ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 २३ एप्रिल इ.स.१६५७
(वैशाख वद्य षष्ठी, शके १५७९, संवत्सर हेमलंबी, वार गुरुवार) महाराजांचे नगरचा मोगली सुभेदार मुल्तफखानास पत्र !
"आपली मागणी मंजूर होत असल्यास आपण शाही फौजेत दाखल व्हायला तयार आहोत". अशा आशयाचे पत्र लिहिले मुल्तफखानाकडून महाराजांना अनुकूल उत्तर प्राप्त झाले. या उत्तराच्या बळावर महाराजांनी प्रत्यक्ष औरंगजेब बादशहाकडे आपले वकील म्हणून सोनोपंत यांना रवाना केले. सोनोपंतांनी महाराजांची मागणी औरंगजेब बादशहा समोर ठेवली. महाराजांचे म्हणणे असे होते की, "विजापुरकडील जो मुलूख व किल्ले माझ्याकडे आहेत ते मलाच मिळावेत व नुकताच उत्तर कोकणचा दाभोळ बंदरावरील जो भाग मी जिंकून घेतला आहे त्यालाही औरंगजेब बादशहाने मान्यता द्यावी".
हा सर्व मुलूख आदिलशहाचाच असल्यामुळे तो महाराजांना बहाल करण्यात औरंगजेब बादशहाचे काहीच बिघडत नव्हते.निव्वळ मान्यतादर्शक शब्दांचाच खेळ खेळायचा होता. हे औरंगजेब बादशहाने आनंदाने केले!
औरंगजेब बादशहाच्या मान्यतादर्शक पत्राचे "मोल" महाराजही जाणत होते.आपल्या मनाचा थांगपत्ता लागू न देता महाराजांनी औरंगजेब बादशहाला चुचकारून.
मोठेपणा देऊन औरंगजेब बादशहाला बेसावध ठेवले. हे राजकारणच होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜२३ एप्रिल इ.स.१६८३
(वैशाख शुद्ध सप्तमी, शके १६०५, रुधिरोद्रारी संवत्सर, वार सोमवार)
सुरतकर इंग्रजांनी मुंबईकर इंग्रजांना प पत्राची नोंद!
"मोगल पातशहा अजून औरंगाबादेतच आहे. सुलतान अकबर व छत्रपती संभाजी महाराज यांच्यावर पाठविलेली सेनादले काढून घेतली आहेत. हा निर्णय घेतल्यामुळे लोकांमध्ये तर्कवितर्क निर्माण झाले आहेत. छत्रपती संभाजी महाराजांनी औरंगजेब बादशहाची फजिती अवघ्या काही वर्षांतच कशाप्रकारे केली होती याचे दर्शन होते. खऱ्या अर्थाने छत्रपती संभाजी महाराज एका सिंहाचेच छावे कसे होते याचे यथार्थ दर्शन या सुरतकर इंग्रजांच्या पत्रातून होते. वरील पत्रावरून मराठे सैन्य औरंगजेब बादशहाशी किती निकराने सामना देत होते. आणि औरंगजेब बादशहास निर्विवाद विजय कसा प्राप्त होत नव्हता हे सिद्ध होते.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜२३ एप्रिल इ.स.१६९३
१६९३ च्या जानेवारीत छत्रपती राजाराम महाराजांनी जुल्फिकार खानाशी सल्ला केला. महाराजांस १ लाख
६० हजार रुपये किमतीचे जडजवाहीर झुल्फिकारखानाने दिले. तेव्हा झुल्फिकारखान जिंजीचा वेढा उठवून वांदिवाशला गेला. राजाराम महाराज व झुल्फिकार खान यांचेमध्ये झालेला व्यवहार मराठा सेनापती व लढणाऱ्या सरदारांना कळला तेव्हा ते राजाराम महाराजांवर रुष्ट झाले. संताजी घोरपडे यांनी यावेळी चित्रनापल्लीस वेढा घातला होता. त्यांनी २३ एप्रिलला त्रिचनापल्लीकराशी सल्ला केला. नंतर तेही राजाराम महाराजाशी बिघाड करून महाराष्ट्र मध्ये परत गेले. [बेंद्रे, राजाराम, पृ. १८४.]
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २३ एप्रिल इ.स.१७५२
उत्तरेतील कनोज येथे मराठे आणि मुघल यांच्यात तह!
हा तह मराठी इतिहासात अत्यंत महत्त्वाचा आहे. मराठी ताकद किती वाढली होती हे सांगणारा हा तह आहे. अफगाणिस्तानचा बादशहा अहमदशहा अब्दाली हा इ. स. १७५१ मध्ये पंजाबवर चाल करून आल्यामुळे मुघल बादशहाची चिंता वाढली होती. बादशहाने स्वहस्ताक्षराने व वजीराला पत्रे लिहून मराठ्यांची मोठी फौज घेऊन दिल्लीला येण्यास सांगितले. दक्षिनेत निघालेल्या शिंदे होळकरांच्या फौजांना कनोज येथे थांबवून मुघल बादशाहीच्या रक्षणासाठी मराठ्यांशी हा तह केला. या कराराचे महत्त्वाचे कलम होते ते म्हणजे पठाण, राजपूत, यांसारखे देशातील बंडखोर आणि अहमदशहा अब्दालीसारखे परदेशी शत्रू यापासून पेशव्याने मुघल बादशाहीचा बचाव करावा. त्यासाठी अजमीर, आग्रा या प्रांताची सुभेदारी पेशव्यांना द्यावी. आणि इतर मुघली प्रांताची चौथाई मराठ्यांनी वसूल करावी.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜२३ एप्रिल इ.स.१८१७
रायगड पुन्हा पेशव्याच्या हाती आला. तेव्हा, म्हणजे इ. स. १८१७ मध्ये नारो गोविंद आवटी हा रायगड तालुक्याचा मामलेदार होता. त्याने लोकांवर बराच जुलूम केल्याच्या हकीकतीचे कागदपत्र उपलब्ध आहेत २३ एप्रिल १८१७ रोजी बाजीरावाने (दुसरे) त्यास वाड्यात बोलावून आज्ञा
केली की, ३०० पायदळ नवे ठेऊन रायगडच्या बंदोबस्तास सिद्ध व्हावे. सह्याद्रीतील अनेक किल्लेदारांना ताकीदपत्रे
त्याने करविला यापुढे पुणे हे ठिकाण धोक्याचे, असे जाणून त्याने आपले जडजवाहीर, पैसा व मौल्यवान चीजवस्त सिंहगड, रायगड वगैरे ठिकाणे सुरक्षित समजून तेथे पाठवून दिली थोरली भार्या वाराणशीबाई व वाड्यांतील देव यांची रवानगी इ. स. १८१७ जून १२ या दिवशी त्याने रायगडावर केली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 २३ एप्रिल इ.स.१८१८
दोनशे युरोपियन व दोनशे एतद्देशीय शिपायांसह इंग्रज अधिकारी मेजर हॉल यास कर्नल प्रॉयर याने रायगड किल्ल्याची टेहळणी करण्यास पाठविले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment