ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 ३ एप्रिल इ.स.१६६२
मोरोपंत पिंगळे हे आतापर्यंत मुजुमदारी करीत होते. त्यांची ही मुजुमदारी निळोपंत सोनदेवांस दिली. छत्रपती शिवाजी महाराजांनी मोरोपंत पिंगळे यांना पेशवे पद दिले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३ एप्रिल इ.स.१६६७
आग्र्याहून सुटका प्रकरणानंतर औरंगजेब व छत्रपती शिवाजी महाराज यांच्यात युद्धबंदीचा तह झाला.
आग्र्याहून सुटका प्रकरणात सापडलेले रघुनाथ बल्लाळ कोरडे व त्र्यंबक सोनदेव डबीर यांना औरंगजेबाने सोडले. माहिती काढण्यासाठी यांचे अनन्वयीत हाल केले गेले पण या स्वामी निष्ठांनी तोंडही उघडले नाही.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३ एप्रिल इ.स.१६७९
दिलेरखानाने छत्रपती संभाजी महाराज त्यांच्याकडे आल्याचा फायदा घेऊन मराठी मुलखांतील प्रदेश जिंकण्यास सुरुवात केली. छत्रपती संभाजी महाराज दिलेरखानाकडे गेल्यावर दिलेरखान व छत्रपती संभाजी महाराज यांनी ३ एप्रिल १६७९ रोजी स्वराज्यातील भूपाळगड जिंकला. छत्रपती शिवाजी महाराजांनी हा किल्ला मांजऱ्यानजीकच्या पर्वतावर बांधून त्याचे भूपाळगड असे नाव ठेविले होते. या किल्ल्यावर सामान, सरंजाम आणि मालमत्ता ठेवण्यात येत असे. गडावर लढाऊ शिबंदी व शूर शिपायांचा पक्का बंदोबस्त केलेला होता. मोगलांची फौज येत आहे असा पुकारा होतांच किल्ल्यांच्या आसमतांतील गावचे लोक किल्ल्यांत आश्रयास जाऊन राहिले. दिलेरखानाने शंभुराजेंच्या मदतीने भूपाळगड किल्ला घेतला. या वेळा किल्ल्यांचे किल्लेदार फिरंगोजी नरसाळा हे होते. दिलेरखानाने भूपाळगडची तटबंदी पाडून टाकली. यानंतर दिलेरखान व शंभुराजे विजापूरवर चालून गेले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ३ एप्रिल इ.स.१६८०
#छत्रपती_शिवाजी_महाराज_पुण्यतिथी
जगाच्या इतिहासतील एक सर्वात काळाकुट्ट भयाण दिवस
आज हां दगडाचा सह्याद्री अश्रुन्नी भिजला होता,
त्या दुर्ग दुर्गेश्वर शिवतीर्थ रायगडाने देखिल टाहो फोडला होता...
१६८० साली याच दिवशी शौर्य, धैर्य, पराक्रम, नितीमत्ता, प्रजाप्रेम, स्वातंत्र्य यांचा ओजस्वी स्त्रोत असलेले व गुलामीच्या साखळदंडात अडकलेल्या मानवला मुक्त करणारे आणि ह्या भूतलावर सुवर्ण स्वराज्य स्थापन करणारे असे तुमचे आमचे नाही तर ह्या सकल त्रिलोकाचे पालनकर्ते, तारणहार राजमान्य राजश्री, अखंड लक्ष्मी अलंकृत, महापराक्रमी, महाप्रतापी महाराजाधिराज, श्रीमंत छत्रपती शिवाजी राजे महाराज हे सर्व त्रीलोकाला पोरके करून अनंतात विलीन झाले..
ज्यांच्या उपकारांची परतफेड आपल्याला आणि येणाऱ्या हजारो पिड्या हि करू शकत नाही व आज हि ज्यांच्या जाज्वल्य स्मृती आपल्या सारख्या त्यांच्या लेकरांना ह्या अनंत अत्याचाराने व पापाने बरबटलेल्या कलियुगात जगण्याचे सामर्थ्य देतात अशा ह्या अलौकिक, अद्वितीय महामानवास आमचे कोटी कोटी शीरसाष्टांग प्रणाम..
अनेक जुल्मी हुकुमातिन्चा समूळ नाश करून एक झंझावत विसावा घेतोय. पण गद्दरानो ख़बरदार, हा झंझावत पुन्हा जागृत होईल, लाखो वावटळना साथीला घेउन हा झंझावत ज्वालामुखीचा अवतार घेईल, ह्याच ज्वालामुखीचा एक दिवस उद्रेक होऊन तुमच्या क्रूर साम्राज्याचा विनाश करेल व पुनश्च ह्या धरतीवर स्वराज्य नांदेल...
जय शिवराय जय शिवराय जय शिवराय
१६८० साली आजच्याच दिवशी "शककर्ते छत्रपती शिवराय" यांचे रायगडावर महानिर्वाण झाले. या सह्याद्रीचा सिंह चीरनिद्रेत गेला. पण शिवराय आम्हाला सोडून गेले नाहीत, ते अजूनही आमच्या रक्ताच्या प्रत्येक थेंबात जिवंत आहेत आणि हा चंद्र,सूर्य असे तोवर राहतील..
शककर्ते छत्रपती शिवराय यांना त्यांच्या
महानिर्वाणदिनी त्रिवार मुजरा...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment