ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 १४ एप्रिल इ.स.१६६४
जसवंत सिंह राठोड याने सिंहगडावर सुलतालढवा केला. हा एकमेळाने केलेला हल्ला मराठ्यांनी उधळून लावला. जसवंत सिंहाची पाठ मराठी चित्त्यांनी फोडून काढली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १४ एप्रिल इ.स.१६६५
इतिहास प्रसिद्ध पुरंदरच्या वेढ्यामध्ये दिलेरखान, फतेलष्कर, अब्दुल्ला व महेली या मोगलांनी ३ तोफांच्या सहाय्याने वज्रगड/वज्रमाळ जिंकला. वज्रगड किल्ला पुरंदर किल्ल्याशेजारीच त्याचा धाकटा भाऊ होऊन उभा आहे. ३१ मार्च रोजी पुरंदरचा वेढा सुरु झाला होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १४ एप्रिल इ.स.१६६५
“इ.स. १६६५ एप्रिल १४. कॉन्सल लॅनॉय आलेपो-अर्ल ऑफ विंचिलझिया" सुरतेच्या प्रेसिडेंटचे पत्र आले आहे की, छत्रपती शिवाजी महाराजांपासून सुरत सुरक्षित आहे. परंतू मोगलांच्या मुलुखांत ते स्वैर संचार करुन कित्येक शहरे लुटीत आहेत. बादशहाचे बडें सैन्य त्यांच्यावर आले आसतांहि वाटेंत शत्रुविरुद्ध नाकेबंदी करीत करीत ते थेट गोव्या पर्यंत किनार्याने जाऊन आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १४ एप्रिल इ.स.१६७३
छत्रपती शिवाजी महाराज पन्हाळगडावरून रायगडावर आले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १४ एप्रिल इ.स.१६७५
#छत्रपती_महाराणी_ताराबाई_जयंती
महाराणी ताराबाई (१६७५-१७६१) ह्या छत्रपती राजाराम महाराजांच्या दुसऱ्या पत्नी आणि छत्रपती शिवाजी महाराजांचे सरसेनापती हंबीरराव मोहिते यांच्या कन्या होत्या. छत्रपती ताराराणी भोसले यांचा जन्म १६७५ साली तळबीड येथे झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १४ एप्रिल इ.स.१६८५
१४ एप्रिल १६८५ या दिवशी विजापूरला मोंगली फौजांचा वेढा पडला. रहिमतखान, रूहुल्लाखान, रणमस्तखान अशा शाही सरदारांनी विजापूरला मोर्चे लावले. वास्तविक आदिलशाही आणि कुतुबशाही या 'इस्लामी शाह्या' होत्या. तरीही त्या 'दख्खनी' असल्याने, अन् मुख्य म्हणजे मराठ्यांना साहाय्य करत असल्याने औरंगजेबाने आपला रोख आता आधी या दोघांकडे वळवला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १४ एप्रिल इ.स.१७३६
चिमाजीअप्पांनी मोघल बादशहाचा हस्तक जंजिरा येथील सिद्दीसाताचा पराभव करुन मराठी सत्तेचा दरारा बसविला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 १४ एप्रिल इ.स.१८९१
#भारतरत्न_डॉ_बाबासाहेब_आंबेडकर_जयंती
भारतीय राज्य घटनेचे शिल्पकार डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्म वडील रामजी व माता भीमाबाई यांच्या पोटी १४ एप्रिल १८९१ रोजी झाला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment