ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 ५ एप्रिल इ.स.१४८१
बहमनी वजीर मुहम्मद गावानचा खून झाला व त्याच्या जागी ‘मलिक हसन’ अधिकार पदावर आला.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ एप्रिल १६६३
#शाहिस्तखानावर_सर्जिकल_स्ट्राईक
शास्ताखानास स्वराज्यात घुसून दोन वर्षे होऊन गेली होती. डुकराप्रमाणे स्वराज्याची नासधूस त्याने चालविली होती. बंदोबस्त आवश्यकचं होता. राजेंचा लालमहाल त्याने कब्ज्यात घेतला होता. त्यामुळे शास्ताखानाचा बंदोबस्त म्हणजे काळाची गरज झाली होती. राजगडी विचारचक्रे सुरु झाली. त्यातच शास्ताखानावर प्रत्यक्ष हल्ला करण्याचा बेत राजेंनी सांगितला. त्याप्रमाणे एकाअद्भूत धाडसाची अत्यंत काळजीपूर्वक आणखी राजगडावर होऊ लागली. सर्वप्रथम दिवस ठरवला गेला. शोभान नाम संवत्सर शके १५८५ ची चैत्र शुद्ध अष्टमी ही तिथी हल्ल्यासाठी निवडली गेली. हल्ला प्रथम अर्थातच मध्यरात्रीनंतर व्हायचा होता. त्या दिवशी रविवार असून इंग्रजी तारीख होती.५ एप्रिल १६६३ (रात्री १२ नंतर ६ एप्रिल) मुसलमान कालगणनेप्रमाणे हा रमजानचा महिना असून त्या दिवशी सहावा चंद्र होता. या शिवाय या दिवसाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे हां दिवस बादशहाच्या राज्यरोहणाच्या वाढदिवसानिमित्त साजरा केल्या जाणाऱ्या दिवसांपैकी एक दिवस. चैत्रशुद्ध अष्टमी उजाडली. सर्व योजना आखली गेली होती. हुजुरपागेतून महाराजांनी १००० निवडक धारकरी माणूस निवडले. वरकड लष्करातून २००० सडे सडे राऊत घेतले.
तेव्हा त्यांच्यासोबत नेताजी पालकर, बाबाजी बापुजी मुदगल, चिमणाजी बापुजी मुदगल, बाजी सर्जेराव जेधे, चान्दाजी कान्होजी जेधे, कोयाजी बांदल, येसाजी कंक व तान्हाजी मालुसरे हे होते. राजगडाहून महाराज सिंहगडी आले. रात्रीचा पहिला प्रहर उलटला. सिंहगडाच्या दिशेनेच जसवंतसिंह हा मोगली सरदार दहा हजार घोडदळासह तळ ठोकून बसलेला होता. त्याच्या नकळत छापा घालायचा होता. म्हणून रात्री आडमार्गे जायचे ठरलेमहाराज पुण्याच्या अलीकडे १ मैलावर आंबीलवोढ्या जवळ येऊन थडकले. बहुधा ते डोणज्याच्या खिंडीने उतरून आले असावेत. महाराज सैनिकांच्या एका तुकडीत मिसळून होते. या तुकडीचे नेतृत्व बाबाजी व चिमणाजी या बंधूंकडे होते. चिलखत, जिरेटोप, ढाल, तरवार, अशा पूर्ण तयारीत महाराज होते. ही तुकडी चालत चालत शास्ताखानने बसवलेल्या चौकीपहाऱ्याच्या दरम्यान आली. आणि चतुराईने आत दाखल झाली सुद्धाअसेही मोगली छावणी म्हणजे प्रचंड गबाळेपणा अशी त्यांची ख्याती होती. कॉस्म द गार्द्र अशा छावन्यांचे वर्णन करताना म्हटले आहे. की, The moorish armies are like big cities, as many people follow them and come to the camp at all hours without being questioned.
ऐन मध्यरात्र सारी छावणी सुस्त होती. या छावणीत मराठी मंडळीही चिक्कार होती. त्या मराठ्यांच्या खात्यावर ही मराठी मंडळी छावणीत शिरली. लाल महालात घुसताना महाराजांनी स्वतः बरोबर ४०० निवडक उत्तम सैनिक व कोयाजी बांदल, चांदजी जेधे, बाबाजी व चिमणाजी देशपांडे वगैरे धाडसी जवान घ्यायचे ठरविले होते. लाल महालातील परसांगणाच्या दारांत चिणलेले चिरे उचकटून हे लोकं आत उतरले. असेच ते आतल्या चौकात गेले. तेवढ्यात चाहूल लागून पहारेकरी सावध झाले. ओरडा आणि कापाकापी सुरू झाली. शाइस्तेखान घाईने, खाली काय गोंधळ आहे ते पाहावयास आला. आणी आला तो अतिशहाणा धनुष्यबाण घेऊन लढाईला आला. आता इतक्या अंधारात याच्या बापानी तरी धनुष्य बाण युद्धात कधी वापरले होते काय ? तिथेच तो मरायचा. पण त्यात त्याचा पुत्र अबुल फते खान मध्ये धावला. त्यामुळे खान बचावला, पण पोरगा मेला. खान आपल्या महालाकडे जीव मुठीत धरून धांवत असता महाराज त्याच्या मागे धावले. महालातील स्त्रियांनी घाबरून पण चतुराईने दिवेच फुंकून टाकले. अंधारात महाराजांनी अंदाजाने खानावर खाडकन् घाव घातला. हा घाव खानाच्या उजव्या हातावर बसला अन् तीन बोटे तुटली. खान प्राणांतीक आरडला.महाराजांना वाटले, खान खलास झाला. ते परत फिरले.या युद्धात महाराजांची सहा माणसे ठार झाली व चाळीस जखमी झाली. जखमी झालेल्यांमध्ये कोयाजी बांदल हे सुद्धा होते. रात्रीच्या या हल्ल्यात खानाचा एक मुलगा, एक जावई, बारा बिव्या, चाळीस मोठे दरकदार, एक सेनापती असे एकूण पंचावन्न लोक महाराजांनी व त्यांच्या मराठ्यांनी मिळून कापून काढले होते. सारा लाल महाल घाबरून कल्लोळत होता.दगा ! बचाओ ! गनीम ! मराठ्यांनीहि असेच ओरडण्यास प्रारंभ केला ! एकच कल्लोळ ! महाराजांनी या हलकल्लोळाचा फायदा घेतला व सर्वजण त्या गर्दित मिसळून पसार झाले...
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ एप्रिल इ.स.१६८९
(चैत्र वद्य दशमी शुक्रवारी)
छत्रपती संभाजी महाराजांची हत्त्या झाल्या नंतर झुल्फिकारखान ने रायगडास वेढा घातला होता. शत्रूशी उघड टक्कर देणे शक्य नव्हते, हा विचार मुत्सद्यांनी राणी येसूबाईंना बोलून दाखविला तेव्हा येसूबाईने सांगितले की, तुम्ही सर्व पराक्रमी सरदारांनी एक विचारे चालून, राजारामांनी त्यांचे कबिलासह बाहेर पडावे. आम्ही मुलांसह रायगडावर सुखरूप राहू. तुम्ही सर्व बाहेर पडल्यावर शत्रू तुमचे अंगावर जातील. तुमचा सर्वांचा
जमाव एके ठिकाणी पोक्त झाला म्हणजे आम्हांस काढून तिकडे न्यावे,” ही राणी येसूबाईंची पोक्त विचारसरणी ऐकून सर्वांना धीर आला. परंतु येसूबाईंस मागे एकटी टाकून जाणे राजाराम महाराजांच्या जीवावर आले. तथापि प्रसंगावर दृष्टी ठेवून सर्वांचे समाधान करून राजाराम महाराज बोलले. “राज्याचे अधिकारी शिवाजी राजे पूर्वीचे तेच हे ऐसे लक्ष ठेवून, आम्ही कारभारी, आमचे आज्ञेत राहून, पूर्वीहून विशेष पराक्रम करून, औरंगजेबास जिंकून राज्य रक्षावे येविशी सर्वांची शपथाप्रमाणे व्हावी.” येणेप्रमाणे सर्वांच्या शपथा झाल्या. आणि राजाराम महाराज ५ एप्रिल १६८९ रोजी रायगडाबाहेर पडून प्रतापगडा कडे प्रस्थान केले. निघताना राजाराम महाराजांनी राणी येसूबाईंचे चरणी मस्तक ठेवून श्रमी झाले तेव्हा राणी साहेबांनी त्यांच्या मस्तकी हात ठेवून बोलल्या, यशस्वी व्हावे, गेलेले राज्य मिळवावे, श्रमी होऊ नये. तद्नंतर राजाराम महाराजांनी नेत्र पुसून छत्रपती संभाजीपुत्र शिवाजीस पोटाशी धरले व पुन्हा भेट होईल असे म्हणून निरोप घेतला. संताजी घोरपडे, धनाजी जाधव, खंडेराव दाभाडे इत्यादी मंडळी बरोबर होती. छत्रपती राजाराम महाराज ऑगस्ट १६८९ पर्यंत प्रतापगडावर होते नंतर त्यांनी पन्हाळा गडा कडे प्रस्थान केले.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
📜 ५ एप्रिल इ.स.१७४०
श्रीमंत बाजीराव पेशव्यांनी दि. २३ मार्च १७४० रोजी खरगोण प्रांतात प्रवेश केला. सुभ्याची व्यवस्था लावत असताना बाजीरावांची तब्येत बिघडली होती. दि. ५ एप्रिल रोजी बाजीराव नर्मदाकाठी रावेरखेडी येथे आपल्या वाड्यात येऊन राहिले. इतर प्रांतांची व्यवस्था लावून पूर्ण झालेली होती. परंतु, तरीही बाजीराव पेशवे पुण्याला न राहता रावेरखेडीलाच राहिले. वास्तविक पुणे हे बाजीरावांचे अत्यंत प्रिय. शनिवारवाड्यासारखा बळकट महाल त्यांनी उभा केला, पुण्याची पुनर्बाधणी केली. परंतु, मस्तानी प्रकरणाने त्याच पुण्याने आपल्या घरातल्यांनीही त्यांना वाळीत टाकल्यासारखेच केले होते. सतत मस्तानीच्या असण्यावरून घरातल्या मंडळींचे नाराज चेहरे त्यांना पुण्यापासून लांब राहण्यास प्रवृत्त करू लागले. चिमाजीआप्पांनी राधाबाईंना पत्राद्वारे रावांची प्रकृती कळवली.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment