ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 १ एप्रिल इ.स.१६७०
छत्रपती शिवराय सुरतेवर पुन्हा हल्ला करण्याची अफवा पसरली. त्यांच्या बंदोबस्तासाठी गुजरातचा सुभेदार 'बहादूरशहा' ५००० फोजेसह सुरत मध्ये तळ ठोकून बसला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १ एप्रिल इ.स.१६७३
छत्रपती शिवरायांचे सरसेनापती 'प्रतापराव गुजर' यांना आज्ञापत्र.
"बहलोलखान या गनिमास गर्दीस मिळविल्याविणा आम्हास रायगडावर तोंड दाखवू नका".

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १ एप्रिल इ.स.१६७३
(चैत्र वद्य दशमी, शके १५९५, संवत्सर प्रमादी, वार मंगळवार)

मराठ्यांनी सातारा जवळचा "परळीचा किल्ला (सज्जनगड)" जिंकला.
सज्जनगडाच्या पायथ्याला परळी नावाचे गाव आहे.
या गावावरूनच किल्ल्याचे नाव परळी असे पडले. या गावात २ अतिशय जीर्ण अशी मंदीरे आहेत. सुरेख पण औरंगजेबाच्या हल्ल्यात त्या मंदीरांना उपद्रव झालेला आहे. मुंडी छाटलेला नंदी अजूनही मंदीरा समोर उभा आहे. पुर्वी अश्वलायन ऋषींनी या डोंगरावर तपश्चर्या केलेली होती म्हणून डोंगराचे नाव पडले अश्वलायन दुर्ग मग या परळी गावावरून डोंगराचे नाव पडले परळीचा किल्ला. मग छत्रपती शिवाजी महाराजांनी नाव ठेवले सज्जनगड औरंगजेबाने जेंव्हा किल्ला जिंकला तेंव्हा त्याने नाव ठेवले 'नवरसतारा' पुन्हा मराठ्यांनी हा किल्ला जिंकून किल्ल्याचा 'सज्जनगड' म्हणून नामकरण विधी केला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १ एप्रिल इ.स.१७३१
छत्रपती शाहूमहाराजांनी श्रीमंत बाजीरावांना गुजराथेत उतरण्याची परवानगी दिली. (१७३१) पेशवे गुजराथेत जात आहेत ही बातमी कळल्यावर त्र्यंबकरावही आपली फौज घेऊन श्रीमंत बाजीरावांच्या पाठलागावर गेले. पण शेवटी व्हायचे तेच झाले. त्र्यंबकराव दाभाडे आपल्या पिलाजी गायकवाड या सरदारानिशी बाजीरावांवर चालून आले. बाजीराव पेशवेही हुशार होतेच. दि. १ एप्रिल १७३१ रोजी गुजराथेतील डभईनजीक भिलापूरच्या मैदानात सेनापती दाभाडे आणि बाजीराव पेशवे यांच्यात लढाई जुंपली. पेशवे स्वतः घोड्यावर बसून लढत होते. त्र्यंबकराव मात्र हत्तीवर अंबारीत बसून सैन्याला सूचना देत होते. एकाएकी कसे झाले, कोणाच्या हातून झाले ते माहीत नाही. परंतु, त्र्यंबकरावांना बंदुकीच्या गोळीचा (जंबुरियाचा) जबरदस्त फटका बसला आणि गोळी वर्मी लागून त्र्यंबकराव दाभाडे पडले. त्र्यंबकराव पडले ही बातमी ऐकताच दाभाड्यांचे सैन्य चोहोदिशांना पळत सुटले. पिलाजी गायकवाडही पसार झाले. ते थेट तळेगावच्या दिशेने. कितीही झाले तरी त्र्यंबकराव हे स्वराज्याचे सेनापती होते. त्यांच्या वडिलांनी, आजोबांनी छत्रपतींकरिता स्वतःचे रक्त सांडले होते. युद्ध संपले, वैर सरले. बाजीरावाने मोठ्या मनाने त्र्यंबकरावांचे अंत्यसंस्कार केले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १ एप्रिल इ.स.१८१७
पेशव्याने सुद्धा इंग्रजांशी लढाई करण्याकरिता गुप्तपणे तयारी चालविली होती. त्याने आपल्याकडील जडजवाहर व खजिना रायगड किल्ल्यात सुरक्षिततेसाठी पाठवून दिला. दिनांक १ एप्रिल १८१७ रोजी एल्फिन्स्टनने बाजीरावास एक कडक पत्र लिहून कळविले की त्रिंबकजीचा पाठलाग जर झाला नाही तर इंग्रज सरकारला आपल्याशी जाहीररीत्या युद्ध पुकारावे लागेल व त्याच्या बऱ्या वाइटाचे धनी तुम्हीच व्हाल. दिनांक ६ एप्रिलला बाजीरावाने एल्फिन्स्टनला भेटीस बोलाविले व नेहमीच्या पद्धतीने त्याने लाचारी दाखवून लाघवी बोलून डेंगळेच्या बाबतीत आपण निरपराधी आहोत अशी बतावणी केली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील. 

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments