ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष
⛳ आजचे ऐतिहासिक शिवकालीन शिवदिनविशेष ⛳
📜 ११ मे इ.स.१६६६
आग्रा भेटीच्या वेळी छत्रपती शिवाजी महाराज ११ मे रोजी 'मालुकचंद सराय' येथे येऊन पोहचले. येथुन आग्रा शहर खुपच जवळ होते.
छत्रपती शिवरायांच्या भेटीला रामसिंगचा मुन्शी गिरधारीलाल नजराणा घेऊन हजर.
मुन्शी गिरधारीलाल याच्यामार्फत छत्रपती शिवरायांनी इनामवर्दीखानाकडून ८ हत्ती भाडे तत्वावर घेतले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ११ मे इ.स.१६७८
महाराज किल्ले रायगडी परतले.
महाराजांनी किल्ले प्रतापगडावर श्रीभवानीच्या दर्शनार्थ आले. श्रीभवानीची पुजा बांधून महाराज किल्ले रायगडी परतले. सुमारे १६ ते १७ महिने किल्ले रायगडापासून तसेच स्वराज्यापासून ते दूर होते..
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ११ मे १६८१
बादशहाच्या फौजा पाठीवर असल्यामुळे छत्रपती संभाजीराजांना पाठवलेल्या पत्राची वाट न पाहता 'शहजादा अकबर' तसाच खानदेश बागलानातून महाराष्ट्रात आला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ११ मे १६८६
छत्रपती संभाजी महाराजांच्या राज्यातील लहान तारवास समुद्रात फिरण्याची प्रत्येकी चार आण्यापेक्षा जास्त पैसा न देता दस्तक द्यावा अशी विजरईने कॅप्टनला आजच्या दिवशी आज्ञा दिली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ११ मे १७३९
मराठा आणि पोर्तुगीज यांच्या मध्ये तहाची अंतिम बोलणी होउन पोर्तुगीज कायमचे गोव्याला निघून गेले. ४ मे १७३९ रोजी वसई किल्ला मराठ्यान्नी प्रचंड रणसंग्राम करून जिंकला होता. मराठ्यांतर्फे किल्ल्याचा पूर्ण ताबा 'सरसुभेदार शंकराजी केशव' यांनी पेशव्यांच्या आज्ञेवरुन घेतला.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ११ मे १८५७
पहिला भारतीय स्वातंत्र्य संग्राम – स्वातंत्र्यसैनिकांनी दिल्ली शहर जिंकले.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
📜 ११ मे १८८८
महात्मा ज्योतिबा फुले यांना ‘महात्मा’ ही पदवी देण्यात आली.
🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻🚩🏇🏻
YouTube चैनल वर हि video स्वरूपात शिवदिनविशेष पाहू शकता खालील लिंक वर👇
https://youtube.com/channel/UCQ78bMMS0geXInhnLJflC2w
.
.
.
👉अतिशय महत्त्वाचे : सर्व शिवप्रेमींना विनंती आहे या पोस्ट मध्ये कोणीही आपली स्वताची प्रसिध्दी करु नये.
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇🚩🏇
✍ लेखन / माहिती संकलन : राहूल बोरसे पाटील.
शिवकालीन दिनविशेष व इतिहासावरील दर्जेदार माहिती
https://www.facebook.com/TheGreatMarathaWarriorss/
🏇🚩🏇🚩🏇🚩🏇 🚩🏇

Comments
Post a Comment