ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 २ एप्रिल इ.स.१६६०
पन्हाळा च्या वेढ्यात जौहरच्या तोफांचा मारा पन्हाळागडावर पोहोचेना म्हणून राजापूरच्या इंग्रज वखारवाल्याकडे एका लांब पल्ल्याची तोफ व दारूगोळा याची मागणी केली. जौहरचे बळ सारखे वाढत होते. शृंगारपूरकर सूर्यराव सुर्वे व पालवणीकर जसवंतराव दळवी हे सैन्य घेऊन जौहरला सामील झाले. इंग्रजांच्या राजापूर वखारीचा मुख्य हेन्री रिव्हींग्टन होता, याने जौहरची मागणी मंजूर केली आणि इंग्रज गोलंदाजांची एक तुकडी, लांबपल्ल्याची मोठी तोफ व दारूगोळ्याचे पेटारे घेऊन हेन्री साथीदार फिलिप गिफर्ड आणि मिंगहॅमसह राजापुराहून २ एप्रिल १६६० रोजी निघाला, तो पन्हाळ्याच्या पायथ्याशी १० एप्रिल १६६० च्या सुमारास दाखल झाला. त्याने आपल्या तोफांचे पन्हाळगडाला मोर्चे लाऊन थेट तोफेला बत्ती दिली, अन् नुसती बत्ती दिली नाही तर शेजारी ब्रिटिशांचे निशाणही फडकावले. याला म्हणतात स्वतःच्या शौर्याबद्दलचा 'अधिक आत्मविश्वास'! महाराजांना अर्थातच गडावरून हे सारे दिसले होतेच. महाराज भयंकर संतापले. काही दिवसांपूर्वीच या इंग्रजांना आपण सवलत दिली, तेच आपल्यावर इतक्या लवकर उलटून आले! पुढे महाराज पन्हाळ्याच्या वेढ्यातून सुखरूप निसटले व पुढे काही दिवसांनी राजापुरची इंग्रजांची वखार कुदळीने खंडून लुटली ते पण सुतुळीच्या तोड्या सगट.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २ एप्रिल इ.स.१६६३
(चैत्र वद्य अष्टमी, शके १५८५, शोभन, वार सोमवार)
महाराजांचे पत्र!
चिंताग्रस्त करणारी बातमी याच सुमारास किल्ले सिंहगडावरून आली होती. शाहिस्तेखानाने स्वराज्यात फंदफितुरीचे सत्र अवलंबले होते. तशातच किल्ले सिंहगडावर फितुरी करून भेदाने हा मोक्याचा गड आपल्या ताब्यात घेण्यासाठी भरपूर प्रयत्न सुरू केले होते. किल्ले सिंहगड मोगलांच्या घशात जाणे म्हणजे पुणे प्रांत हातातून जाण्यासारखे होते. त्यामुळे महाराजांनी अत्यंत तातडीने मोरोपंत पेशवे आणि निळोपंत मुजुमदार यांना पत्र पाठविले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २ एप्रिल इ.स.१६७९
औरंगजेबाने जिझिया कर लादला.
औरंगजेबाने मोगल राजवटीतील मुस्लिमेतरांकडून जिझिया कर वसूल करण्यास पुनः चालू केले.
आता जिझिया म्हणजे काय?
असा प्रश्न इथे सर्वांच्याच मनात आला असेल.
कारण "अकबराने जिझिया कर बंद केला" इथपर्यंतच आपल्याला जिझियाबाबत माहिती आहे, पण हा जिझिया म्हणजे काय?
इस्लामच्या सुरुवातिच्या काळात मुस्लिम राजवटीत राहणार्या बिगर-मुस्लिमांसमोर केवळ दोनच पर्याय असत.
एक तर धर्मांतर करून इस्लामचा स्वीकार करणे अथवा मृत्यू.
मात्र पुढील काळात अपवाद म्हणून जिझिया कर देऊन
"जिम्मी" म्हणजे दुय्यम नागरिक म्हणून जगण्याची परवानगी दिली गेली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜२ एप्रिल इ. स. १६७९
वैशाख शुद्ध द्वितीया, शके १६०१, संवत्सर सिद्धार्थी, वार बुधवार, युवराज शंभुराजेंना घेऊन दिलेरखानाचा किल्ले भुपाळगडावर हल्ला!
दिलेरखान आणि युवराज शंभुराजे किल्ल्याला भिडले.चाकण येथील संग्रामदुर्गावर ५६, छपन्न दिवस शाहिस्तेखाना बरोबर झुंज देणारे व त्याला आपल्या अतुल पराक्रमाने चकित करणारे फिरंगोजी नरसाळा हे या किल्ल्याचे किल्लेदार होते. त्यांच्या बरोबर त्यांचा सहकारी म्हणून विठ्ठल भालेराव हे सबनीस होते. दिलेरखानाने मराठ्यांच्या विरुद्ध इखलासखान, राजा जसवंतसिंह बुंदेला, रशीद अली रोशनाई ऊर्फ इल्हामुल्लाहाखान यांना रवाना केले. पण मराठ्यांचे सैन्य अधिक होते म्हणून दिलेरखान हा तातडीने आपल्या सरदारांच्या मागोमाग पोहोचला आणि त्याने मराठ्यांचा मोड केला आणि तो परतला. मोगली आक्रमणात गडावरील सर्व माणसे कैद केली गेली. माणसांना सुखरूप जाऊ दिले जावे या युवराज शंभुराजेंच्या विनंतीनंतरही गडावरील ७००, सातशे माणसांना कैद करून त्यांचा एक हात कलम करून दिलेरखानाने आपल्या क्रृरतेचे दर्शन घडविले. दिलेरखानाने भुपाळगड चक्क जमीनदोस्त करून आपल्या नीच मानसिकतेचे दर्शन घडविले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २ एप्रिल इ.स.१७२०
(शार्वरी नाम संवत्सरी, चैत्र शुद्ध षष्ठी, शके १६४२)
बाळाजीपंत कोल्हापूरची मोहीम झाल्यानंतर सातारला शाहूमहाराजांच्या भेटीकरिता आले. तेथून ते सासवडला परतले. एक-दोन दिवस गेले असतील तेच बाळाजीपंत अतिशय आजारी पडले. गेल्या दोन वर्षांतली सततची धावपळ, दिल्ली स्वारीनंतर लगेचच कोल्हापूरस्वारीची दगदग बाळाजीपंतांना मानवली नाही आणि शेवटी दि. २ एप्रिल १७२० रोजी शार्वरी नाम संवत्सरी, चैत्र शुद्ध षष्ठी, शके १६४२ ला क-हामाईच्या तीरावरच्या काळ्या वाड्यात बाळाजी विश्वनाथांचा मृत्यू झाला. शेवटपर्यंत शाहू छत्रपतींचे अन् स्वराज्याचे हित बघणारे अन् आता स्वराज्याने सुखाच्या गृहात पाऊल टाकताच कृतार्थ झालेले स्वराज्याचे एकनिष्ठ पाईक श्रीमंत बाळाजी विश्वनाथ पेशवे काळाच्या पडद्याआड गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २ एप्रिल इ.स.१७२६
पुण्यात येताच थोडी विश्रांती घेऊन श्रीमंत बाजीराव साताऱ्याला छत्रपती शाहूमहाराजांची भेट घेऊन आले. पुण्याला परत येताच बाजीरावांनी जिवाजी गणेश खासगीवाले यांना बोलावून घेतले. इ. स. १७२६ (२ एप्रिल १७२६- पेशवे दफ्तर) मध्ये शाहूमहाराजांनी पेशव्यांना पुणेगाव वंशपरंपरागत इनाम म्हणून दिला होता. परंतु, तरीही पेशव्यांचा स्वतःचा असा पुण्यात वाडा नव्हता. म्हणून बाजीरावांनी खासगीवाले यांना श्रीमंत पेशवे यांच्या इभ्रतीला अन् पराक्रमाला शोभेल असा, झोकदार आणि मजबूत वाडा (शनिवारवाडा) उभारण्याची आज्ञा केली. दोन दिवसात वाड्याचा नकाशा तयार झाला. पण वाडा नेमका कुठे बांधावा याबद्दल एकविचार होत नव्हता. शेवटी लालमहालाच्या पश्चिमेस आणि मुठेच्या दक्षिण तीरावर उत्तम जागा सापडली. बाजीरावांनी जागा पाहिली. शेजारीच श्री कसबा गणपती आणि शिवछत्रपतींचा पवित्र लालमहाल होता. बाजीरावसाहेबांनी ताबडतोब बांधकाम सुरू करण्यास सांगितलं.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜२ एप्रिल इ.स.१८९४
राजर्षी शाहू महाराज राज्याभिषेक
कोल्हापूर संस्थानाचे राजे चौथे शिवाजी महाराज यांच्या मृत्यूनंतर त्यांच्या पत्नी आनंदीबाई यांनी १७ मार्च, इ.स. १८८४ रोजी यशवंतरावांना दत्तक घेतले, व शाहू हे नाव ठेवले. २ एप्रिल १८९४ रोजी त्यांचा राज्यारोहण समारंभ झाला. राज्याभिषेक झाल्यानंतर इ.स. १९२२ सालापर्यंत म्हणजे २८ वर्षे ते कोल्हापूर संस्थानाचे राजे होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment