. गडाच्या पायथ्यापासून नारायण पेठपर्यंत मोगली अफाट फौजेच्या चहूकडे राहुट्या, तंबू आणि शामियाने वरून दिसत होते. पुरंदरगड समुद्रसपाटीपासून ४५६४ फूट आणि पायथ्यापासून २५०० फूट उंच बालेकिल्ला. दुसरा भाग माची. याची उंची पायथ्यापासून २१०० फूट, बाले किल्ल्याला बळकट तटबंदी होती आणि मुख्य दरवाजा होता. तोच सर दरवाजा. गडाची राखणदारी करणारे प्रसिद्ध लढवय्ये होते आणि किल्लेदार होते प्रसिद्ध लढवय्ये मुरारबाजी. पुरंदरचा वेढा चालू असताना जयसिंगाने मोगल सैन्याच्या लहान मोठ्या फौजा रोहिडा, राजगड, तुंग, तिकोना ह्या किल्ल्याकडे पाठविल्या. त्या आसपासच्या मुलुखात स्वाऱ्या, जाळपोळ व लुटालूट करूलागल्या.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜३१ मार्च इ.स.१६८४
इ. स. १६८४ च्या सुरुवातीस मोगल सरदार मामूरखान याने सुपे, बारामती आणि इंदापूर येथे मुघली ठाणी स्थापन केली. १३ फेब्रुवारी १६८४ रोजी शहाजादा आलम आणि त्याचा मुलगा बेदारबख्त यांना बादशहाने बहादूरगडाकडे रवाना केले. ३१ मार्च रोजी शहाबुद्दीन ऊर्फ गाजिउद्दीन हा पुणे आणि करडे निमोणे या प्रदेशाकडे रवाना झाला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜३१ मार्च इ.स.१६८७
मोगली सैन्य उत्तरेत खेचले जावे म्हणून रजपुतांच्या साहाय्याने छत्रपती संभाजी महाराजांनी मोगली हद्दीतच लढा सुरू केला होता. राजियांनी अकबरास साहाय्य दिल्याने अकबराचे मोठे सैन्य हिंदुस्तानाच्या मध्यापर्यंत नेऊन मिळविले होते. तसेच छत्रपती संभाजी महाराजांनी दुर्गादास व धनाजी जाधव यांच्या हाताखाली आपले सैन्य देऊन अकबराच्या नावाने ते मेवाड-बुंदेल खंडापर्यंत भिडविले होते.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜३१ मार्च इ.स.१७४३
सन १७४३ च्या फेब्रुवारी महिन्याचे प्रारंभी पेशवे पन्नास हजार फौजेनिशी बिहार प्रांतात दाखल झाले. पुढे पेशवे कूच करून मुर्शिदाबादेस निघाले. रघूजीनी बरद्वान परगणा ताब्यात घेऊन कटवा येथे सैन्याची छावणी केली. पेशव्यांनी तारीख ३१ मार्च १७४३ रोजी तुकोजी पवार, शिंदे, होळकर, जाधव इत्यादि सरदारांसह अलिवर्दीखानाची भेट घेतली. पेशवे व नबाब यांच्या भेटीत असे ठरले की, नबाबाने शाहू महाराजांस चौथाई द्यावी आणि पेशव्यास सैन्याचे खर्चाबद्दल बावीस लाख रुपये द्यावेत. रघूजी भोसल्यांनी बंगाल प्रांतावर स्वारी करू नये. याविषयी पेशव्यांनी रघूजी भोसल्यांशी करार करून बंदोबस्त करावा. पुढे नबाब व पेशवे आपल्या सर्व सैन्यानिशी रघूजी भोसल्यांवर चाल करून गेले. मराठे घोडदळापुढे नबाबाचे घोडेस्वारांचा टिकाव लागला नाही.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment