ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 ४ एप्रिल इ.स.१६२३
पेट्रोडीला व्हेल पोर्तुगीज लिहितो कि, ‘मी चौल बंदरातून निघून दंडराजपुरी बंदराच्या जवळून गेलो हे एवढेच बंदर निजामशहाच्या ताब्यात आहे.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ४ एप्रिल इ.स.१६६३
(चैत्र शुद्ध सप्तमी, शके १५८५, संवत्सर शोभन, वार शनिवार)
महाराजांची शाहिस्तेखानाला शास्त देण्याची तयारी!
महाराजांची महाराजांचा मुक्काम यावेळी किल्ले रायगडावर होता. तेथून ते किल्ले राजगडला परतले. सरनौबत नेतोजी राजगडी दाखल झालेले होतेच. मोरोपंत पेशवे व निळोपंत मुजुमदार किल्ले सिंहगडावर गेलेले होते. राजगडी पोहोचताच महाराजांनी निवडक मुत्सद्यांसमवेत विचार विनिमय करून प्रत्यक्ष शाहिस्तेखानावरच हल्ला करण्याचा आपला धाडशी बेत त्यांना सांगितला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ४ एप्रिल इ.स.१६७०
नगरमध्ये मराठे घुसलेले पाहून 'दाऊदखान कुरेशी' हा खानदेशातून त्वरेने नगरास ७००० स्वारांसह आलेला होता.
नगरमध्ये घुसलेले मराठे आजच्या दिवशी जुन्नर प्रांतात पळाले. दाऊदखान त्यांच्यामागे हाथ धुवून पळत सुटला, जुन्नर प्रांतातूनही मराठे तात्पुरते पळून गेले. मग मात्र दमलेला दाऊदखान नगरला परतला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ४ एप्रिल इ.स.१६७४
नारायण शेणव्याचा (इंग्रज वकील) हा महाराजांच्या भेटी साठी रायगडावर आला होता. त्याने ४ एप्रिल रोजी मुंबईच्या डेप्युटी गव्हर्नरला उद्देशून
लिहिलेल्या पत्रांत कळविलें, येत्या जूनमध्ये राज्याभिषेक करून घेण्याच्या उद्देशाने शिवाजी तयारी करीत आहे. सोने, हिरे यांनी जडवलेले भव्य सिंहासन तयार होत आहे. असंख्य विद्वानांना बोलावणीं जातील. रायगडावर फार मोठ्या प्रमाणांत दानधर्म होईल. आता ऑक्झेंडन बरोबर शिवाजीकरिता चांगला नजराणा पाठवा. आरबी घोडा वगैरे न धाडता मूल्यवान् रत्ने, राज्याभिषेक समयी धारण करण्याजोगी पाठवावीत. नजराणा हजार बाराशे रुपयांचा पाठवावा.' व प्रतापराव गुजरांच्या साहसाची माहिती कळवलेली आढळते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜४ एप्रिल इ.स.१६८७
छत्रपती संभाजी महाराज मोगलांवर बाहेरून हल्ले चढविण्याकरिता व सर्वत्र रसद मारून मोगली सैन्य जेर
करण्यासाठी आपल्या सैनिकासह गोवळकोंड्याभोवती हिंडत होते. त्यांचे कर्नाटकातील सैन्यही नाकेबंदी करून राहिले होते. मच्छलीपटणचे दिनांक ४ एप्रिल १६८७ चे फोर्ट सेंट जॉर्जला लिहिलेल्या पत्रात छत्रपती संभाजीराजे १२ हजार स्वार व ५० हजार पायदळ लोकांसह गोवळकोंडा याच्या रोखाने गोवळकोंड्यापासून ४/५ दिवसांच्या मुक्कामावर आले आहेत असा मजकूर आहे. गोवळकोंड्याचा सुलतान मोगलांच्या हल्ल्याचा जोरात प्रतिकार करीत होता.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ४ एप्रिल इ.स.१७७२
पेशवे माधवराव यांची तब्येत खालावल्याने त्यांच्या पत्नी रमाबाई त्यांच्या तब्येतीसाठी प्रार्थना करण्यासाठी हरिहरेश्वर येथे गेल्या.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment