ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 १३ एप्रिल इ.स.१६६३
(चैत्र वद्य प्रतिपदा, शके १५८५, संवत्सर शोभन, वार सोमवार) महाराज कुडाळ मोहिमेसाठी किल्ले राजगडावरून रवाना झाले.
    महाराज मोहिमेसाठी कुठेही आणि कधीही वेळ दवडत नसत. अफजलखानाचा (३२ दाताच्या राक्षसी बोकडाच्या) कोथळा बाहेर काढून त्याला यमसदनी धाडल्यानंतर पुढील महिनाभर महाराजांनी आदिलशाहीवर मोहिमा काढून आदिलशाहीस सळो की पळो करून सोडले. आजही महाराजांनी शाहिस्तेखानाची बोटे तोडल्यावर कुठलाही उत्सव साजरा न करता आठवडाभरातच नव्या मोहिमेची आखणी केली. ४ हजार घोडदळ, आणि १० हजार पायदळासह महाराज राजापुर मार्गे कुडाळ मोहिमेसाठी वेंगुर्ला भागाकडे निघाले. मात्र महाराजांच्या आगमनाच्या भितीमुळे पोर्तुगिजांची चांगलीच धावपळ झाली. डिचोली आणि साखळीचे हवालदार महाराजांच्या स्वारीच्या भयाने पळून गेले. महाराज मात्र, राजापुरास जाऊन तीरथे राहुजी सोमनाथ यांना सोबत घेऊन कुडाळसाठी पुढे निघून गेले.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १३ एप्रिल इ.स.१७००
छत्रपती राजारामराजे जाऊन महिना होऊन गेला तरी बादशाहस अजिंक्यतारा काही दाद देत नव्हता. १३ एप्रिलच्या पहाटे मोगलांनि किल्ल्याच्या तटाखाली दोन भुयारे खणली. आणि त्यात सुरुंग पेरून त्यांस बत्ती लाविली. एक सुरुंग फुटला आणि अनेक मराठे त्या खाली गाडले गेले, खुद्द प्रयागजी सुद्धा ढीगाऱ्यात अडकले पण सुदैवाने ते बचावले. तट फुट्ल्याचा आनंदात मोगल वर चढून येऊ लागले, अनेक मोगल किल्ल्यात घुसले. तेवढ्यात अचानक दुसरा सुरुंग उडाला आणि तट चढ़णारे हजारो मोगल त्या खाली गाढले गेले. कित्येक मोगल तर उंच फेकले गेले. आधीच आत आलेल्या मोगली सैन्यावर आता प्रयागजी आणि त्यांचे मराठे तुटून पडले आणि त्यांना साफ़ कापून काढले. गडावरच्या मुठभर मराठ्यांच्या मदतीने प्रयागजींनी तब्बल साडेचार महीने औरंगजेबाशी झुंज दिली आणि अखेर गडावरचा दाणागोटा, दारुगोळा संपला,
तेव्हा गडावरच्या मराठ्यानी २१ एप्रिल १७०० रोजी शरणागती पत्करली.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १३ एप्रिल इ.स.१७०४
संग्रामदूर्ग उर्फ चाकणचा किल्ला सोडून औरंगजेब खेड, राजगुरुनगरकडे निघाला.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 १३ एप्रिल इ.स.१७३१
छत्रपती शाहू महाराज (सातारा) आणि  छत्रपती संभाजी महाराज (कोल्हापुर) यांच्यात राज्याच्या सिमेवरुन वाद.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments