ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

▶️📜 १ मार्च इ.स.१५७२
प्रतापसिंह महाराणा झाला
प्रतापसिंहाच्या मामाने इतर सरदारांच्या मदतीने जगमलास दूर करून प्रतापास १ मार्च १५७२ रोजी महाराणा केले. तो महाराणा झाला त्यावेळी राजधानी चितोड शत्रूच्या हातात गेली होती. अनेक राजपूत अधिपतींनी अकबराचे स्वामित्व पतकरले होते व काहींनी आपल्या मुली त्यास देऊन शरीरसंबंध जोडला होता; पण राणाप्रतापने त्याच्यापुढे मान लवविली नाही. त्याने चितोड अकबराच्या हातून स्वतंत्र करण्याचा प्रयत्न सुरू केला आणि आपले वास्तव्य अकबराच्या सैन्याच्या दृष्टिक्षेपापासून दूर ठिकाणी केले. प्रजेला अरवलीच्या डोंगराळ भागात, जेथे अकबराचा उपद्रव पोहोचणार नाही, अशा ठिकाणी वस्ती करण्यास लावले. तेथेच त्याने काही भागात शेती केली. मेवाडचा मैदानी प्रदेश ओसाड करून टाकला आणि आपली राजधानी गोगुंड येथे नेली. सर्व डोंगरभागांतून अभेद्य असे किल्ले बांधले व ते शस्त्रास्त्रांनी सुसज्ज केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 १ मार्च इ.स.१६३०
शाहजहान बऱ्हाणपूरला पोहोचला. इथे रावरतनच्या हाताखाली दहा हजारांचे दळ बनवले. वाशीमची बाजू धरून ठेवणे व तेलंगाण नियंत्रणाखाली आणणे ही दोन उद्दिष्टे त्यांना दिली होती.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 १ मार्च इ.स.१६४१
(फाल्गुन अमावस्या शके १५६२, संवत्सर विक्रम, वार सोमवार)

महाराज जिजाऊ साहेबांसह बंगळूरला.
    छत्रपती शिवरायांना व माँ साहेब जिजाऊंना स्वराज्य सकल्पक राजे शहाजीराजे यांनी बंगळूरला बोलाऊन घेतल्यामुळे महाराज आणि जिजाऊ मॉसाहेब वर्षभर बंगळूर मुक्कामी. राजे शहाजीराजे यांनी इथे मात्र, शिवरायांच्या शिक्षणाची व युद्धकलेच्या प्रशिक्षणाची उत्तम व्यवस्था केली. राजे शहाजीराजे यांच्या तालमीत ्तयार होत होते.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 १ मार्च इ.स.१६८०
औरंगजेब दक्षिणेत उतरताच त्याने मराठी राज्यावर आक्रमण सुरू केले. औरंगजेब बादशहा आपला नाश
करण्यासाठी दक्षिणेत येत आहे हे संभाजी महाराजांना समजले होते म्हणून त्यांनी युद्धाची तयारी केली.
मोठमोठ्या गडावर साठे करून ठेविले. नाशिक जिल्ह्यातील बागलणांचा प्रदेश मराठ्यांकडून हिसकावून घेण्याचे औरंगजेब बादशहाने ठरविले आणि आपले लक्ष बागलणांकडे वळविले. त्यासाठी औरंगजेब ने दिनांक १ मार्च १६८० रोजी खानजहान बहादूर यास छत्रपती शिवाजी महाराजांनी घेतलेले किल्ले ताबडतोब मोगलांच्या ताब्यात घेण्याचा हुकूम दिला. लगेच त्याने अहिवंत किल्ल्यास वेढा घातला. पण मराठ्यांनी तो वेढा मारून
काढला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

▶️📜 १ मार्च इ.स.१६९२
१ मार्च रोजी मराठ्यांची आणि मोगलांची एक चकमक पांडेचरी जवळ उडाली. मराठे धान्य विकत घ्यायला आले होते. त्यांचा झगडा २०/२५ दिवस चालूच राहिला. याच महिन्यात झुल्फिकार खान तीन हजार स्वार घेऊन मुलुखात लूट करण्यास गेल्याचे पाहून मराठे सरदारांनी मोगलांचे घोडे, दारू सामान अशी पुष्कळशी सामुग्री पकडून घेतली. १६९२ च्या एप्रिल मध्येही मराठे-मोगलांच्या झटपटी चालू होत्या.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य"🚩

Comments