ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष




⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳

📜 २५ एप्रिल इ.स.१६६५
दाऊदखानाची तुकडी किल्ले पुरंदरावरून निघाली. मिर्झाराजे जयसिंग यांनी दाऊदखानाच्या नेतृत्त्वाखाली सुमारे ७ हजार स्वार महाराजांचा मुलूख ताराज करण्यासाठी पाठवून देण्याचा निर्णय घेतला. या तुकडीत दाऊदखानाच्या मदतीला राजा रायसिंह, सर्झाखान, अमरसिंह चंद्रावर, मुहम्मद सालीहर्तखान, सय्यिद झैनुल आबीदीन बुखारी, अचलसिंह कछवाह व स्वतःचे चारशे स्वार मिर्झाराजे जयसिंग यांनी दिले. ही तुकडी रवाना करण्यात मिर्झाराजे जयसिंग यांचा "तिहेरी" उद्देश होता. पहिला , " उद्देश म्हणजे, आदिलशहा महाराजांना दाखवून द्यायचे होते की, मोगली सैन्य केवळ एकाच वेढ्यात गुंतून राहिलेले नसून इतरही मोहिमांसाठी सुसज्ज आहे". दुसरा" उद्देश म्हणजे, आजवर महाराजांची सैन्ये बादशाही मुलखात घुसून उच्छाद मांडीत असत. आता मोगली सैन्ये त्यांच्या प्रदेशात घुसून तो प्रदेश उद्ध्वस्त करतील हे महाराजांना दाखवून द्यायचे होते. असा प्रदेश उद्ध्वस्त केला म्हणजे ते सैन्याची जमवाजमव करू शकणार नाहीत हे उघड होते". "आणि तिसरा उद्देश म्हणजे, या निमित्ताने दाऊदखानाला वेगळी कामगिरी देऊन न दुखावता किल्ले पुरंदर वेढ्याबाहेर काढता येत होते". मिर्झाराजे जयसिंग यांचे हे तीनही उद्देश पुरेसे सफल झाले. दाऊदखानाची ही तुकडी किल्ले पुरंदरावरून निघाली,

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २५ एप्रिल इ.स.१६७४
६ जून १६७४ रोजी होणाऱ्या छत्रपती शिवरायांच्या राजाभिषेक सोहळ्यासाठी पोलादपुरचे रामजी दत्तो चित्रे या सोनाराने ३२ मण सोनं वापरून सुवर्णसिंहासन घडवले. सिंहासनावर अत्यंत मौल्यवान अगणित नवरत्ने जडवलेली होती.
आजच्या मितीला सिंहासनाचे वजन किलो मध्ये करावयाचे झाल्यास ते १४४ किलोचे भरेल.
त्यावेळचे वजनाचे कोष्टक खालीलप्रमाणे होते.
२४ तोळे म्हणजे १ शेर (जुना तोला ११.७५ ग्रामचा होता)
१६ शेर म्हणजे १ मण म्हणजेच १ शेराचे चे वजन : ११.७५ ग्राम x २४ तोले = २८२ ग्राम होते.
१ मण चे वजन : २८२ ग्राम x १६ शेर = ४५१२ ग्राम (४.५ किलो) होते.
असे ३२ मण म्हणजे ४५१२ x ३२ = १४४३८४ ग्राम (१४४ किलो).

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २५ एप्रिल इ.स.१६९०
सातारला अजिंक्यताराच्या पायथ्याशी सर्जाखान संताजीकडून पराभूत व कैद.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

📜 २५ एप्रिल इ.स.१८१८
इंग्रजांनी २५ एप्रिल ते ६ मे १८१८ दरम्यान कर्नल प्रोथर, मेजर हॉल आणि मेजर बॉण्ड रायगडाच्या पश्चिमेस पोटल्याच्या डोंगरावरून वाघ दरवाजाच्या बाजुला डागले तोफगोळे.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇

https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇

✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.

शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती

https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/

🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

🚩" हर हर महादेव जय श्रीराम "🚩
"जय भवानी, जय शिवाजीराजे, जय शहाजीराजे, जय जिजाऊ, जय शंभूराजे", "जय महाराष्ट्र, जय गडकोट, जय स्वराज्य" 🚩

Comments